- काँग्रेसचे बंडलबाज नेते आणि भाजपत येऊन सोंगाड्याची भूमिका करणारे प्रशांत ठाकूर यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रचारात ते नेहमी सांगत आहेत की गेल्या पाच वर्षात मी 600 कोटींची विकासकामे केली. 600 कोटींची शेकडो विकासकामे केली असतील असे जर प्रशांत ठाकूर यांचे म्हणणे आहे तर मग त्यांना काँग्रेस सोडण्याची वेळ का आली? पृथ्वीराज चव्हाण कामे करत नाहीत, ऐकत नाहीत, निर्णय घेत नाहीत अशी टिका करत कोणतीही विकासकामे केली नाहीत अशा थापा मारून प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस सोडली. मग जी 600 कोटी रूपयांची कामे केली अशा थापा ते मारत आहेत तेव्हा ती मंजूर केल्याची जाहीरातबाजी खारघरपासून ते खोपोलीपर्यंत प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्यामुळे यातले नक्की खरे काय आहे हा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मुळात निष्क्रिय आणि भ्रष्ट असलेले प्रशांत ठाकूर 600 कोटींची कामे केली असे सांगत आहेत यावर कोणी विश्वासच ठेवू शकत नाही. कदाचित ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टने घेतलेल्या विविध ठेक्यांची यादी ते देतील. पण तो त्यांनी धंदा म्हणून स्वार्थापोटी केलेला असेल. त्याचा विकासकामाशी काही संबंध नाही. काँग्रेसची सत्ता असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून, केंद्राकडून 600 कोटींपेक्षा जास्त रकमेचे सिडकोचे, जेएनपीटीचे ठेकेे मिळवले असतील. पण यातून फक्त पितापुत्रांचे भले झाले आहे. जनतेचे भले झाले नाही हे पनवेलकर जाणून आहेत. त्यामुळे शेकडो कामे केली एवढच त्यांना सांगता येते. पण या शेकडोपैकी एक तरी दाखवा असे सांगितले तर पितापुत्रांना दातखिळ बसते.
- गेल्या पाच वर्षात पनवेल विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला असे प्रशांत ठाकूर यांचे वचननाम्यात म्हणणे आहे. पण कायापालट म्हणजे पाच वर्षांनी आपल्या निष्क्रियतेमुळे उमेदवारी मिळणार नाही आणि काँग्रेसची सत्ता येणार नाही हे लक्षात आल्यावर पक्ष सोडला. स्वत: पक्ष बदलला हाच काय कायापालट? उलट पनवेल पंचवीस वर्ष मागे नेऊन ठेवले. पनवेल मतदारसंघातील रस्ते अत्यंत खराब आहेत. एखाद्या खेड्यात जावे असे ते रस्ते आहेत. काँग्रेसच्या म्हणजे प्रशांत ठाकूर यांच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेला नागरिकांना पाणी पुरवता येत नाही. स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. राम ठाकूर यांचे जन्मगांव असलेल्या गव्हाण शिवाजीनगर या भागातील लोकांना लाल रंगाचे माती मिश्रीत पाणी प्यावे लागते. जे आपल्या जन्मगावासाठी काही करू शकत नाहीत त्यांनी कोणती शेकडो कामे केली आणि 600 कोटी रूपये कुठे खर्च केले हे जाहीर करावे. 600 कोटी रूपयांचा हिशोब द्यावा नाहीतर जनतेची फसवणूक थांबवावी. या प्रश्नाचे उत्तर ते देवूच शकणार नाहीत. कारण पितापुत्रांची, प्रशांत ठाकूर यांची निष्क्रियता समोर आणली की त्याचे उत्तर द्यायचे नाही ही त्यांची प्रथा आहे.
- यापूर्वीही त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. पण त्या प्रश्नांचे मुद्देसूद उत्तर देण्याचा पुरूषार्थ त्यांच्यात नसल्यामुळे आता सोंगाड्याची भूमिका त्यांना करावी लागत आहे. आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तरी चालेल पण पनवेलकरांसाठी फक्त तीन प्रश्नांची उत्तरे द्या नाहीतर तोंड काळे करा. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी असल्या भ्रष्ट नेत्याला उमेदवारी देवून पक्षाचा घात केला आहे. भाजपने प्रशांत ठाकूर यांच्या या भ्रष्ट कारभाराचेे समर्थन केले आहे काय याचे उत्तर द्यावे आणि प्रशांत ठाकूर यांना या तीन प्रश्नांची उत्तरे देण्यास भाग पाडावे.
- पहिला प्रश्न असा की भोपाळचा घातक विषारी कचरा पनवेल विधानसभा मतदारसंघात आणून टाकण्याचा घाट घातला जात असताना त्याला विरोध प्रशांत ठाकूर यांनी का केला नाही? त्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना त्या चर्चेत भाग न घेता तेथून प्रशांत ठाकूर का पळून गेले? त्यावेळी जर आमदार विवेक पाटील यांनी त्याला विरोध केला नसता तर आज पनवेलकर मृत्यूच्या दाढेत असते. पनवेलकरांचा हा घात करण्याचा घाट प्रशांत ठाकूर यांनी घातला याचे भारतीय जनता पक्ष समर्थन करणार आहे काय?
- दुसरा प्रश्न असा की खारघर टोल नाक्याबाबत असलेले प्रशांत ठाकूर यांचे आंदोलन हे खोटारडेपणाचे आंदोलन आहे. सायन पनवेल महामार्गाचे काम ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट या प्रशांत ठाकूर यांच्या कंपनीला मिळाले नाही म्हणून सूडबुद्धीने टोलकंपनीला त्रास देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. हे काम ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टला मिळाले असते तर प्रशांत ठाकूर यांनी हे आंदोलन केले असते का? भाजपच्या नेत्यांनी या प्रश्नाचे उत्तर प्रशांत ठाकूर यांच्याकडून विचारून घ्यावे आणि कोणते निखारे आपण पदरात बाळगले आहेत हे भाजपने लक्षात घ्यावे.
