- ठाण्यातल्या नाट्य संमेलनावर एकदाचा पडदा पडला. आता पडद्याबाहेरची नाटके सुरू झाली. म्हणजे तसे हे नाट्यसंमेलन आहे की शिवसेनेचा मेळावा आहे असेच वातावरण या संमेलनात होते. त्यामुळे जी चर्चा संमेलनाची होते तसे काहीच घडले नाही. नाट्यप्रेमींनी त्याकडे पाठच फिरवलेली दिसली. तर जमलेला गोतावळा हा मेळाव्यासाठीच आलेला होता.
- या संमेलनात ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद दोन वर्षे असावे’ अशी मागणी मावळत्या अध्यक्षा श्रीमती फय्याज यांनी केली. वर्षभरात नाट्य परिषदेच्या राजकारणात आणि राजकारण्यांच्या नाटकात काहीच करता आले नाही हे फैयाज यांच्या लक्षात आले असावे. म्हणून त्यांनी तशी मागणी केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ‘संमेलनाच्या अध्यक्षाला काही अधिकार नाहीत, तो गुळाचा गणपती आहे’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकुणच शिवसेनायुक्त नाट्यसंमेलनावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसते. म्हणजे दिवाळीतला किल्ला असतो. त्या किल्ल्यावर मातीची खेळणी, पुतळे मांडले जातात. त्याप्रमाणे या शिवसेनेच्या गडावर नाटकातली सोंगं उभी केली काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
- आजकाल अशीच परिस्थिती सर्वत्र आहे. म्हणजे जे नाटय संमेलनाच्या अध्यक्षांचे आहे तेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या महिन्यात अशीच डी वाय पाटील यांनी राजकीय धुळवड उडवली. डी वाय पाटील यांच्या या संमेलनाचा फायदा कॉंग्रेसला मिळणार की राष्ट्रवादीला असा विचार सुरू असतानाच शिवसेनेेने नाट्य संमेलनावर आपली भगवी मोहोर उमटवली.
- वास्तविर साहित्य संमेलन आणि नाटय संमेलन ही दोन्ही संमेलने वेगळी हवी कशाला? नाटक हा साहित्याचा प्रकार नाही का? जर साहित्य संमेलनात कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, मुलाखती हे सर्व प्रकार येऊ शकतात तर त्यात नाटक का येत नाही? याचे मुख्य कारण दोन संस्थांमध्ये वेगवेगळ्या माणसांची सोय होऊ शकते. नाटकात काम करण्यासाठी एकदा रंगमंचावर न गेलेली, किंवा नाट्यनिर्मिती, त्यातील तांत्रिक अंग सांभाळण्याचे काम कधीही न केलेली व्यक्ति नाट्य परिषदेवर असते. स्थानिक राजकारणात शिरकावर करून आपल्याकडे सेलिब्रेटींचा भरणा वळवून त्यांच्यासमवेत फोटो काढून गर्दी जमवणारे नाटक करणारे नाट्य परिषदेत आणि साहित्य परिषदेत आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता येणार?
- ‘मराठी साहित्य परिषद’ ही एक संस्था आणि ‘मराठी नाटय परिषद’ ही एक संस्था. त्यामुळे संस्था दोन म्हणून संमेलने दोन होतात. नाटक हा विषय राजकारणातही आहे, जीवनातही आहे आणि प्रपंचातही आहे. इतके महत्त्वाचे विषय असलेले नाटक साहित्यापासून वेगळे का काढले गेले? त्याच्याकरिता वेगळे संमेलन कशाला? म्हणजे आमचा रेल्वेचा आणि केंद्रिय अर्थसंकल्प वेगवेगळा मांडला जातो. तसलाच हा प्रकार आहे. एकमेकांशी संबंध असूनही दोघांची वेगळी चूल असते.
- खरं तर ‘साहित्य संमेलनातच नाटय संमेलन सामावून घेऊन मराठी भाषेचा एक भव्यदिव्य सोहळा करावा’ असा विचार कुणाच्या मनात का येत नाही? सलग आठवडा गेला तरी हरकत नाही. गणेशोत्सवाप्रमाणे मस्तपैकी एकत्रित हा सोहळा करायला काय हरकत आहे? मराठी साहित्यामध्येच कथा, कादंबरी, कविता, समीक्षा यांचं संमेलन वेगळं आणि नाटकाचं वेगळं अशी फाळणी कशाकरिता केली आहे हे अनुत्तरीत आहे.
- दोन्हीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बरेच राजकारण होते. संमेलने दोन्हीही वादग्रस्तच होत असतात. त्याची निवड कशी असावी याबाबत नेहमीच चर्चा होते. त्यातच आता कालावधीचा विषय आहे. अध्यक्षांचा एक वर्षाचा कार्यकाळ अपुरा आहे, ही गोष्ट तर सर्वमान्य आहे. परंतु आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी किंवा नाटय संमेलनाच्या अध्यक्षांनी १ वर्षात काय केले आहे त्याचा अहवाल कधीच समोर येत नाही. म्हणजे जे आचार्य अत्रे, ना. सी. फडके, स्वा. वि. दा. सावरकर यांनी आपल्या संमेलनात केले ते नंतर कधी घडले नाही. आचार्य अत्रेंमुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ आले. ना. सी. फडक्यांमुळे मानधनाचा प्रश्न सुटला. सावरकरांनी मराठी लिपी टाईपरायटरवर येईले हे गृहीत धरून अ ची बाराखडी सुरू करण्याचा आग्रह धरला तो पुर्णत्वास नेला. तसे नंतर कोणी काय केले याचा अहवाल एकदा प्रकाशीत केला पाहिजे. त्या सबनीसांच्या एरंडाच्या गुर्हाळाचे प्रकाशन केले त्यापेक्षा हा अहवाल जास्त महत्वाचा आहे.
- साहित्य परिषद किंवा नाटय परिषद आपापल्या अध्यक्षांना वर्षभराचा असा काही कार्यक्रम देते का? कार्यक्रम दिला तर त्यांच्या फिरण्याची व्यवस्था केली जाते का? वर्षभर अध्यक्षांनी फिरायचे म्हटले तर त्यांना कार्यक्रम द्यावा लागेल. डॉ. सदानंद मोरे वर्षभरात खूप फिरले. अनेकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. बाकी आतापर्यंतचे अध्यक्ष किती फिरले? याचा तपशील नाही. ग्रामीण भागातील तरुण लेखक पुढे यावेत, त्यांनी कथा, कादंबरी, नाटकं लिहावीत आणि ते लिहिताना त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका अध्यक्षांनी घ्यावी. साहित्य संमेलनाच्या वर्षभराच्या कार्यकाळात किती नवीन लेखक, कवी पुढे आले? किती जणांची पुस्तके तयार झाली? किती जणांना प्रकाशक मिळाले? किती जणांच्या पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रम झाले ? या सगळ्या प्रश्नांचा आढावा साहित्य परिषदेने घ्यायला हवा. तसाच हिशोब नाट्य परिषदेने द्यावा. म्हणजे रंगमंचावरील राजकीय मोहरे बाजूला होवून खरे रंगकर्मी आणि साहित्यिक पुढे येतील.
Friday, February 26, 2016
राजकीय बाजारात अडकलेली संमेलने
मग काय राहुल गांधींची आरती करायची का?
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनबाबत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा उपहास करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे. देशात हिटलरचे राज्य निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मत माजी संरक्षण मंत्री, कुठले कुठले माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री असे सुशीलकुमार शिंदे बोलत आहेत. याचे सुशीलकुमार शिंदे यांना अतीशय दु:ख होते आहे. त्यांचा कायम हसरा चेहरा ही चिंता व्यक्त करताना अतीशय गंभीर झाला आहे. पण यातून सुशीलकुमारांची लाचारी प्रकट होते आहे.
- राहूल गांधी हे उपहास, थट्टा करण्यासाठीच जन्मले आहेत अशा अविर्भावात ते वागत असतात. मग थट्टेसाठी जन्म झालेल्या माणसाची थट्टा उपहास का होवू नये? आज राहूल गांधी ज्या वयाचे आहेत त्या वयात सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्रातील मंत्रीपद उपभोगले आहे. चांगला अभ्यास, वक्तृत्व त्यांच्याकडे आहे असा नावलौकीक आहे. मग या नावलौकीकाचा वापर सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधींची खुशामत करण्यासाठी घालवावी? सुशीलकुमार शिंदे यांना राहुल गांधी काही तरी माकडचेष्टा करतील आणि आपल्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करतील असे स्वप्न पडले काय?
- का करू नयेत राहूल गांधींच्या थट्टा, उपहास? काय चांगले काम केले आहे त्यांनी या देशासाठी? केवळ माझी आजी, माझा बाप, माझा आजोबा यांचे कर्तृत्व सांगण्यापलिकडे स्वत:चे असे राहुल गांधींकडे काय आहे? कोणत्या गुणांचे कौतुक केले पाहिजे त्यांचे? द्यावे याचे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी.
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही, पाकनीष्ठ लोकांच्या पंगतीत जावून बसणार्या, त्यांचे समर्थन करणार्या राहुल गांधींच्या आरत्या ओवाळाव्यात असे सुशीलकुमार शिंदे यांना वाटते काय? देशद्रोह्यांना पाठीशी घालून त्यांचे समर्थन करणार्यांचा सत्कार करावा अशी सुशीलकुमार शिंदे यांची अपेक्षा आहे काय? पाकीस्तान हा भारताचा तहहयात शत्रू आहे. त्या शत्रूच्या गोटातील आणि भारताला घातक असणार्या व्यक्तिंचे समर्थन करण्याचे काम राहुल गांधी करत असतील तर त्यांची थट्टा होणार नाही तर काय भारतरत्न म्हणून गौरवले पाहिजे अशी सुशीलकुमार शिंदे यांची अपेक्षा आहे काय? बस झाली ही लाचारी आता. जरा मराठी माणसाचा स्वाभीमान दाखवा आणि चेहर्यावर करारी भाव आणा.
