prafulla phadke mhantat

Sunday, October 7, 2018

सहकाराकडे सकारात्मकतेने पाहणारे : आ. प्रवीण दरेकर

महाराष्ट्राच्या उभारणीत सहकाराचा वाटा फार मोठा आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा सहकारातून झाला. सहकारातून राजकारणाचा आणि अर्थकारणाचा मार्ग पुढे जातो; परंतु गेल्या काही वर्षापासून सहकाराला मरगळ आलेली असताना आणि तरुण वर्ग आयटी क्षेत्राकडे वळलेला असताना, प्रवीण दरेकर यांच्यासारख्या आमदारांना सहकाराकडे आकर्षण वाटते, सहकारातून विकासाचा मार्ग आहे, हे लक्षात येऊन ते याकडे सकारात्मकतेने पाहतात, हे फार महत्त्वाचे आहे.कोकणात सहकाराचा स्वाहाकार होतो आणि सहकार टिकत नाही, त्याला यश मिळत नाही असा बोलबाला असताना कोकणातील रायगडपासून ते मुंबईपर्यंत सहकार रुजवण्याचे काम प्रवीण दरेकर यांनी केलेले दिसून येते. सहकारी गृहनिर्माण संस्था, सहकारी बँक या दोन ताकदवान बनवण्याचे स्वप्न उराशी घेऊन सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांनी निवडलेला मार्ग एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणावा लागेल.नुकतीच त्यांनी प्रहारच्या टीमबरोबर खुल्लमखुल्ला चर्चा केली, तेव्हा सहकाराकडे त्यांचा बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यातून विकासाचा मार्ग निवडणे हे फार महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत. आज ज्याची गरज आहे नेमके तेच काम तरुण तडफदार आमदार प्रवीण दरेकर करताना दिसत आहेत. सगळीकडे सहकारी बँका या भ्रष्टाचाराचे आगार बनत असताना आणि सहकारी बँका बुडीत काढण्याचे धोरण अवलंबले जात असताना सहकाराला नवा अर्थ प्राप्त करून देऊन सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचे आणि सहकार जिवंत ठेवण्याचे काम आज प्रवीण दरेकर करताना दिसत आहेत. मुंबै बँक किंवा मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी घेतलेले निर्णय हे फार महत्त्वपूर्ण आणि प्रत्येक सहकारी कार्यकर्त्यांला अनुकरणीय अशी आहे.एक काळ असा होता की, सहकाराचा उद्देश सेवा देणे हा होता. सहकाराचा उद्देश कधीही नफा मिळवणे नव्हता; परंतु आधुनिक काळात सेवा देऊन नफा मिळवणे हा सहकाराचा नवा मंत्र होताना दिसत आहे. संस्था टिकली पाहिजे. संस्था टिकली, तर सहकारी कार्यकर्ता राहणार आहे. सहकारी कार्यकर्त्यांला सेवा देण्याची ताकद मिळण्यापुरता नफा हा मिळालाच पाहिजे. हा विचार आता रूढ होताना दिसत आहे. तोच विचार घेऊन नवा सहकाराचा मंत्र आमदार प्रवीण दरेकर जपताना दिसत आहेत. सर्वसाधारण बँकांवर फक्त रिझर्व बँकेची नियंत्रणे असतात; परंतु सहकारी बँकांवर रिझर्व बँक आणि सहकार खाते यांचं संयुक्त नियंत्रण असते. रिझर्व बँकेच्या गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्त्वे सांभाळताना सहकार खात्याची मार्गदर्शक तत्त्वे आणि महाराष्ट्र सहकार कायदा याची बंधने पाळावी लागतात. ही तशी तारेवरची कसरतच असते. पण, ती लिलया करण्यासाठी योग्य सहकार मार्गदर्शक असावा लागतो. आज प्रवीण दरेकरांनी नेमके तेच केले आहे. त्यामध्ये त्यांची दूरदृष्टी आणि विचार फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे सहकार हा सहकार आहे. सहकारात राजकारणाची वस्त्रे बाजूला ठेवायची आहेत. सर्वाना बरोबर घेऊन एक विचाराने जायचे आहे. त्यात सर्व पक्षाच्या लोकांना संधी द्यायची आहे, पण सर्वानी सहकारी संस्थेचे हित पाहायचे आहे. या विचाराने त्यांनी बँकेची जोपासना करून त्या बँकेच्या निधीचा विनियोग केलेला दिसून येतो. बँकांकडे जमणा-या ठेवी या योग्य कर्जदारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.कर्जाची परतफेड करू शकणारा सक्षम कर्जदार निवडणे हे जितके अवघड काम तितकेच कर्जरूपाने विविध सेक्टरमध्ये कर्ज जाणे फार महत्त्वाचे असते. रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे काही कर्ज ही अग्रहक्काची किंवा प्रेफरन्शीअल कर्ज असतात. ती त्याच प्रकारे जावी लागतात. यामध्ये विकर सेक्टर किंवा दुर्बल घटकांनाही देणे क्रमप्राप्त ठरते. शेतीपुरक उद्योगांना किंवा अलाईड टू अ‍ॅग्रिकल्चर अशी कर्ज देणे आवश्यक असते. ही सगळी कर्ज वाटप करणे म्हणजे फार मोठी कसरत असते. सहकारी बँकांना निधीची गुंतवणूक करणेही फार अवघड असते. पूर्वी ७० ड च्या नियमाप्रमाणे फक्त जिल्हा बँकेकडेच बाकीच्या सहकारी बँकांनी गुंतवणूक करणे सक्तीचे होते; परंतु नंतर ७० ड ची नियंत्रणे उठवल्यावर सहकारी बँका कुठल्याही बँकांकडे निधीची गुतंवणूक करू लागल्या. अशा परिस्थितीत वाढता निधी, वाढत्या ठेवी त्या प्रमाणात योग्य प्रमाणात सुरक्षित कर्जपुरवठा करण्याचे नियोजन हे संचालक मंडळाच्या कौशल्यावर दिसून येते. आज हे उत्तम कौशल्य आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे दिसून येते. शेतीपुरक किंवा शेतीची कर्ज देणे सहकारी बँकांना बंधनकारक आहे. मुंबई जिल्हा बँक किंवा मुंबै बँक ही शेतकरी कुठे शोधत राहणार? अशावेळी मत्स्यशेती, मत्स्योत्पादकांना कर्ज देणे आणि नाबार्ड रिझव्‍‌र्ह बँक तसेच सहकार खात्याची परवानगी घेऊन कार्यक्षेत्राबाहेरही कृषीकर्जपुरवठा करण्याचे काम प्रवीण दरेकर यांनी अत्यंत कौशल्याने केलेले आहे. हा सहकाराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. कोणत्याही बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्वे पाळली, कंकरंट ऑडिट करून घेतले, तर ती बँक अत्यंत सक्षमपणे चालते. रिझव्‍‌र्ह बँकेकडून सतत मार्गदर्शक तत्त्वे, सूचना येत असतात. त्या सूचना फक्त फायलीत लावण्याचे काम बहुसंख्य बँका करतात. पण, ती आलेली परिपत्रके वाचायची असतात. सर्व शाखांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. रिझर्व बँक ही नेहमी बँकांना बळकटी देण्याचे काम करत असते. पण, याकडे बँका दुर्लक्ष करतात आणि अडचणीत येतात. मात्र, प्रवीण दरेकर या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास करतात आणि तो आपल्या सहकारी संचालकांना सांगतात आणि त्याची अंमलबजावणी करतात. ही सहकारातील फार जमेची बाब म्हणावी लागेल.या सकारात्मकतेतूनच प्रवीण दरेकर यांनी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा आराखडा तयार केला. त्याचा लाभ आज मुंबईकर घेत आहेत. आपल्या सोसायटीचा, गृहनिर्माण संस्थेचा विकास हा बिल्डर किंवा विकासकाची वाट न पाहता सर्वानी एकत्र येऊन करायचा. त्यासाठी बँकेने कायमस्वरूपी मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. यामध्ये कर्जपुरवठय़ाबरोबरच संस्था निर्माण करेपर्यंत विकासाची सर्व कामे केली जातात. यामुळे बिल्डरकडून होणारी फसवणूक, वेळेचा अपव्यय टळतो. आमदार प्रवीण दरेकर यांनी सहकारातील पुनर्रचनेत गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंविकासाची काढलेली योजना सर्व महाराष्ट्रात अनुकरणीय अशीच आहे. सकारात्मकतेने काम केल्यास सहकार यशस्वी होऊ शकतो, हे आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखवून दिलेले आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचा पाया रचला. ‘विनासहकार नही उद्धार’ हा मंत्र दिला. तो मंत्र जपत यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले, वसंतदादा पाटील, बाळासाहेब विखे-पाटील यांनी सहकार मजबूत केला. आज त्याच नामांकित सहकार महर्षीच्या पंगतीत तरुण तडफदार अशा आमदार प्रवीण दरेकर यांचे नाव पोहोचले आहे. या सर्वानी सकारात्मकतेने सहकाराकडे पाहिले म्हणून सहकारी साखर कारखाना, सहकारी बँक, कुकुटपालन केंद्रे, अर्बन बझार अशी सहकारी समांतर अर्थव्यवस्था निर्माण झालेली होती. आज त्याच सकारात्मकतेने सहकाराला जपण्याचे काम आमदार प्रवीण दरेकर करत आहेत हे महत्त्वाचे आहे.


at October 07, 2018
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ▼  October (26)
      • पायाभरणीचा घाट
      • गृहनिर्माण महामंडळाचा फायदा कोणाला?
      • अमृतसरचा रेल्वे आत्मघात
      • म्हणून शरद पवारांनी माघार घेतली
      • आझाद हिंद सेनेचा अमृत महोत्सव
      • काँग्रेसचे भगवीकरण, भाजपचे काँग्रेसीकरण
      • सर्वाचेच रामाला साकडे
      • किती झाले करोडपती, किती झाले रोडपती
      • हाथी चले अपनी चाल..
      • ‘मी टू’.. मोहीम की दहशत ?
      • अकबरांच्या ‘मी टू’मुळे भाजपला डोकेदुखी Oc
      • रावण दहन म्हणजे दुष्प्रवृतींचा नाश
      • इतिहासाची मोडतोड नको!
      • विजयाचा संकल्प ‘दसरा’
      • उलटा शिष्टाचार
      • नाव मोठं, लक्षण खोटं!
      • महाराष्ट्रात येऊन गद्दारी नको!
      • दुष्काळात तेरावा महिना
      • सहकाराकडे सकारात्मकतेने पाहणारे : आ. प्रवीण दरेकर
      • निवडणूक पूर्व सर्वेक्षण किती खरे, किती खोटे ?
      • ड्रेसकोडचा प्रश्न
      • काँग्रेस पुरस्कृत ऐक्याला सुरुंग
      • प्रेमाच्या नात्याला कलंक
      • विश्वास गमावलेला राळेगणचा ‘महात्मा’
      • राहुलची बोफोर्स
      • खिशात शब्द घेऊन हिंडणारे ‘गदिमा’
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ▼  October (26)
      • पायाभरणीचा घाट
      • गृहनिर्माण महामंडळाचा फायदा कोणाला?
      • अमृतसरचा रेल्वे आत्मघात
      • म्हणून शरद पवारांनी माघार घेतली
      • आझाद हिंद सेनेचा अमृत महोत्सव
      • काँग्रेसचे भगवीकरण, भाजपचे काँग्रेसीकरण
      • सर्वाचेच रामाला साकडे
      • किती झाले करोडपती, किती झाले रोडपती
      • हाथी चले अपनी चाल..
      • ‘मी टू’.. मोहीम की दहशत ?
      • अकबरांच्या ‘मी टू’मुळे भाजपला डोकेदुखी Oc
      • रावण दहन म्हणजे दुष्प्रवृतींचा नाश
      • इतिहासाची मोडतोड नको!
      • विजयाचा संकल्प ‘दसरा’
      • उलटा शिष्टाचार
      • नाव मोठं, लक्षण खोटं!
      • महाराष्ट्रात येऊन गद्दारी नको!
      • दुष्काळात तेरावा महिना
      • सहकाराकडे सकारात्मकतेने पाहणारे : आ. प्रवीण दरेकर
      • निवडणूक पूर्व सर्वेक्षण किती खरे, किती खोटे ?
      • ड्रेसकोडचा प्रश्न
      • काँग्रेस पुरस्कृत ऐक्याला सुरुंग
      • प्रेमाच्या नात्याला कलंक
      • विश्वास गमावलेला राळेगणचा ‘महात्मा’
      • राहुलची बोफोर्स
      • खिशात शब्द घेऊन हिंडणारे ‘गदिमा’
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.