prafulla phadke mhantat

Thursday, November 1, 2018

राजेशाही अजून डोक्यातच आहे!


राजकारणातील घराणेशाही हा मुद्दा बरेच दिवस मागे पडला होता. तो पुन्हा एकदा नव्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काढला आहे. गेली दोन अडीच दशके घराणेशाहीचे राजकारण हा फार मोठा पगडा भारतीय लोकशाही आणि राजकारणावर होता. अर्थात हे जनतेने स्वीकारलेले होते. कारण, लोकशाही असली तरी डोक्यातील राजेशाही आणि सरंजामशाही अजूनही उतरलेली नाही, हेच त्याचे कारण. यापासून कोणताही पक्ष चुकलेला नाही हेही तितकेच खरे. नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाव न घेता, घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. इथे पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान होतो, मुख्यमंत्र्याचा मुलगा मुख्यमंत्री. यामुळे काही ठरावीक लोकांच्या हातात पैसा आला, तर बाकी सगळा देश गरीबच राहिला. हे आता बदलायला हवे, लोकशाहीसाठी ते घातक आहे, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यांनी केली. भारतीय जनता युवा मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.पण, घराणेशाहीची ही परंपरा बदलणे मतदारांच्या हातात आहे, राज्यकर्त्यांच्या नाही. मतदारांनी जोपर्यंत ही सरंजामशाही नाकारलेली नाही, तोपर्यंत यात बदल होणे शक्य नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर काही काळाकरिता लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले होते, पण त्या पदासाठी इंदिरा गांधींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. कारण, राजेशाहीच्या वातावरणातून भारत बाहेरच पडला नव्हता. राजे आणि संस्थानिकांच्या राजवटीची सवय इतकी अंगवळणी पडली होती की, राजाच्या माघारी त्याचा पुत्रच गादीवर येणार हे निश्चित होते. त्यालाच राज्यकारभार द्यायचा, त्यालाच राज्याभिषेक होणार हे ठरलेले होते. तोच प्रकार स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिला. त्यामुळे ही सरंजामशाहीची प्रवृत्ती तशीच सुरू राहिली. हा बदल तेव्हाच झाला असता, जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली; परंतु भारतीय मानसिकतेने आणि त्यातल्या त्यात नेहरू गांधी घराण्याचे मांडलिकत्व पत्करलेल्या काँग्रेसी मानसिकतेने त्यातून बाहेर पडू दिले नाही. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर कितीतरी लायक आणि अनुभवी असे लोक पंतप्रधानपदासाठी काँग्रेसमध्ये होते. पण, फारसा अनुभव नसलेल्या राजीव गांधींनाच पंतप्रधानपदी बसवायचे, असा विचार काही लाचार काँग्रेस नेत्यांनी केला आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या श्रेष्ठ नेत्यांचाही त्या पदासाठी विचार केला नाही. तिथेच लोकशाहीचा खून होऊन घराणेशाहीची बिजे घट्ट केली गेली. सहानुभूती आणि स्वच्छ प्रतिमा, तरुण चेहरा या भांडवलावर राजीव गांधींनी पाच र्वष निभावून नेली. त्यामुळे बापानंतर मुलगा किंवा मुलगी, आईनंतर मुलगा किंवा मुलगी, पतीनंतर त्याची पत्नी किंवा मुलगा, मुलगी ही घराणेशाहीची परंपरा रुजली.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही बारामती या मतदारसंघात दुस-या कोणाचा विचार केला नाही. हा मतदारसंघ झाल्यापासून शरद पवार, अजित पवार आणि पुन्हा शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडेच हा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीची भाषा करते, पण दुस-या कोणाला संधी देण्याची त्यांचीही मानसिकता नाही. कारण, घराणेशाहीची बिजे खोलवर रुजली आहेत. यावरच नितीन गडकरींनी नेमके बोट ठेवले आहे. महाराष्ट्रातील दुसरा छोटा प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी हा पक्ष मोठा केला. पण, बाळासाहेबांच्या माघारी त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच पक्षप्रमुख म्हणून निवड केली. तुलनेने अधिक योग्य असलेल्या राज ठाकरे यांना डावलून आणि ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून हे पद दिले गेले. त्यानंतर युवानेते म्हणून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाही पुढे करण्यात आले. शिवसेनेतील ज्येष्ठ नेतेसुद्धा जेव्हा या वयाने निम्मा किंवा मुलापेक्षा लहान असलेल्या आदित्य ठाकरेंच्या पाया पडतात, तेव्हा अंगावर शहारा येतो, किती ही लाचारी असा प्रश्न पडतो. ही घराणेशाही सरंजामशाही डोक्यात असल्यामुळे आहे. गडकरी यांनी मारलेला टोला हा फक्त काँग्रेसला आहे असे वाटले, तरी या संपूर्ण मानसिकतेला तो आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

at November 01, 2018
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ▼  November (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ▼  November (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.