- राहुल गांधींनी काय केले हो आजवर? माकडचेष्टा करण्यापलिकडे काही केले आहे काय? त्यांना माकड बनवण्याचे काम कॉंग्रेसच्या लोकांनीच केले आहे हे वेगळे. दोन वर्षांपूर्वी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ ग्रस्तांसाठी ऐन पावसात दौरा काढण्याचे महान काम राहुल गांधी यांनी केले होते. दुष्काळ जानेवारी ते जुलै पर्यंत होता. हे महाशय पाउस पडल्यावर आले. मग काय? रोजगार हमीची कामे आहेत काय? हे पाहण्यासाठी गेले तर तिथे बोगस माणसे उभी केली होती. रोजगार हमीच्या मजूरांना रोजच्या रोज पगार आणि धान्य द्यायचे असते. पण तीन महिने ते दिले गेले नाही. कॉंग्रेस राजवटीचा हा चेहरा प्रसारमाध्यमांपुढे येवू नये म्हणून कॉंग्रेसने आटापिटा केला. सगळ्या मजुरांना लपवून शाळेत बंद करून ठेवले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मजूर म्हणून उभे केले. त्यांनी अहवाल दिला, सगळं कसं छान चाललं आहे. हे पाहून राहुल गांधी खूष झाले. त्यांनीही चार पाट्या टाकण्याचे काम केले. पण प्रसारमाध्यमांपर्यंत ही बोगस मजूर आणि फसवेगिरीची बातमी पोहोचलीच. चांगले काम होते तर कॉंग्रेसला लोकसभा आणि विधानसभेत का पराभव पत्करावा लागला? ही थट्टा कोणी केली याचे उत्तर आता सुशीलकुमार शिंदे यांनी दिले पाहिजे. आपलेच कार्यकर्ते आपल्यालाच उल्लू बनवत आहेत आणि अशा पक्षाचे आपण उपाध्यक्ष, युवराज आहोत, पंतप्रधानपदाचे उमेदवार आहोत याचा राहुल गांधींना गौरव वाटतो का? मग त्याची थट्टा ही होणारच.
- विदर्भातील शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. त्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना भेटायला म्हणून राहुल गांधींनी दौरा केला. आत्महत्याग्रस्त शेतकर्याची पत्नी कलावतीबाई हीची त्यांनी कशी फसवणूक केली? तिच्या झोपडीत जावून जेवण केल्याचे फोटो छापले. प्रत्यक्षात घरचाच डबा नेलेला होता. तिला आश्वासने दिली आणि मते मिळवली. पण नंतर वार्यावर सोडून दिले. या माकडचेष्टा नाहीत काय? मग थट्टा होणारच.
- चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मुंबई दौरा केला तेव्हा मुंबई लोकलने प्रवास केला. घाटकोपर स्टेशनवर कारमधून उतरले आणि लोकलप्रवासाचे नाटक केले. एटीएममध्ये जावून पैसे काढले आणि रांगेत उभे राहून त्यांनी तिकीट काढले. पण या एका तिकीटावर शेकडो कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी फुकट प्रवास केला. त्यावेळी राहुल गांधी कॉंग्रेसचे खासदार होते. खासदाराला रेल्वेचा प्रवास फुकट असतो. त्यांना तिकीट काढण्याची गरज काय होती? तरीही काढले. ज्या कार्यकत्यार्ंंनी तिकीटे काढणे आवश्यक होते त्यांनी फुकट प्रवास केला. अशाप्रकारे देशाला बुडवणार्या नेत्याची काय आरती करायची?
नेत्यांचा सुकाळ अन विचारांचा दुष्काळ
- मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांना २५ हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. शेलार आणि त्यांच्या भाजपा कार्यकर्त्यांनी परवानगी नसताना स्वागताचे फलक (होर्डिंग) लावले होते. यावर एक याचिका दाखल झाली अन त्याची न्यायालयाने दखल घेतली. सामान्य माणूस जागरूक राहिला तर काय घडू शकते याचे हे उदाहरण आहे. नाहीतर अशा याचिका दाखल झाल्याच नसत्या.
- आज कायदा पाळला जावा अशा भावनेने समाजातील बहुतेक लोक वागत असतात. कारण हे लोक पापभिरू आहेत. ते कायदा पाळू इच्छित आहेत. कायद्याचे राज्य मानूनच ते काम करतात. पण अलीकडच्या काळात ज्यांना मस्ती आलेली आहे, अशी माणसे आणि त्यात प्रामुख्याने राजकीय नेते हे पैशांच्या जोरावर कायदा मोडू इच्छितात. मोडलेल्या कायद्याचे समर्थन करू इच्छितात आणि दंड झाला तर २५ हजार रुपयांचा दंड सहज भरूही शकतात. या देशातला बहुतेक पुढारी खिशात पैसे असल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे कायदा जुमानण्याची त्याला गरज भासत नाही. वाहतुकीची सिग्नल व्यवस्था वाहतूक सुरळीत राहण्याकरिता असते. पण सिग्नल तोडणारे बेफिकीर असतात. त्यांच्या खिशात भरपूर रक्कम असतात. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरी हे पोलिसांनाच दम देऊन सांगतात की, मुकाट्याने दंडाची पावती फाड.
- अलीकडच्या काळात पैसा जास्त झाल्यामुळे कायद्याचे महत्त्व वाटत नाही. कायदा तोडायची प्रवृत्ती बळावते. खिशात पैसा आल्यामुळे ‘आपले कोण काय वाकडे करू शकणार आहे?’ अशा मिजाशित जगणार्यांची संख्या वाढत चालली आहे. दुचाकीवर तीन-तीन लोकांना बसवून मिरवणारी मुलं जास्त आहेत. हे सगळे अगदी उघडपणे केले जाते. याचे कारण ‘कायद्याचा धाक नाही’. त्याचप्रमाणे ‘पैशांची मुजोरी’ हे दुसरे कारण आहे.
- फलक लावू नयेत असे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शेलार कंपनीने नवरात्र आणि दिवाळी उत्सवात शुभेच्छांचे फलक लावले. पण याविरोधात एका सामान्य नागरिकाने याचिका दाखल केली. पाच-सहा महिने पाठपुरावा केल्यावर कोर्टाची तारीख पडली आणि न्या. अभय ओक आणि न्या. चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठासमोर हा विषय सुनावणीला आला, तेव्हा या बेकायदेशीर होर्डिगचा पंचनामा या दोन्ही न्यायमूर्तीनी केला आणि आशीष शेलारांना दंड ठोठावला गेला. दंड झाल्यानंतर शेलारांनी दंड भरला. पण ‘आपण काही चूक केली आहे’ असे त्यांना त्याक्षणी वाटले नाही. न्यायालयाबद्दलची कसलीही फिकीर न वाटणे. यातूनच हा मस्तवालपणा निर्माण झाला.
- ‘मी नेता आहे, पुढारी आहे, आमदार आहे, मी कसाही वागू शकतो’ अशा भावनेत असे नेते वावरत असतात. त्यामुळे सामान्य माणसाला कायद्याच्या संरक्षणासाठी, त्याची जाणीव करून देण्यासाठी, याचिका दाखल करायला लागतात. या याचिकेमुळे अनेक विषय जनहिताचे ठरतात. म्हणून याचिका करणार्या जागरूक नागरिकांचे अभिनंदन केले पाहिजे.
- खरं तर आपले नेते आपल्याला आवाहन करतात आणि त्यांचे आपण ऐकत नाही यासारखा नेत्यांचा अपमान कुठला नसेल. राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना अनेकवेळा सांगितले आहे की माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावू नका. बॅनरबाजी करू नका. पण कोणी ऐकले नाही. आजही दरवर्षी १४ जूनला सगळ्या हायवेवर बॅनर दिसतातच. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही बॅनर लावू नका असे ते मुख्यमंत्री असताना अनेकवेळा सांगितलं होतं. पण वाशीपासून कराडपर्यंत त्यांच्या मार्गावर कॉंग्रेसचे असंख्य बॅनर पहायला मिळतात. आपल्याच नेत्यांचे कार्यकर्ते ऐकणार नसतील तर त्या नेत्यांचा विचार कसा काय जिवंत राहणार? त्यांना कसा काय जनाधार लाभणार? आदेश हा आदेश असतो. बाळासाहेब ठाकरे आदेश काढायचे. मातोश्रीवरून काढायचे. तो संपूर्ण मुंबईत पाळला जायचा. त्या आदेशाला डावलण्याची ताकद कोणात नव्हती. पण तसे आजच्या नेत्यांमध्ये नाही कारण नेते सपक झाले आहेत, उथळ झाले आहेत. आपल्या विचारांशी प्रामाणिक नाहीत. माणसाचं असंच आहे. लग्नाच्या पत्रिकेत कृपया आहेर आणू नये असे लिहीले तरी पाकीट घेवून मी घरचा आहे, माझ्याकडून घेतलाच पाहिजे असा आग्रह करणारे आगाउ लोक असतात. तसाच प्रकार नेत्यांबाबत असतो. वाढदिवसानिमित्त कोणताही बॅनर लावू नका असा आदेश काढला तरी शेकडो बॅनर ठिकठिकाणी लावले जातात. हा त्या नेत्यांचा आपण अपमान करतो आहोत हे का लक्षात येत नाह?
- कोणी नाना आणि कोण तात्या, कोणी आबा आणि कोणी बाबा अशी नावे माहीत नसलेल्या लोकांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आणि अनेकांना ‘कार्यसम्राट’ बनवले जाते. जो कोणी वाढदिवसाच्या दिवशी सम्राट होतो त्याचे नावही अनेकांना माहीत नसते. पण बॅनरमुळे एका रात्रीत हा ‘कार्यसम्राट’ गावभर झळकतो. काही ठिकाणी तर ३० वर्षाचा कार्यकर्ता आणि त्याचा ६० फुटांचा फोटो झळकतो. खाली शुभेच्छुकांची नावे असतात आणि त्यांचे फोटो असतात. त्यामुळे अशा या फलकांबाबतही सामाजिक कार्यकर्ते कोर्टात गेले आणि त्याने बंधने आणली. प्रश्न पडतो इतके बॅनरबाज नेते, सम्राट या देशात असताना देशाचे प्रश्न का सुटत नाहीत? दुष्काळावर मात का होत नाही? याचे कारण आपल्याकडे नेत्यांचा सुकाळ आणि विचारांचा दुष्काळ आहे.
शेतकरी, सामान्य माणसांवर अन्याय का?
- काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारामध्ये बँकांकडून मोठ्या उद्योगपतींची किती रकमेची कर्जे माफ केली गेली या विषयीची माहिती उघड झाली होती. या माहितीमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, मागील तीन आर्थिक वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी म्हणजेच सरकारी बँकांनी मोठ्या उद्योगपतींची १ लाख १४ हजार १८२ कोटी रुपयांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. सरकारी बँकांचा हा निर्णय कर्जबुडव्यांना अभय देणारा आहे. अशा निर्णयामुळे घातक पायंडे पडत आहेत.
- बड्या उद्योगपतींकरिता वेगळा न्याय आणि सामान्य माणसाला वेगळा न्याय ही सरकारी बँकाची भूमिका अत्यंत अन्यायकारक आहे. सामान्य माणसाने एखाद्या कारणासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यास विलंब झाला तर बँकेकडून त्याच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाते. दुचाकी, चारचाकी, घर, मुला-मुलींचे लग्न अशा अनेक कारणांसाठी सामान्य माणूस बँकांकडून कर्ज घेत असतो. कर्जाचे हप्ते थकले तर त्याला बँकेकडून केल्या जाणार्या कारवाईला सामोरे जावे लागते. सामान्य माणसाला जो न्याय लावला जातो तो बड्या उद्योगपतींना मात्र लावला जात नाही.
- राष्ट्रीयीकृत बँकांनी एकंदरीत २९ मोठ्या कंपन्यांची थकीत कर्जे माफ केली आहेत. मार्च २०१२ मध्ये सरकारी बँकांची १५ हजार ५५१ हजार कोटींची कर्जे अनुउत्पादक स्वरुपाची (एनपीए) समजली जात होती. आता हा आकडा ५२ हजार ५४२ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. सरकारी बँकांच्या थकीत कर्जांचे प्रमाण २०१३-२०१५ या दोन वर्षांत ६० टक्क्यांनी वाढले आहे. बड्या उद्योगपतींनी थकविलेल्या कर्जामुळे सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक या सरकारी बँकांना तोटा सहन करावा लागत असल्याचे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे.
- सरकारी बँकांनी बड्या उद्योगपतींवर महेर नजर दाखविल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात येते आहे हे वेगळे सांगायला नको. आज सामान्य माणूस किंवा सरकारने नवीन योजना काढल्या म्हणून उद्योगासाठी कर्ज मागायला गेला तर राष्ट्रीयीकृत बँका सहकार्य करत नाहीत. बँक ऑफ महाराष्ट्र ही सातारची अग्रणी अशी दत्तक बँक आहे. पण इथले अधिकारी रोजगाराबाबत तरूणांना, व्यवसाय सुरू करणार्यांना माहिती देत नाहीत. हाकलून लावतात. शेतकर्यांना तर दारातही उभे करत नाहीत. अशी सरकारी बँकांची अवस्था असताना राष्ट्रीयीकृत बँकांनी उद्योगपतीची कर्जे माफ करणे हा अन्याय आहे.
- बड्या थकबाकीदारांना जो न्याय लावला जातो तोच न्याय आम्हाला का लावू नये अशी विचारणा सामान्य माणसाने केली तर त्यात गैर काय? सरकारी बँकांचे भाग भांडवल हे सरकारच्या तिजोरीतून आलेले असते. म्हणजेच ते एक प्रकारे सर्वसामान्यांच्या कररूपी पैशातून जात असते. अशा बँकांचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने केले जात नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. खासगी बँकांचे व्यवस्थापन आपल्या कर्जाची वसुली करण्यासाठी ज्याप्रमाणे कठोर मेहनत घेते तशी मेहनत सरकारी बँकांचे अधिकारी घेत नाहीत.
- सरकारी बँकांचे अधिकारी फक्त पगाराला सोकावलेले असतात. ग्राहक मेला तरी त्याची पर्वा नसते. बँक ऑफ महाराष्ट्रचा अधिकारी मराठी का नसावा? शाहूपुरी करंजे शाखेतील अधिकारी बिहारी आहे. मग ही बँक ऑफ महाराष्ट्र कशी? इथली संस्कृती, इथल्या गरजा या लोकांना माहित नाहीत. चांगले ग्राहक कोण हे समजत नाही. भांडवलदारांसाठी बँकेची तिजोरी खुली केली जाते. पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे नजिकच्या राष्ट्रीय बँकेत रोजगारासाठी कर्जाची माहिती घ्या असे सांगितले जाते. पण त्या बँकेत फॉर्म नाही, माहिती पत्रक नाही, अधिकारी जागेवर नाही, हेड ऑफीसला जा असे सांगून पिटाळून लावले जाते.
- हा न्याय भांडवलदारांबाबत लागू होत नाही. सरकारचाच पैसा असल्यामुळे थकीत कर्जांबाबत अधिकारी वर्गात बेपर्वा वृत्ती आढळून येते. या वृत्तीमुळेच सरकारी बँका अडचणीत सापडल्या आहेत.
- सरकारी बँकांनी एक कोटी रुपयांवरील थकबाकीदारांची नावे जाहीर करावीत असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या पाच वर्षांतील पाचशे कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत असलेल्या कर्जदारांची माहिती द्यावी, असे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. काही वर्षांपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी दिली गेली होती. या कर्जमाफीबद्दल, प्रसारमाध्यमांनी, अर्थतज्ज्ञांनी अगदी शंख केला होता. शेतकर्यांना जेवढी कर्जमाफी दिली गेली त्याहीपेक्षा मोठ्या रकमेची कर्जमाफी बड्या उद्योगपतींना दिली गेली आहे. आजवर बड्या उद्योगपतींना सरकारी पातळीवरून अभय दिले गेले होते. त्यामुळेच बॅँकांचे व्यवस्थापन अशा उद्योगपतींना कायम पाठीशी घालत होते. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर या धोरणात बदल होईल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारी बँकांची कर्ज थकविणार्या बड्या उद्योगपतींना संरक्षण दिले जाणार नाही हे मोदी सरकारने आता स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरकारी तिजोरीतून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अर्थसाह्य केले जाते. सरकारी पैसा असल्यामुळे थकीत कर्जांची चिंता करण्याचे आपल्याला कारणच नाही अशा भूमिकेत बँकेचे व्यवस्थापन आणि सत्ताधारी वागत असतात. हा पायंडा मोदी सरकारच्या काळात बदलला जाण्याची अपेक्षा आहे.
Tuesday, February 16, 2016
दहशतवादाचा चेहरा समोर आला
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठावरून तथाकथीत पुरोगाम्यांनी आणि कॉंग्रेसने जो तमाशा मांडला आहे यावरून या देशात कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांइतके दहशतवादी दुसरे कोणी नसतील असेच स्पष्ट होताना दिसते आहे.
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाची सर्व बाजूने योग्यरित्या चौकशी करत आहेत. पण या प्रकरणात राजकारण आणून कॉंग्रेस आणि डावे पक्ष हे दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहेत. यामुळे दहशतवाद हा कॉंग्रेसचा खरा चेहरा असल्याचे स्पष्ट आहे. डाव्यांनी नक्षलवाद आणि कॉंग्रेसने दहशतवाद जोपासल्याचे स्पष्ट आहे.
- दहशतवादी अफजल गुरूला झालेल्या फाशीच्या विरोधात जेएनयूतील काही विद्यार्थ्यांच्या समूहाने फाशीचा निषेध करणार्या सभेचे आयोजन केले होते. इतर काही संघटनांनी त्यास विरोध दर्शविल्याने जेएनयूमध्ये वाद निर्माण झाले. त्यावेळी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेल्या ‘जेएनयू’मधील विद्यार्थी संघटनांचा प्रमुख असलेल्या कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. भारतविरोधी कारवाया करणार्या याच कन्हैय्याकुमारची पाठराखण करण्याकरीता कालपर्यंत पप्पू असलेले पोरकट युवराज राहुल गांधी धावून येतात. कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद आपल्याकडे आहे, आपण स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करतो आणि देशद्रोही दहशतवादी यांना समर्थन देतो? राहुल गांधींच्या या भूमिकेचा सर्व स्तरावर निषेध होणे गरजेचे आहे.
- ज्या अफझल गुरूच्या समर्थनार्थ हा प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडला आणि ज्याचे समर्थन राहुल गांधींनी केले त्या राहुल गांधींना देशाने प्रश्न विचारला पाहिजे की लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुका जवळ आल्यावर त्यांच्याच कॉंग्रेस सरकारने मग अफझल गुरूला फाशी का दिली? सुशीलकुमार शिंदे यांनी केविलवाणा हासरा चेहरा करत अफझल गुरूला फाशी दिल्याचे गुप्त ठेवले आणि कसे कोणाला कळू न देता फाशी दिली याबाबत सरकारचे कौतुक का केले होते? म्हणजे अफझल गुरूच्या फाशीचा वापर केवळ कॉंग्रेसने निवडणुकीत या देशाची सहानुभूती मिळवण्यासाठी केला होता काय? तेव्हा अफझल गुरूला फाशी दिली आणि आता त्याला फाशी दिली म्हणून शोक करणार्या लोकांचे समर्थन करणार असाल तर राहुल गांधींचा मेंदू डोक्याऐवजी गुडघ्यात आहे असा अर्थ घ्यायचा काय?
- ज्या कोणा कन्हैय्याने भारत विरोधी घोषणा दिल्या त्याचे समर्थन करणे म्हणजे राहुल गांधींनी देशविरोधी कृत्य करण्याचा हा प्रकार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील त्या माथेफिरूंनी सुरवातीला पाकीस्तान झिंदाबाद नावाच्या घोषणा दिल्या. त्या एकवेळ मान्य केल्या जातील. पण भारत विरोधी घोषणा देण्याचा अर्थ काय होतो? अशा दहशतवादी तरूणांना अटक केली म्हणून राहुल गांधी गळा काढतात? डावे पक्ष त्यांना समर्थन देतात? काय देशद्रोही आहात काय सगळे? ज्या राहुल गांधींना आपल्या बापाचा म्हणजे देशाच्या माजी पंतप्रधानाचा खून झाला त्यांना फाशी द्यावीशी वाटत नाही, त्यांना सोडून देण्यासाठी मायलेकरे धडपडतात, त्यांनाच आता अफझल गुरूचा पुळका आलेला आहे. भारत विरोधी घोषणा देणार्यांचे समर्थन करण्यात धन्यता मानतात. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे काय? या देशातील कोणतेही पद भुषवण्याचा अधिकार आहे काय? कॉंग्रेसचे नेते लाचारपणे जर राहुल गांधींच्या या कृत्याचे समर्थन करणार असतील तर त्यांच्याइतके बुळगे आणि शामळू कोणी नाही असेच म्हणावे लागेल. एकातही कॉंग्रेसचे नेतृत्व करण्याची धमक नाही आणि राहुल गांधींसारख्या मूर्ख पप्पूला हटवण्याची ताकद नसेल तर कॉंग्रेस बंद करून टाकली पाहिजे.
- ज्या अफझल गुरूने संसदेवर हल्ला केला, देशाच्या लोकशाहीच्या मंदीरावर ज्याने हल्ला केला त्याचा पुळका घेणार्या राहुल गांधींना देशाने प्रश्न विचारला पाहिजे या संसदेवरील हल्ल्यालाही तुमचे समर्थन होते का? तेव्हा संसदेत भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यामुळे कॉंग्रेसनेच या दशतवादाला पोसून हा हल्ला घडवला होता काय? कॉंग्रेसच्या या पापकृत्याचे पुरावे अफझल गुरू समर्थकांकडे असल्यामुळे कॉंग्रेंस नेत्यांना ते वाकवत आहेत काय? अफझल गुरूच्या पाठोपाठ राहुल गांधी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आगामी काळात अजमल कसाबची जयंती पुण्यतीथी साजरी करणार का? त्याच्यावरून देशात रणकंदन माजवणार का? देशात दंगली घडवण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात हे खूळ आले आहे काय? अशा प्रवृत्तींचे समर्थन डावे पक्ष करणार काय?
- किती दुष्ट आणि विषारी आहेत या कॉंग्रेसच्या प्रवृत्ती? त्यांना वेळीच ठेचले नाही तर या देशाचे असंख्य तुकडे पडल्याशिवाय राहणार नाहीत. कॉंग्रेस हाच दहशतवादाचा चेहरा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
सकारात्मकतेकडे दुर्लक्ष झाले
दहशतवाद आणि जेहादचा नवा चेहरा असलेल्या इसिसचे भूत आता जगाच्या मानगुटीवर पक्के बसले आहे. पंधरा वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या अल कैदाने जे केले होते ते नव्याने आता उगवताना दिसते आहे. त्यातून भारताला अलिप्त रहाता येईलच असे नाही. युरोपातील अनेक देशात सुखवस्तू जीवन जगलेल्या व तिथेच जन्म घेतलेल्या अनेक मुस्लिम तरूणांनाही इसिसच्या जिहादचे आकर्षण वाटले आहे. भारतातही मुंबई ठाणे येथील मुंब्रा आणि अन्य भागातून, तसेच पुणे आणि देशातील अनेक काना कोपर्यात हे विषारी बीज पसरत चाललेले दिसते आहे. भारतासारख्या गरीब व विषमतेने भरलेल्या देशात मुस्लिम तरूण जिहादकडे आकर्षित होणे हे अशक्य अजिबात नाही. म्हणून तर गेल्या वर्षी प्रथमच मुंबई नजिकच्या कल्याण शहरातले चार तरूण इराकला इसिसच्या युद्धात सहभागी व्हायला गेल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. अशावेळी त्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी फक्त चर्चा आणि फालतू मसलतीत वेळ दवडला गेला. तात्विक आणि बौद्धिक चर्चेलाच प्राधान्य मिळत राहिले आणि समस्या जशीच्या तशी राहिली. कालांतराने ती अधिकच भीषण रुप धारण करत गेली.
परिस्थिती अशी आहे की एका बाजूला मुस्लिम नाराजांच्या मनात विष पेरण्याचा उद्योग कट्टरपंथीय करत होते आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या दुर्दशेबद्दल बोलून बुद्धीवादी हिंसेला चुचकारत बसलेले होते. जगभरात हेच चालले होते. अगदी भारतातली स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. पुरोगामी या शब्दाच्या नावाखाली वाटेल ते बरळणार्यांचे सध्या प्रस्थ फार वाढत चालले आहे. ते अशा दहशतवादाला कुरवाळत बसताना दिसू लागले.
कोणत्याही समस्येचे आकलन करून त्यावरचे वास्तविक परिणामकारक उपाय शोधण्यापेक्षा जगभऱचे शहाणे, डाव्या आणि मानवतावादी विचारांच्या नावाखाली स्वत:ला विचारवंत, थोर विचारवंत, ज्येष्ठ विचारवंत, चिकीत्सक, अभ्यासक, विश्लेषक, समीक्षक अशा नावांनी ओळखले जाणारे चुकीची मते पसरवत राहिले. हे लोक नुसते कोणाच्या तरी डोक्यावर खापर फ़ोडण्यात धन्यता मानत होते. त्याचा लाभ हे लोक मिळवताना दिसत आहे.
अफ़गाण असो किंवा इराक-सिरीया असो, तिथल्या जिहादी हिंसाचाराचे खापर अमेरिका किंवा अन्य कुणावर फ़ोडून काहूर माजवले जाते. त्यामुळे जिहादचा भस्मासूर बोकाळत गेलेला आहे.
याशिवाय दुसरी बाजू राजकीय आहे. दहशतवादाला धर्म नसतो, असे टुमणे लावले जाते आणि मग तेच सत्य ठरवण्यासाठी शाब्दिक कसरती सुरू होतात. जबाबदार म्हणून राज्यकर्ते वा सरकारवर खापर फ़ोडले जाते. पण हे खापर फोडताना तथाकथीत विचारवंत हे पायरी सोडून वागतात, अशा वाईट प्रवृत्तींना नकळतपणे गोंजारत राहतात, असेच आजवर दिसून आले आहे. प्रत्येकवेळी सरकाला जबाबदार धरायचे पण सरकारच्या काही मर्यादा असतात याचे भान या व्यक्ती ठेवत नाहीत.
प्रत्येकाच्या घरात जाऊन तिथे काय हालचाली होत आहेत, याकडे सरकार वा पोलिस नजर ठेवू शकत नाहीत. ते जागरुक नागरिकांचे काम आहे. प्रामुख्याने कुटुंब व परिवाराचे काम आहे. गेल्या वर्षी कल्याणचे चार मुस्लिम तरूण इराकला इसिसमध्ये सहभागी व्हायला गेलेले होते. त्याची पहिली खबर त्यांच्या कुटुंबियांनीच पोलिसांना दिलेली होती. अर्थात हे तरूण बेपत्ता होईपर्यंत त्यांच्या कुटुंबालाही त्यांच्या हेतूविषयी काही अंदाज नव्हता. पण जेव्हा सत्य उमजले, तेव्हा त्यांनीच पोलिसांकडे पहिली धाव घेतली हे विसरता कामा नये. त्यामागची भावनाही ओळखली पाहिजे.
आपल्या मुलांनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये, म्हणून ते पालक स्वेच्छेने पुढे आलेले होते आणि पोलिस कारवाईत आपलीच मुले तुरूंगात जातील, ह्याची कल्पना असतानाही पालकांनी ते धाडस दाखवलेले होते. पण या गोष्टीचे कुठेही ना मिडीयाने कौतुक केले ना विचारवंतांनी केले. आज अशा पालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळवण्याची गरज आहे.
या घटनेनंतर गेल्या काही महिन्यांत कोणी अशा पालकांना वा कुटुंबियांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे काय? अनेक तरूण मुस्लिम जिहादमध्ये सहभागी झालेही असतील, पण काही कुटुंबियच त्याची माहिती द्यायला पुढे सरसावले नाहीत हे सत्य आहे. हे असे का घडले हे तथाकथीत विचारवंतांनी समजून घेतले पाहिजे. आज भारताले मुस्लिम इसिस वा जिहादमध्ये सहभागी व्हायला जातात, ही नकारात्मक बाजू असेल. पण त्यातल्याच काहींचे पालक त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतात, ही त्याचीच सकारात्मक बाजू आहे. पण यातील सकारात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमे, राज्यकर्ते, समाजधुरीण, विचारवंत, पुरोगामी, डावे उजवे मधले सगळेच कमी पडले हे लक्षात घेतले पाहिजे.
यांना आपल्या देशाचे कसे म्हणायचे?
- गद्दार आणि फितुरांचा बंदोबस्त करणे केव्हाही गरजेचे असते. छत्रपती शिवरायांनी नेमके तेच केले म्हणून ते उत्तम राजे ठरले. सूर्याजी पिसाळसारख्या प्रवृत्तींचा त्यांनी बंदोबस्त केला म्हणून राजे महान झाले. हे आत्ताच्या राज्यकर्त्यांना कधी कळणार? आज जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यासारखे भोंदु पुरोगामी हे देशाला घातक आहेत. त्यांच्यापेक्षा सरळ समोर ठाकलेला शत्रू परवडला. म्हणजे डेव्हीड कोलमन हेडली हा फ़सवा माणूस आहे. तो अमेरिकेसह पाकिस्तानचा एकाच वेळी हस्तक होता. आपल्या बोलवित्या धन्यालाही फ़सवत होता. म्हणून आता त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल सध्या पुरोगाम्यांनी उभा केला आहे. असे तर्क करण्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडांसारखे नेत चलाख आहेत. हा चटकन पटणारा असाच हा तर्क आहे. पण ज्यांची बुद्धी शाबुत आहे आणि डोके ठिकाणावर आहे, त्याला असे तर्क फ़सवू शकत नाहीत.
- इशरतचे पुरस्करर्ते जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर, निखिल वागळे, नबाब मलिक असे सेक्युलर या गोतावळ्यात अनेक आहेत. त्यांनीच आपल्या या देशप्रेमी इशरतसाठी हेडलीला चुकीचे ठरविण्याचा हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हेडलीचा खरेपणा सिद्ध करण्यापेक्षा, इशरतच्या खरेपणाविषयी उलटे प्रश्न केले पाहिजेत. त्यात नेहमी पुढाकार घेणार्या राष्ट्रवादी आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी तेव्हा नरेंद्र मोदी व भाजपावर बेछूट आरोप केलेले होते. अर्थात बेछूट आरोप करण्यासाठी फक्त तोंड आणि जिभ असली की भागते. त्यासाठ पुराव्याची अभ्यासाची काहीच गरज नसते. पण आता त्याच त्यांच्या जिभेने चांगले तोंड सडकले आहे. तरीही पडलो तर नाक वर आणि नाक कापलं तरी अजून भोकं आहेतच अशी आव्हाडांची परिस्थिती आहे. त्यामुळे केविलवाणी धडपड त्यांची सुरू आहे.
- आता आव्हाड, कुमार केतकर, निखिल वागळे ही भोंदु माणसे अशा चर्चेसाठी पुढे येणार नाहीत. कारण त्यांच्या चॅनेलचा मालकही आता तुरूंगात गेल्यामुळे यांची पुरती बेअब्रू झाली आहे. कोणाच्या शेजेवर हे इतके दिवस पैसे कमवण्यासाठी झोपत होते हे समोर आले आहे.
- हेडलीने साक्ष दिल्यावर आता या कंपूला अभ्यासाची गरज भासू लागली आहे. ज्यांना खोट्यावर विश्वास ठेवायची दुर्बुद्धी होते, त्यांना हल्ली सेक्युलर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुरोगाम्यांना जे काही खोटे वाटते, त्यावर निखळ सत्य म्हणून विश्वास ठेवायची वेळ आता आली आहे. या आव्हाड, केतकर, वागळे, हेमंत देसाई, जतीन देसाई, नबाब मलिक अशा कंपुमुळे या देशात पुन्हा एकदा विभाजन होणार काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैशासाठी वाटेल ते करण्याची यांची प्रवृत्ती आणि गोबेल्स नितीचा वापर करून पुरोगामी नावाच्या गोंडस शब्दाखाली स्वत:चा लाळघोटेपणा झाकण्याचे काम हे लोक करत आहेत. पण हे देशाशी गद्दारी करत आहेत. लष्करे तोयबाच्या इशरत जहाची भलावण, पाठराखण करत आहेत. त्यांच्यावर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत.
- असे अनेकवेळा या देशद्रोही कंपूने केलेले आहे. बडोदा बेस्ट बेकरीच्या विषयात जाहिरा शेख हिने पहिल्या कोर्टात आपली जबानी फ़िरवली होती. तेव्हा तिच्यावर दबाव आणला गेला, असा गदारोळ करून टाहो फ़ोडला गेला. पण पुढल्याच खटल्यात तीच जाहिरा शेख साक्ष फ़िरवू लागली तेव्हा तिला खोटारडी ठरवायला हेच लोक पुढे आले होते. त्याच बडोदा जळीतकांडात जिचे तमाम नातलग जळून भस्मसात झाले, त्या जाहिराला खोटी पाडून वर्षभर तुरूंगात पाठवण्याला हे लोक पुरोगामीत्व म्हणतात. जाहिरा यांच्या तालावर नाचत होती तोवर खरी होती आणि विरुद्ध बोलू लागली मग खोटी पाडली गेली. ही या गद्दार भोंदू पुरोगामी कंपूची लायकी आहे.
- आज यांची अवस्था अशी आहे की या गद्दार, देशद्रोही पुरोगामी चेहरा दाखवू पाहणार्या टोळीच्या विरोधात जो बोलेल किंवा त्यांचे पितळ उघडे पाडेल तो खोटा, हाच त्यांचा निकष आहे. ज्यांना खोटेच सत्य म्हणून लोकांच्या गळी मारायचे असते, त्यांना सत्य पटवण्याची गरज नसते. पण आज अझर मसूद, अफझल गुरू, कसाब, हेडली यांच्यापेक्षा घातक आणि देशद्रोही कोण आहेत असा कोणी प्रश्न केला तर या कंपूची नावे द्यावीच लागतील. कारण यांना भारत या देशाशी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे खिसे भरण्यासाठी कुठल्याही मार्गाने पैसा मिळाला की झाला. त्यामुळे कोणाच्याही नावाचा टिळा लावायला सोकावलेल्या या वारांगनाच आहेत. म्हणजे पाकिस्तानची भाषा हे लोक बोलतात याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्या देशात आपण या पाकीस्तानी लोकांना थारा देतो आहोत हे किती धोक्याचे आहे? यापेक्षा अणूबॉंब वेगळा नाही. मुंबई हल्ल्यानंतर आजपर्यंत कित्येक पुरावे आणि साक्षी पाकिस्तानला भारताने पाठवल्या आहेत. त्याचा काही उपयोग होऊ शकला आहे काय? कितीही पुरावे द्या, ते भक्कम नाहीत किंवा विश्वासार्ह नाहीत, हीच टकळी पाकिस्तानकडून वाजवली जाते आहे ना? तोच प्रकार ही आव्हाड, वागळे, केतकर ही देशद्रोही माणसे करत आहेत. त्यांना अटक का केली जावू नये असा सामान्यांना आता प्रश्न पडला आहे. त्यामुळे हेडली परवडला पण हा कंपू नको अशी परिस्थिती सध्या आहे. देशाशी गद्दारी करणार्या लोकांची पाठराखण करणार्या या लोकांना आपले कसे म्हणायचे?
- गद्दार आणि फितुरांचा बंदोबस्त करणे केव्हाही गरजेचे असते. छत्रपती शिवरायांनी नेमके तेच केले म्हणून ते उत्तम राजे ठरले. सूर्याजी पिसाळसारख्या प्रवृत्तींचा त्यांनी बंदोबस्त केला म्हणून राजे महान झाले. हे आत्ताच्या राज्यकर्त्यांना कधी कळणार? आज जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यासारखे भोंदु पुरोगामी हे देशाला घातक आहेत. त्यांच्यापेक्षा सरळ समोर ठाकलेला शत्रू परवडला. म्हणजे डेव्हीड कोलमन हेडली हा फ़सवा माणूस आहे. तो अमेरिकेसह पाकिस्तानचा एकाच वेळी हस्तक होता. आपल्या बोलवित्या धन्यालाही फ़सवत होता. म्हणून आता त्याच्या साक्षीवर किती विश्वास ठेवायचा, असा सवाल सध्या पुरोगाम्यांनी उभा केला आहे. असे तर्क करण्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडांसारखे नेत चलाख आहेत. हा चटकन पटणारा असाच हा तर्क आहे. पण ज्यांची बुद्धी शाबुत आहे आणि डोके ठिकाणावर आहे, त्याला असे तर्क फ़सवू शकत नाहीत.
- इशरतचे पुरस्करर्ते जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर, निखिल वागळे, नबाब मलिक असे सेक्युलर या गोतावळ्यात अनेक आहेत. त्यांनीच आपल्या या देशप्रेमी इशरतसाठी हेडलीला चुकीचे ठरविण्याचा हा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हेडलीचा खरेपणा सिद्ध करण्यापेक्षा, इशरतच्या खरेपणाविषयी उलटे प्रश्न केले पाहिजेत. त्यात नेहमी पुढाकार घेणार्या राष्ट्रवादी आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी तेव्हा नरेंद्र मोदी व भाजपावर बेछूट आरोप केलेले होते. अर्थात बेछूट आरोप करण्यासाठी फक्त तोंड आणि जिभ असली की भागते. त्यासाठ पुराव्याची अभ्यासाची काहीच गरज नसते. पण आता त्याच त्यांच्या जिभेने चांगले तोंड सडकले आहे. तरीही पडलो तर नाक वर आणि नाक कापलं तरी अजून भोकं आहेतच अशी आव्हाडांची परिस्थिती आहे. त्यामुळे केविलवाणी धडपड त्यांची सुरू आहे.
- आता आव्हाड, कुमार केतकर, निखिल वागळे ही भोंदु माणसे अशा चर्चेसाठी पुढे येणार नाहीत. कारण त्यांच्या चॅनेलचा मालकही आता तुरूंगात गेल्यामुळे यांची पुरती बेअब्रू झाली आहे. कोणाच्या शेजेवर हे इतके दिवस पैसे कमवण्यासाठी झोपत होते हे समोर आले आहे.
- हेडलीने साक्ष दिल्यावर आता या कंपूला अभ्यासाची गरज भासू लागली आहे. ज्यांना खोट्यावर विश्वास ठेवायची दुर्बुद्धी होते, त्यांना हल्ली सेक्युलर म्हणून ओळखले जाते. म्हणूनच पुरोगाम्यांना जे काही खोटे वाटते, त्यावर निखळ सत्य म्हणून विश्वास ठेवायची वेळ आता आली आहे. या आव्हाड, केतकर, वागळे, हेमंत देसाई, जतीन देसाई, नबाब मलिक अशा कंपुमुळे या देशात पुन्हा एकदा विभाजन होणार काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैशासाठी वाटेल ते करण्याची यांची प्रवृत्ती आणि गोबेल्स नितीचा वापर करून पुरोगामी नावाच्या गोंडस शब्दाखाली स्वत:चा लाळघोटेपणा झाकण्याचे काम हे लोक करत आहेत. पण हे देशाशी गद्दारी करत आहेत. लष्करे तोयबाच्या इशरत जहाची भलावण, पाठराखण करत आहेत. त्यांच्यावर आता देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत.
- असे अनेकवेळा या देशद्रोही कंपूने केलेले आहे. बडोदा बेस्ट बेकरीच्या विषयात जाहिरा शेख हिने पहिल्या कोर्टात आपली जबानी फ़िरवली होती. तेव्हा तिच्यावर दबाव आणला गेला, असा गदारोळ करून टाहो फ़ोडला गेला. पण पुढल्याच खटल्यात तीच जाहिरा शेख साक्ष फ़िरवू लागली तेव्हा तिला खोटारडी ठरवायला हेच लोक पुढे आले होते. त्याच बडोदा जळीतकांडात जिचे तमाम नातलग जळून भस्मसात झाले, त्या जाहिराला खोटी पाडून वर्षभर तुरूंगात पाठवण्याला हे लोक पुरोगामीत्व म्हणतात. जाहिरा यांच्या तालावर नाचत होती तोवर खरी होती आणि विरुद्ध बोलू लागली मग खोटी पाडली गेली. ही या गद्दार भोंदू पुरोगामी कंपूची लायकी आहे.
- आज यांची अवस्था अशी आहे की या गद्दार, देशद्रोही पुरोगामी चेहरा दाखवू पाहणार्या टोळीच्या विरोधात जो बोलेल किंवा त्यांचे पितळ उघडे पाडेल तो खोटा, हाच त्यांचा निकष आहे. ज्यांना खोटेच सत्य म्हणून लोकांच्या गळी मारायचे असते, त्यांना सत्य पटवण्याची गरज नसते. पण आज अझर मसूद, अफझल गुरू, कसाब, हेडली यांच्यापेक्षा घातक आणि देशद्रोही कोण आहेत असा कोणी प्रश्न केला तर या कंपूची नावे द्यावीच लागतील. कारण यांना भारत या देशाशी काहीही देणेघेणे नाही. स्वत:चे खिसे भरण्यासाठी कुठल्याही मार्गाने पैसा मिळाला की झाला. त्यामुळे कोणाच्याही नावाचा टिळा लावायला सोकावलेल्या या वारांगनाच आहेत. म्हणजे पाकिस्तानची भाषा हे लोक बोलतात याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आपल्या देशात आपण या पाकीस्तानी लोकांना थारा देतो आहोत हे किती धोक्याचे आहे? यापेक्षा अणूबॉंब वेगळा नाही. मुंबई हल्ल्यानंतर आजपर्यंत कित्येक पुरावे आणि साक्षी पाकिस्तानला भारताने पाठवल्या आहेत. त्याचा काही उपयोग होऊ शकला आहे काय? कितीही पुरावे द्या, ते भक्कम नाहीत किंवा विश्वासार्ह नाहीत, हीच टकळी पाकिस्तानकडून वाजवली जाते आहे ना? तोच प्रकार ही आव्हाड, वागळे, केतकर ही देशद्रोही माणसे करत आहेत. त्यांना अटक का केली जावू नये असा सामान्यांना आता प्रश्न पडला आहे. त्यामुळे हेडली परवडला पण हा कंपू नको अशी परिस्थिती सध्या आहे. देशाशी गद्दारी करणार्या लोकांची पाठराखण करणार्या या लोकांना आपले कसे म्हणायचे?
व्हॅलेंटाईन रूजला या देशात
- आज बहुचर्चित व्हॅलेंटाइन डे आहे. आता हा सण रूळला आपल्यात. सुरवातीला विरोध झाला, टिका झाला पण हळूहळू तो अंगवळणी पडला. चायनीज पदार्थांना नावे ठेवणारे आणि नूडल्सना दानवी म्हणून किळसवाणी तोंडे करणारी जशी चायनीज डीशवर ताव मारू लागले आहेत. तसाच आता व्हॅलेंटाईन डे अंगवळणी पडला आहे.
- या दिवसाची तयारी आठवडा-दहा दिवस आधीपासूनच सुरू होते. तशी ती यंदाही झाली. दुकानाच्या शोकेसेसमध्ये लाल, गुलाबी रंगाची फुग्याची हृदये झळकू लागली आहेत. मोठमोठे आणि आकर्षक ग्रीटिंग कार्डस्ही लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळ्या उंची हॉटेलांच्या तितक्याच फॅन्सी रेस्तरॉंमध्ये जागांचे बुकिंग केले जात आहे.
- आता तर व्हॅलेंटाईन डे ची सुरूवात आठवडाभर अगोदर वेगवेगळे सण साजरे करून केली जाते. म्हणजे नवरात्रात जसे नउ रंगाचे कपडे साड्या घातल्या जातात तसे अगोदर आठवडाभर हे दिवस साजरे होत आहेत. कधी चॉकलेट डे, कधी रोझ डे, कधी हग डे वगैरे. या हग डे दिवशी शाळा कॉलेजातून मुले मुली हागत असतात ( मिठ्या मारत असतात) तेव्हा गम्मत वाटते. म्हणजे हस्तांदोलनापासून सुरू झालेली विलायती संस्कृती मिठ्या मारेपर्यं पोहोचली आहे.
- या दरम्यान गेल्या आठवड्यात तरुणींच्या नव्या आकर्षक डिझाईन्सच्या कपड्यांची रेलचेल आहे. मुंबई सारख्या महानगरात तर हा सण म्हणजे पर्वणीच असते. तिथले डिस्को थेकचे बुकिंगही दोन तीन दिवसांपूर्वीच संपले आले. म्हणजे आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या स्वागतासाठी सगळेजण किती सज्ज झालेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
- त्यामुळे अशा उत्साहात मिठाचा खडा टाकून सारे दूधच नासवण्यात कमालीचा आंबट आनंद घेण्याची सवय काही मंडळींना जात्याच असते. ते लोक याला विरोध केल्याशिवाय रहात नाहीत. होवू देत ना आमची संस्कृती नष्ट, कोणाला काय पडले आहे? कोणीतरी चावटपणे सांगतो की आजचा दिवस म्हणे मातृदिन म्हणून साजरा करा. काही रसिकता, प्रेम आहे की नाही? आणि आईबापाचे प्रेम हे काय एक दिवस गौरवण्याइतके कमी आहे काय? ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमिकांचा दिवस आहे. आपले प्रेम व्यक्त करून ते साजरे करण्याची ही एक अधिकृत आणि आधुनीक प्रकारची संधी आहे. त्यामुळेच जगभरच लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट आणि बाजीराव-मस्तानी आजच्या दिवशी जर आपले प्रेम व्यक्त करू इच्छित असतील तर कुणाला पोटशूळ जडण्याची खरे तर काही गरज नाही. पण तरीही काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना अचानक हा विकार जडतोच आणि खोकल्याची उबळ जितकी दाबावी तितकीच अधिक उफाळून वर येते तसा प्रकार घडतो. काही वषार्र्ंपूर्वी शिवसेनेला आपले हिंदुत्व आठवायचे आणि आर्चिजसारख्या शोरूमवर हल्ले करायचे प्रकार व्हायचे. पण आता त्यांचा उत्साह थंडावला आहे. त्यांना बहुदा भाजपशी प्रेमविवाह आणि राष्ट्रवादीबरोबर लफडे केल्यामुळे हा दिवस आवडू लागला असावा.
- पण काही असो, या संस्कृतीरक्षकांचे म्हणणे असे की, ‘व्हॅलेंटाईन डे’ हा काही भारतीय संस्कृतीचा सण नाही. मग तो आपण का व कसा साजरा करायचा? युरोपातल्या कुणा एका सेंट ‘व्हॅलेंटाईन’च्या स्मृत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. हा संत म्हणे प्रेमवेड्यांची व ‘चुपके चुपके’ प्रेम करून नंतर विरहाचे उष्म उसासे टाकणार्यांचे विवाह लावून देई. भारतात असा कुणी ‘व्हॅलेंटाईन’ जन्माला आला नाही. त्यामुळे त्याचे स्मरण करण्याचे आपल्याला काय कारण?
- मग तसा विचार केला तर येशू ख्रिस्त कुठे भारतात जन्माला आला? त्याच्या धर्माचा प्रसार भारतात सुरू झाला तो पंधराव्या शतकात वास्को द गामा भारतात आला त्यानंतरच. त्याला सुळावर चढवण्याचे पापकृत्यही कुणा भारतीयाने केले नाही. हे जर खरे असेल तर दर २५ डिसेंबरला आपण ख्रिसमस म्हणजेच नाताळ का साजरा करावा? १ जानेवारी हे भारतीय संस्कृतीचे नववर्ष नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर हा दिवस वर्षाखेरचा नाही. तरीही आपण ३१ डिसेंबरला ‘न्यू इयर पार्टी’ न चुकता का साजरी करतो?
- आपल्याला ‘व्हॅलेंटाईन डे’ला नक्की कोणते रूप अभिप्रेत आहे? प्रेमाचे एक रूप म्हणजे माया. दुसरे ममता आणि आणखी एक रूप म्हणजे वासना. यातील वासनेमध्येही प्रेमाचा एक अंश दडलेला असतोच. पण ‘व्हॅलेंटाईन डे’ला तो अभिप्रेत नाही. प्रेम ही अत्यंत तरल आणि शब्दांच्या तुरुंगात बंदी न होऊ शकणारी संकल्पना आहे. तरुणीचे तरुणावर वा तरुणाचे तरुणीवर खरेच प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी हा एकच दिवस कशासाठी? ते सदैव व्यक्त होतच राहायला हवे. सच्चे प्रेम हे असे स्थळ, काळाची वाट न पाहता व भीती न बाळगता समुद्राच्या भेटीसाठी डोंगर कड्यांतून नदी सुसाट वाहत सुटावी व समुद्राच्या विशाल जलाशयात तिने आपले अस्तित्वही मिटवून टाकावे तसे असते. त्याला कोणतेही बंधारे फार काळ अडवू शकत नाहीत. ‘व्हॅलेंटाईन डे’ला अपेक्षित प्रेम हे असे अनावर असावे. ‘व्हॅलेंटाईन डे’ असो वा नसो, त्यासाठी कुणी नाके मुरडो वा कुणी प्रेमाची आलिंगने देवोत, एक नक्की ‘प्रेम’ अमर असते. कारण प्रेम भावना शाश्वत व अमरही आहे. प्रेमानेच जग जिंकता येते.
आपले कोण भुजबळांना समजले नाही
- अमेरिकेहून परतल्यावर छगन भुजबळ यांनी आपले शक्तीप्रदर्शन करण्याचा विमानतळावरच प्रयत्न केला. यावेळी सत्य समोर येईलच अशी भाषा भुजबळांनी केली असली, तरी त्यातले नेमके सत्य काय याची उत्सुकता आता आहे. कारण शरद पवार नेहमी आपल्या भाषणात म्हणत की कॉंग्रेसचा पराभव कॉंग्रेसच करू शकतो बाकी कोणी नाही. कॉंग्रेसला, कॉंग्रेस नेत्यांना खरे शत्रू अंतर्गतच असतात. त्यामुळे कॉंग्रेसच्याच पोटी जन्माला आलेल्या राष्ट्रवादीचे स्वरूप फारसे वेगळे नाही. गेल्यावर्षी चिक्की प्रकरण गाजत असताना त्यावर चर्चा करताना जितेंद्र आव्हाडांनी तेलगीचा विषय उकरून काढला होता. राष्ट्रवादीचा नवा चेहरा म्हणजे जीतेंद्र आव्हाड आहेत. त्यामुळे भुजबळांना विरोधक किंवा भाजपवाले अडचणीत आणत नाहीत तर राष्ट्रवादीचेच लोक अडचणीत आणत आहेत.
- े भुजबळांना कोण अडचणीत आणतोय, याचा उलगडा आव्हाडांच्या कृतीवरून होऊ शकतो. आज आपल्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे असल्याचा हवाला भुजबळ देत आहेत. पण चौकशीचे शुक्लकाष्ट पाठीशी कोणी लावले, त्या नेत्याचे नाव घ्यायला कोणीच तयार नाही हे गौडबंगाल आहे. कितीही झटकले तरी भुजबळांच्या मागे लागलेले हे प्रकरण सोपे नाही. ते सहजपणे बिल्कूल संपणारे नाही. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या अन्य प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असताना, भुजबळ कुटुंबियांवरच्या कारवाईला मात्र आता गती मिळालेली आहे. त्यांच्या पुतण्याला अटकही झाली. कोठडीतही डांबले गेले आहे.
- हे पाहिल्यावर लक्षात येते की राजकीय सूडबुद्धीची भाषा त्यांना आज सुचते आहे. पण सत्तेत असताना घेतलेल्या अनेक निर्णयांची फ़ेरतपासणी त्यांनीही करायला हरकत नाही. भुजबळ यांनी गृहमंत्री होताच कोणत्या न्यायबुद्धीने बाळासाहेब ठाकरे यांना न्यायालयात आणण्याचा निर्णय घेतला होता? अर्थात
- कायद्याच्या अंमलाचे नाटक करणार्या भुजबळांचे नाक तेव्हा कोर्टातच कापले गेले होते ते वेगळे. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना हात लावण्याची हिंमत अन्य कोणाला झाली नाही, ते धाडस आपण गृहमंत्री होताच करून दाखवले, अशी फुशारकी दाखवण्याच्या नादात भुजबळांनी अटकेचे सत्र काढले होते. भुजबळांनी आटापिटा करूनही बाळासाहेबांवरचा खटला न्यायाधीशांनी विनाविलंब काढून टाकला. त्यामुळे केवळ छगन भुजबळच नव्हे तर तेव्हाच्या आघाडी सरकारचे नाक कापले गेले होते. भुजबळांच्या या कारवाईला कोर्टानेच राजकीय सुडबुद्धीची कारवाई ठरवले होते. त्यामुळे अशा अनुभवातून गेलेल्या भुजबळांच्या तोंडी आता तेच शब्द बिल्कूल शोभत नाहीत. ज्याचा अवलंब आपणच यापुर्वी केला आहे, त्याला आज सुडबुद्धी ठरवणे कितपत योग्य आहे? भुजबळांनी तसे वागले तर योग्य आणि तोच प्रकार त्यांच्याबाबत झाल्यावर ती सूडबुद्धी कशी?
- विशेष म्हणजे भुजबळ यांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातल्या तटकरे, अजित पवार अशा अन्य सहकार्यांवर यापेक्षाही गंभीर आरोप असताना ते मुक्त आहेत. पण भुजबळ कुटुंबिय पोलिसांच्या कचाट्यात सापडण्याचे धागेदोरे शोधले तर, यातून सहीसलामत निसटण्याचा मार्ग निघू शकेल.मग भुजबळ यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? आदर्श वा सिंचन घोटाळ्यातून अन्य नेते निसटले. कारण त्यांना विश्वासू साथीदारांनी दगा दिलेला नाही. भुजबळांनी आपल्या गोटातील कोणा विश्वासू व्यक्तींनी आपल्याला चव्हाट्यावर आणले याचा शोध घेतला पाहिजे.
- काही वर्षापूर्वी छगन भुजबळ यांच्या बांद्रा पश्चिम येथील शिक्षण संस्थेचा व्यवहार व व्यवस्था यांच्या संबंधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी गेल्या होत्या. एका सार्वजनिक संस्थेची मालमत्ता व साधने भुजबळ कुटुंबिय खाजगी लाभासाठी वापरतात, अशी तक्रार होती. त्यावेळी त्यांचेच सरकार असताना हे घडले होते. याचा नेमका अर्थ भुजबळांनी समजून घेतला पाहिजे. संस्थेच्या विश्वासू व्यक्तिनेच ती तक्रार केलेली होती. त्याला प्रोत्साहन नेमके कोणाचे होते याचा शोध भुजबळांनी घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. भुजबळ हे कुठल्याही सभेत बाजी मारू शकतील. त्यांच्या वाकचातुर्याने उपस्थितांची मत परिवर्तन करणे त्यांना शक्य आहे. पण कायदा आणि कोर्टाच्या कामात भुरळ घालणारी त्यांची वक्तव्ये उपयोगाची नाहीत. त्यात कुठेही गफ़लत झाली, तर उलटणार्या शस्त्राप्रमाणे तेच शब्द आपल्यालाच घायाळ करतात, हे भुजबळ यांनी ध्यानात घेतले पाहिजे. भुजबळांची अडचण ही आहे की त्यांच्याच सीएने त्यांच्या विरोधात मत नोंदवले आहे. ज्यांच्यावर आजतागायत घोटाळ्याचे अनेक आरोप झालेत त्यांच्या कुणा सीएने कधी विरोधातली माहिती दिलेली नाही, की पुढे आणलेली नाही. पण भुजबळांचे गणित इथे चुकले आहे. आज भुजबळांची गोची अशी आहे, की त्यांनाही आपल्या आर्थिक व्यवहारात कुठे खाचाखोचा आहेत, याची माहिती नाही. कुठून पैसे आले व त्यांना कोणते नाव देवून कुठे गुंतवले वा फ़िरवले, त्याच्या जंत्रीचा हा मामला आहे. विविध तपास यंत्रणा एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत, तो प्रश्न आहे कुठल्या मार्गाने पैसा आला व कुठून कुठे कसा फ़िरत गेला. भुजबळांना स्वत:ची माणसे सांभाळता आली नाहीत त्याचा हा फटका आहे.
सत्तेसाठी केलेला देशद्रोह
- बुधवारी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर डेव्हीड कोलमन हेडली काय सांगणार, त्याबददल कोणाला फ़ारशी उत्सुकता नव्हती. फक्त सामान्य माणसांना, देशप्रेमी व्यक्तिंना (जितेंद्र आव्हाड सोडून) जे वाटत होते त्यावर शिक्कामोर्तब होणार काय याबाबत शंका होती. जी माहिती आता बाहेर येत आहे, त्यात नवे असे काहीच नाही. पण पाकधार्जिण्या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या भारतविरोधी नेत्यांनी या गुन्हेगारांचे सातत्याने समर्थन केल्यामुळे सामान्यांमध्ये प्रचंड चीड आहे. आपला मुंब्रा हा विधानसभा जणू काही पाकीस्तानातील भाग आहे अशा थाटात वावरणार्या जितेंद्र आव्हाडांचे खरे स्वरूप आता समोर आले आहे हे यातून दिसून आले. इशरत जहाचा बुरखा नाही तर जितेंद्र आव्हाडांचा चेहरा समोर आला आहे.
- डेव्हिडने जे सांगितले त्यात प्रामुख्याने इशरत जहान या फ़िदायिन मुलीविषयीची माहिती नवी नाही. कारण जेव्हा हेडलीला अमेरिकेत अटक झाली व तिथेच त्याच्यावर खटला भरला गेला, तेव्हाच त्याची भारतीय अधिकार्यांनी जबानी घेतली होती. त्याविषयी तेव्हाही गवगवा झालेला होता. त्यात इशरत फ़िदायिन असल्याचे त्याने कबुल केल्याची माहिती उजेडात आलेली होती. मात्र त्याबद्दल इथलेच स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते, युपीए सरकार गोपनीयता पाळत होते. हा देशद्रोहच म्हणावा लागेल.
- इशरत पाकिस्तानची हस्तक असल्याची माहिती हाताशी असताना, तेव्हाचे मनमोहन सरकार व त्यातले गृहमंत्री लपवाछपवी कशाला करत होते, हा मुद्दा खरा चर्चेचा किंवा चिंताजनक आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेपासून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा संपूर्ण देशभरातून तीव्र भाषेत निषेध होणे गरजेचे आहे. कारण देशविघातक आणि फितूरीचे कारस्थान त्यांनी केल्याचे दिसते आहे. इशरत ही बिहारची बेटी म्हणून तेव्हा नितीशकुमार अश्रू ढाळत होते. राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिला मुलीसारखी ठरवून रडत होते, यासारखे दुर्दैव ते काय असेल? पवारांचेच निकटवर्तिय जितेंद्र आव्हाड हे इशरतच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आकाशपाताळ एक करत होते. त्यांनी इशरतच्या कुटुंबाला लाखांचे चेक देण्यात पुढाकार घेतला होता. हे किती हिडीस राजकारण आहे? देशविरोधी कारवाया करणार्या इशरतला पाठीशी घालण्याचे काम मुंब्र्यातील लोक करत असतील त्यांची मते मिळवण्यासाठी मुंब्र्य्यातील मुस्लिम समाज एकवटत असेल तर हे सगळे देशद्रोही ठरतात का? जितेंद्र आव्हाडांनी देशद्रोहयांना पाठीशी घालण्यात मुंब्र्यातील मुसलमान पुढे आहेत हेच यातून दाखवून दिले असे समजायचे का? त्याचप्रमाणे इशरत ही लष्करे तोयबाची हस्तक असल्याची माहिती भारत सरकारचे गृहमंत्री का लपवत होते, हा गहन प्रश्न आहे.
- इशरतला निरपराध ठरवण्यासाठी तिच्या चकमकीत गुंतलेल्या अधिकार्यांना गजाआड टाकण्यासाठी आटापिटा चालला होता. त्याच्याही पुढे जाऊन भारतीय गुप्तचर खात्याच्या वरीष्ठ अधिकार्याना खुनी ठरवण्यासाठी सीबीआयला कामाला जुंपलेले होते. अशा सर्वांच्या अब्रुची लक्तरेच आता हेडली वेशीवर टांगतो आहे. पण २६/११ च्या हल्ल्याच्या सुनावणी दरम्यान हे उघड होते आहे. या हल्ल्यात करकरे, साळसकर, कामटे असे अधिकारी मारले गेले. त्यांना मारण्यात अशाच राजकीय नेत्यांचा सहभाग होता काय याचा तपास आता करावा लागेल. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर कसाबला कसाबसा फासावर चढवून आपले पाप धुण्याचा प्रकार सुशीलकुमार शिंदे आणि कॉंग्रेसने केला का?
- तत्कालीन कॉंग्रेस सरकार हेडलीची जबानी लपवून आपल्या अधिकार्यांना गुन्हेगार ठरवण्याचे उद्योग करीत होती. ही बाब अतिशय गंभीर आहे. सेक्युलर वा पुरोगामी असण्यासाठी पाकिस्तानी हस्तक वा घातपातींना पाठीशी घालण्यापर्यंत तात्कालीन सेक्युलर सरकारने किती भयंकर निर्णय घेतले, त्याचा पर्दाफ़ाश हेडलीच्या साक्षीने आज झाला आहे. तेव्हाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग या विषयात काय करत होते? हेडलीची कबुली हाताशी असताना त्यांनी विचारणा झाली तरी इशरत दोषी असल्याची माहिती कशाला लपवली होती? ती लपवून आपण देशाचा घात करतोय, एवढेही त्यांच्या लक्षात आले नसेल काय? इशरतचे उदात्तीकरण थांबवून तिला गुन्हेगार ठरवणे दूर राहिले. उलट इशरतचा निकाल लावणार्या अधिकार्यांनाच आरोपी बनवण्यात तेव्हा सीबीआय गर्क होती. अर्थात सीबीआयचे स्वरूप म्हणजे कॉंग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन असे होते. एकामागून एक अर्धा डझन अधिकारी त्यात गोवले गेले होते.
- हेडलीने तेव्हाच दिलेली कबुली बाहेर आलेली होती. पण त्यामुळे इशरत प्रकरणात मोदींना सुटका मिळेल म्हणून ती जबानी लपवण्यात धन्यता मानली गेली. हेडलीच्या कबुलीविषयी जी माहिती देण्यात आली, त्यातला इशरतविषयीचा भाग खोडून पाठवण्यात आला. जेणे करून इशरत फ़िदायिन आहे, याला दुजोरा मिळू नये. हा सत्तेसाठी केलेला देशद्रोहच म्हणावा लागेल. अशा देशद्रोह्यांना शासन झाले पाहिजे.
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी
आज गणेश जयंती. माघ महिन्यातील गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बर्याचवेळा गणेश जयंती आणि गणेशोत्सव यात गफलत केली जाते. आजकाल कोकणात, मुंबई, ठाणा आणि उपनगरात पार्थिव अशा गणेशाची स्थापना करून भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे मोठा उत्सव साजरा केला जातो. अर्थात याला शास्त्रीय आधार कितपत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण गणेशाचे तत्व नेमके समजून घेणे महत्वाचे आहे. मूलाधार चक्र आणि गणपती यांचं नातं पुराण काळापासून वेद आणि शास्त्रांनी कथन केलं आहे. आज श्री गणेश जयंती. माघ महिन्यातील विनायक शुद्ध चतुर्थी. श्रींच्या जन्माची कथा ही तशी सर्वश्रुत आहे. आज त्यांचं कार्य आणि एकंदर स्थान आणि वैश्विक महानता समजून घेणे आवश्यक आहे ‘ग’ हा बुद्धीचा ध्वनी आणि ‘ण’ हे विज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजेच गणांचा अधिपती तो गणपती असे म्हणतात. नुसतंच विज्ञान कामास येत नाही. फक्त बुद्धी असूनही चालत नाही. तर प्रत्येक वेळी संस्करण करणारी शक्ती विज्ञानावर अंकुश ठेवून विज्ञान शक्तीला योग्य दिशा देणारी ती ‘बुद्धी’ असली पाहिजे. आपल्या संस्कृतीप्रमाणे जी मूळ देवता ती म्हणजे गणेश. मुळात प्रत्येक कार्यामध्ये जर या दोन वृत्ती किंवा गुणांचं नीट व्यवस्थापन केलं तर विघ्न येतच नाही. अशा रीतीने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आद्यपूजेचा मान असलेली गणेश ही एक प्रभावी देवता आहे. यामुळेच गणेश देवताही समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक बनली आहे. साहजिकच याच्या सहचर जीवनसाथी पत्नीपदाला जाणा-या देवता या रिद्धी, सिद्धी आणि भारती अशा आहेत. आपल्या अंत:करणातच वैश्विक ऊर्जा आहे, याचं स्मरण सदैव मानवाला राहावं हे गणेश उपासनेमधील गुपित आहे. अथर्वशीर्षात म्हटले आहे की, त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वम् असि.. म्हणजे, तेच आहे. परमब्रह्म हे साक्षात तुम्हीच आहात, अशी एक ओळ आपल्याला गणपती अथर्वशीर्षामध्ये आढळते. अखिल जीवनाच्या उगमाचा आद्य ध्वनी जो ओम् त्याच्या उगमाचा प्रतिनिधी म्हणजे भगवान गणेश. सर्व सामर्थ्यमंत्र, स्तोत्र-मंत्राची निर्मिती ही या ओम् ध्वनीतूनच होते. सामर्थ्य आणि क्षमाशीलता, सामर्थ्य आणि सौंदर्य याचं संतुलन आपल्याला श्री गणेशांच्या ठायी आढळतं. म्हणूनच गणपती ‘अथर्वशीर्ष’मध्ये रचनाकारांनी त्वमेव सर्वम् खल्विदम् ब्रह्म असि असं वर्णन करून श्री गणेशाचं साक्षात ब्रह्म असणं, परमात्मा असणं अधोरेखित केलं आहे. आपल्या या सूक्ष्म देहामध्ये ऊर्जा केंद्रं असतात. त्यांना हिदू आणि बौद्ध धर्मातील तंत्र आणि योग परंपरेमध्ये ‘चक्र’ ही संज्ञा आहे. अशा या सात चक्रांमधील सर्वात महत्त्वाचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. नावाप्रमाणेच हे चक्र म्हणजे शरीराचा मूळ आधार असते. मणक्यांच्या मुळाशी हे चक्र असतं. भगवान सूर्यनारायणाकडून या चक्राला ऊर्जा मिळते आणि याचा रंग लाल असतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाडयांच्या उत्पत्तीचं मूलाधार चक्र हे मूळ आहे. भगवान गणेश ही या मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे, असे शास्त्र सांगते. मूलाधार चक्राच्या चार लाल पाकळ्यांवर स्वर्णाक्षरांमध्ये ‘व’,‘श’,‘ष’,‘स’ हे चार संस्कृत ध्वनी लिहिलेले असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाचंदेखील त्या प्रतिनिधित्व करतात. चारच पाकळ्यांनी युक्त हे कमळ म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे. परमात्म्याची प्रधान शक्ती ही आदिशक्ती आहे. या आदिशक्तीची निर्मिती म्हणजे भगवान श्री गणेश. स्त्री-पुरुष तत्त्वाच्या पलीकडे ही आद्यनिर्मिती आहे. या प्रधान शक्तीची निर्मिती असल्यामुळे त्या आदिमातेबरोबर तो सदैव आहे. आणि त्यामुळेच मानवाच्या प्रत्येक चक्रामध्ये त्याचं वास्तव्य आहे. निर्मितीतील पावित्र्य, निरागसता, निष्पाप वृत्ती आणि शुद्धता यांचं तो प्रतीक आहे. गौरी प्रणयाय, गौरी प्रवणाय, गौर भावाय धिमही.. असं म्हणून आपण त्या आद्य दैवताचं आवाहन करतो. तोच आपणा सर्वाचा आद्यपूजेचा मानधारी परमप्रिय श्रीगणेश आहे. भगवान शंकर हे साक्षात परमेश्वर तर श्रीगणेश हा त्यांचा पुत्र. स्वत: देवत्वाला जाण्यासाठी आतुर असलेल्या जीवाचं ते प्रतीक आहेत. भगवान गणेशांच्या अंग-प्रत्यंगांमध्ये ही प्रतीकात्मकता दडलेली आहे. हत्तीचं मोठं शीर व्यापक विचार करावा यासाठी आहे. मोठे कान हे जास्त ऐकावं यासाठी आहेत. बारीक डोळे हे एकाग्रता साधण्यासाठी आहेत. छोटं तोंड हे कमी बोलण्याचा सल्ला देते. वरद हस्त म्हणजे आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी दिलेलं अभय आणि आश्वासन आहे. सोंड ही श्वासावाटे येणार्या प्राणशक्तीचा प्रभावी वापर करण्यासाठी आहे. एकच सुळा दात म्हणजे चांगलं ठेवा, आणि वाईट त्या सर्वाचा त्याग करा हे सांगतो आहे. मोदक हे साधनेचं फलित आहे.विशाल पोट हे जगातील सगळं भलं-बुरं पचवण्याची क्षमता तुमच्यात आहे हे सांगते. वाहन उंदीर म्हणजे लालसा, अभिलाषा यांचं प्रतीक आहे. लालसा, अभिलाषा यांच्यावर स्वार होऊन ताबा ठेवला तरच तुम्ही जीवनाचा प्रवास करू शकता. जीवनाच्या सर्वच परिघांना निकटपणे स्पर्श करणारा असा हा देवाधिदेव श्रीगणपती.. म्हणूनच सर्व धर्माच्या परिसीमा पार करून हे दैवत आज जागतिक बनलं आहे.
Subscribe to:
Posts (Atom)