- तिसरा प्रश्न असा की 600 कोटी रूपयांची विकासकामे केली असे प्रशांत ठाकूर म्हणत आहेत. गेल्या पाच वर्षात काँग्रेसचे आमदार असताना ही जर कामे त्यांनी केली असतील तर त्या 600 कोटी रूपयांचा खर्च कोठे केला, कोणती विकासकामे केली याचा तपशिल त्यांनी द्यावा. इतकी भरभक्कम कामे काँग्रेसचे आमदार असताना प्रशांत ठाकूर यांनी केली असतील तर त्यांना पक्ष सोडून भगवी वस्त्र का धारण करावी लागली?
- या प्रश्नांची उत्तरे प्रशांत ठाकूर देवू शकणार नाहीत. हा विषय ते भलतीकडे घेवून जावून त्याला वेगळे वळण देतील. पण आता मतदार गप्प बसणार नाही. तुम्ही पैशाच, बळाचा, पोलिसी ताकदीचा कसलाही वापर केलात तरी पनवेल मतदारसंघातील प्रत्येक घराघरात हा प्रश्न आता पोहोचलेला असेल. जाहीर सभांमधून याचा उल्लेख केल्याशिवाय तुम्हाला मतदार स्विकारणार नाहीत.
- पनवेल मतदारसंघातील निवडणूक ही आता सरळ सरळ एकतर्फी होताना दिसत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचे पारडे एवढे जड झाले आहे की त्याच्या जवळपासही प्रशांत ठाकूर पोहोचू शकत नाहीत. विविध पाहणी अहवालांमध्ये आलेल्या अंदाजानुसार बाळाराम पाटील हे तर भरघोस मतांनी विजयी होणार आहेतच पण प्रशांत ठाकूर तिसर्या क्रमांकावर फेकले जात आहेत. लढतीतूनच बाद होत आहेत. याची जाणिव भाजपलाही झालेली आहे. त्यामुळेच पहिल्या फळीतल्या भाजप नेत्यांनी सूषमा स्वराज यांनी सोमवारी येण्याचे टाळले. आधी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा प्रचार आणि मग वेळ मिळाला तर शेवटच्या टप्प्यात तिसर्या क्रमांकावरच्या नेत्यासाठी यायचे या धोरणाने भाजप नेत्यांनी पहिल्या टप्प्यात प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाठ फिरवली. भारतीय जनता पक्षाला फक्त आपली मतांची टक्केवारी वाढवायची होती. भाजपची पनवेलमध्ये ताकत फारशी नव्हतीच. त्या ताकदीत ठाकूर यांच्यामुळे शे पाचशे माणसे आली तर काही टक्के मतदान वाढेल एवढाच त्यांचा उद्देश होता. त्यामुळेच भाजपनेही पडेल उमेदवार म्हणूनच प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले आहे. याचे कारण जे आधी काँग्रेसचे आमदार होते, गेल्या दहा वर्षात ते काँग्रेसमध्ये असल्यापासून केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता होती. तेव्हा ते काही करू शकले नाहीत ते आता काय करू शकणार आहेत? प्रशांत ठाकूर यांच्या निष्क्रियतेची कल्पना भाजप नेत्यांना आहे. पनवेल नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना एकाच रस्त्याची चार चार वेळा टेंडर काढून केलेल्या भ्रष्टाचाराची कहाणी भाजपच्या नेत्यांना माहित आहे. त्याची नगरविकास खात्यामार्फत चौकशी सुरू असल्याचे भाजप नेत्यांना माहित आहे. सत्तेचा दुरूपयोग करून त्या चौकशीला मंदगतीने करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यापासून सगळ्या काँग्रेस नेत्यांचे उंबरे झिजवले होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच जर सत्तांतर झाले तर ही चौकशी होणार. आपल्याला तुरूंगात जावे लागणार या भितीने प्रशांत ठाकूर आता भाजपत आले आहेत हे देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, सुधीर मुनगुंटीवार या सर्वांना माहित आहे.
- प्रशांत ठाकूर यांनी वचननाम्याचे प्रकाशन केले आहे. पण कोणाच्या वचनावर लोक विश्वास ठेवतात? जे वारंवार वचन मोडतात, शब्द कधी पाळत नाहीत त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये जातो अशी थापेबाजी करून ठेकेदारी करायला गेलेल्या पितापुत्रांना एकही प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवता आला नाही. कुठे गेले दहा वर्षांपूर्वी दिलेले हे वचन? त्यामुळे असल्या वचननाम्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कितीही हरामचा, भ्रष्टाचाराचा पैसा ओतला तरी तो पाण्यात जाणार आहे. मतदार प्रशांत ठाकूर यांना स्विकारणार नाहीत. कारण त्यांच्यात प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंम्मत नाही. हिंम्मत ही फक्त प्रामाणिक माणसात असते. तोच बाणेदारपणाने उत्तर देवू शकतो. प्रशांत ठाकूर यांच्यासारखे भ्रष्ट, निष्क्रिय नेते हे फक्त प्रश्नांना बगल देतात. चर्चेतून पळ काढतात.
Tuesday, October 7, 2014
600 कोटींची विकासकामे केली आहेत, मग काँग्रेस सोडण्याची वेळ का आली?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment