prafulla phadke mhantat

Monday, November 2, 2020

यांना कोण रोखणार?

 

आपल्याकडे कोणी काही टीका केली, विरोधात बोलले की भावना दुखावतात, मनं दुखावतात. त्यामुळे अशा टीकाकारांना, कडवट बोलणारांना रोखायची भाषा केली जाते. पण त्याहीपेक्षा वाईट प्रकारे वर्तन करणारी माणसं आपल्याला दैनंदिन बघायला मिळतात. त्यांना कोण रोखणार असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
   आज संपूर्ण जग हे कोरोनाच्या महामारीने वेढले आहे. स्वच्छता आणि टापटीपपणा याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. अगदी कोणताही फोन लावला तर आपल्याला स्वच्छतेबाबत  काही सेकंद ती रेकॉर्ड ऐकायला लागते आणि मगच रिंग वाजते. पण हे सगळे करूनही काही लोकांना फरक पडत नाही. ते जैसे ते वागताना दिसतात. म्हणूनच यांना कोण रोखणार असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
    आपण रस्त्याने जाताना बघतो तर अनेकजण बिनधास्तपणे रस्त्यावर थुंकताना दिसतात. कुठेही थुंकू नका, स्वच्छता राखा असे बोर्ड लावूनही, सतत घोषणा करूनही लोक ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. तेंव्हा प्रचंड राग येतो. आता लोकांना मास्क घालून थुंकायचीही सवय लागली आहे. मास्क घातल्यावर थुंंकणाराचे प्रमाण कमी होईल असे वाटले होते. पण बरोबर मास्क बाजूल करून अगदी ऐटीत थुंकणारांचे प्रमाण सर्वत्र दिसते. त्यामुळे या थुंकणारांना आवरण्याची गरज आहे. थुंकून घाण करणारांना दंड आकारला जाईल असे बोलले जाते. पण याची तक्रार कोण आणि कुठे करणार? त्याबाबत कसलीही नियमावली ही नाहीच. किंबहुना ही कारवाई नक्की कोणी करायची? महापालिकेने करायची, रेल्वे प्रशासनाने करायची, राज्य  सरकारने करायची, केंद्र सरकारने करायची की पोलिसांनी कारवाई केली पाहिजे? कोणी आपल्याला विचारणार नाही हा भ्रम या थुंकणारांचा असतो. त्यामुळे ते बिनधास्त कुठेही थुंकत असतात. हे फार वाईट आहे. पण यांना सांगणार कोण? साधारणपणे असे थुंकणारे, तंबाखू, पान, गुटखा खाणारे भांडखोर आणि गुंड प्रवृत्तीचे असतात. त्यामुळे त्याना इथे का थुंकला असे कोणी विचारायला जात नाही. जर एखाद्याने विचारलेच तर तो थुंकणारा लगेच आपल्या बापाचा उद्धार करतो. ही जागा काय तुझ्या बापाची आहे का असा दांडगट सवाल करतो. त्यामुळे असल्या घाणेरड्या लोकांशी वाद कोण घालणार? त्यामुळेच अशा लोकांना आवरण्याची गरज आहे. हे खरे साथीचे रोग पसरवणारे लोक आहेत.
   मुंबई, नवी मुंबई आणि आता बहुतेक शहरांमधून ही कबुतरांची समस्या फार मोठी आहे. सकाळच्या वेळात अनेकजण या कबूतरांना खायला घालत असतात. आपले औदार्य दाखवत असतात. पण हे कबुतरांचे थवे इतके भयानक असतात. की संपूर्ण रस्ता फुटपाथ त्यांनी पादाक्रांत केलेला असतो. अनेक दुकानदार आपल्या दुकानच्या दारातच धान्य टाकून कबूतरे जमवून बसतात. आपण त्या रस्त्याने जात असतो आणि एकदम तो थवा उडतो. उंच इमारतीच्या कोपर्‍याकोपर्‍यात, तारांवर, झाडांवर ही कबूतरे जातात. मग उडताना तो कबूतरांचा थवा इतकी घाण करतात की आपण आंघोळ करून बाहेर पडलेलो असलो तरी आपल्याला त्या घाणीला सामोरे जावे लागते. अनेक कबूतरांची पिसे पडतात, ते धान्याचे तुकडे, चोथा, विष्ठा काय वाटेल ते पडते. आपल्या कपड्यावर अंगावर घाणीचे डाग पडतात. दररोज शेकडो हजारो लोकांना या कबूतरांचा असा त्रास भोगावा लागतो. त्यांच्या अंगावर पिसवांसारखे बारीक किडे असतात. त्यामुळे त्वचा विकार होतो. तसेच या कबूतरांच्या पंखांचे केस आपल्या नाका तोंडात गेल्याने अस्थमासारखे आजार होतात. अनेक प्रकारचे जंतू, विषाणू पसरवण्याचे काम हे कबूतरांचे थवे करत असतात. नागरी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा हा संसर्ग, हा रोगांचा प्रसार आपण दैनंदिन पहात असतो. पण यांना कोण रोखणार?
   सरकारने काही दिवसांपूर्वी सुट्या सिगारेट विक्रीला बंदी घातली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई केलेली होती. पण सर्रास सर्व पानपट्ट्यांवर सिगारेटची किरकोळ विक्री करताना दिसते. रस्त्याने जाताना लोक सिगारेट ओढत जात असतात. आजबाजूला महिला आहेत, रहदारी आहे याचेही भान अनेकांना नसते. नाकावर रूमाल धरूनच आपल्याला त्या धुरातून वाट काढावी लागते. आता तर नाकातोंडावर मास्क आहेत. पण तरीही त्या धूराचा त्रास हा होतोच. त्यामुळे या सर्वांवर दंडात्मक कारवाई कोणीच का करत नाही?
रस्त्यावर थुंकणारांकडून दंड वसूली केली तर त्यातून सरकारला इतका महसूल मिळेल की सरकारची कोरोनामुळे रिकामी झालेली तिजोरी भरून निघेल. फक्त कारवाई करणारे हवेत. त्यासाठी जागोजागी तसे पोलीस, महापालिका, पालिका, सिडको अशा संस्थांचे आरोग्यदूत असले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कोणी अस्वच्छ वर्तन करत असेल तर त्याची तक्रार करणारे लोक पुढे आले पाहिजेत.त यांना निर्भयपणे अशा तक्रारी करता आल्या पाहिजेत. यासाठी दंडाची जी काही रक्कम असेल त्यातील 10 ते 25 टक्के रक्कम बक्षिस म्हणून अशा तक्रारकर्त्यांना दिली पाहिजे. जेणेकरून अशा प्रोत्साहनाने अनेक लोक हे काम करायला पुढे येतील. यातून अनेकांना रोजगार मिळू शकतो. आपल्याकडे कायदे चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी नसल्याने सगळे वांधे झालेले आहेत. अनेकजण अमेरिकेत असे आहे, इंग्लंड मध्ये तसे आहे, फ्रान्समध्ये स्वच्छता आहे, जपानमध्ये स्वच्छता आहे असे कौतुकाने सांगतात. हे सांगताना हातात सिगारेट धरून त्याचे थोटूक रस्त्यावर टाकतात. मग तुमचा परदेशात  जाउन उपयोग तो काय? या देशाच्या मातीवर कचरा, घाण करण्यासाठी तुम्ही इथे आला आहात का? अशा अनेक गोष्टींना आवर घालण्याची गरज आहे. आम्ही फार सहनशील आहोत. आमच्याकडे घाण केली तर चालते. हे मुंबईत यूपी बिहारचे भय्ये येतात ते इतके ठिकाणी पान तंबाखू गुटखा खाउन थुंकत असतात की त्यांना सरळ करण्यासाठी कोणतीही राजकीय संघटना पुढे का येत नाही असा प्रश्न पडतो. पण सरकारकडून, देशाकडून आपल्या हक्कासाठी, अधिकारासाठी भांडणारे, रस्त्यावर उतरणारे लोक अशाप्रकारे घाण करतात तेंव्हा त्यांना याची जाणीव करून देण्याची गरज असते.

ReplyForward
Displaying 0211-PUN-CFT-03.pdf.
at November 02, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (436)
    • ►  August (54)
    • ►  July (62)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ▼  November (15)
      • स्वदेशीचे वादळ निर्माण करणारे राजीव दीक्षित
      • समांतर सत्ताधीश
      • अभिनंदन ठाकरे सरकार
      • विरोधासाठी विरोध
      • मालिकांमधील नैतिकता संपते आहे
      • शत प्रतिशतच्या दिशेने
      • राजकारण बिहारचे: तोडफोड, तडजोड, जोडाजोड
      • सढळहस्ते खरेदी करा
      • गब्बर का डर.....
      • एक्झीट पोलची एक्झीट होऊंदे
      • आराम हराम है।
      • दिवस राज्य नाटय स्पर्धेचे
      • अपेक्षाभंगाचा शॉक
      • यांना कोण रोखणार?
      • रंगभूमी आणि रूपेरी पडदा गाजवणारे सोहराब मोदी
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

धोरणात्मक निर्णयांमध्ये युवकांचा वाढलेला सहभाग

आजचे युवक हे उद्याचे प्रौढ आणि भविष्यातील ज्येष्ठ आहेत. त्यांच्या वर्तमान आणि भविष्यासाठीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असला पाह...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap
  • _औरंगाबाद
  • _कोल्हापूर
  • _जळगाव
  • _धुळे
  • _नागपूर
  • _नांदेड
  • _नाशिक
  • _पुणे
  • _मुंबई
  • _लातूर
  • _सातारा
  • _सोलापूर
  • देश
  • विदेश
  • क्रीडा
  • अर्थ
  • मूव्ही-मस्ती
  • संपादकीय
  • चालू घडामोडी
  • _मनोरंजन
  • _संपादकीय
  • _किल्ले
  • _लाइफ स्टाइल
  • _ShortCodes
  • _इतर माहिती
  • _मदत हवी आहे का ?

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

Css Options

  • boxedVersion
  • recentPostsHeadline

Default Variables

  • disqusShortname
  • commentsSystem
  • fixedSidebar
  • postPerPage

Time of Bollywood

    .. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निसंकोचपणे आम्हाला फोन करा.

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Menu Footer Widget

  • Home
  • About
  • Contact Us
  • Privacy Policy
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (436)
    • ►  August (54)
    • ►  July (62)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ▼  November (15)
      • स्वदेशीचे वादळ निर्माण करणारे राजीव दीक्षित
      • समांतर सत्ताधीश
      • अभिनंदन ठाकरे सरकार
      • विरोधासाठी विरोध
      • मालिकांमधील नैतिकता संपते आहे
      • शत प्रतिशतच्या दिशेने
      • राजकारण बिहारचे: तोडफोड, तडजोड, जोडाजोड
      • सढळहस्ते खरेदी करा
      • गब्बर का डर.....
      • एक्झीट पोलची एक्झीट होऊंदे
      • आराम हराम है।
      • दिवस राज्य नाटय स्पर्धेचे
      • अपेक्षाभंगाचा शॉक
      • यांना कोण रोखणार?
      • रंगभूमी आणि रूपेरी पडदा गाजवणारे सोहराब मोदी
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.