prafulla phadke mhantat

Saturday, November 3, 2018

महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?


देशाचे पहिले गृहमंत्री ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त त्यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुजरातमधील साधू बेटावर झाले. हा पुतळा म्हणजे भाजपची एक राजकीय खेळी असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे, तर सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी या पुतळ्यामुळे अनेक आदिवासींच्या जमिनी मोदी सरकारने हडपल्याचा आरोप केला आहे. हे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले असले तरी मोदींनी ‘करून दाखवले’ हे विसरून चालणार नाही. त्या तुलनेत आम्ही, आमचा महाराष्ट्र, महाराष्ट्राचे नेते कुठे कमी पडतात याचा विचार करावा लागेल. आम्ही फक्त चर्चा, टीका, विरोधाची शुक्लकाष्ठे काढत आहोत. कुठेतरी काहीतरी मार्ग काढण्याची इच्छा आमच्या नेत्यांमध्ये नाही, त्यामुळेच आमच्या शिवस्मारकाला दिरंगाई होते आहे. आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागत नाही. परस्परांमधील मतभेद विसरून शिवस्मारकासाठी सर्वानी एकत्र येण्याचा मोठेपणा दाखवला असता, तर मागच्या आठवडय़ात झाली तशी फसगत झाली नसती, पायाभरणी शुभारंभ होऊन कामही सुरू झाले असते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मोदींच्या २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा पुतळा राजकीय स्वार्थासाठी उभारल्याची टीका केली आहे.मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही व्यंगचित्रातून या पुतळ्याच्या लोकार्पणावर ताशेरे ओढले आहेत. हा पुतळा उभारण्यासाठी स्थानिक परिसरातील अनेक आदिवासी शेतक-यांच्या जमिनी सरकारने अत्यंत कमी किमतीत विकत घेतल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. तशा आशयाचे पत्रही त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे. पण हे सगळे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. मोदींनी मात्र ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारून दाखवला. त्याचे भूमिपूजन, पायाभरणी हे अत्यंत नियोजनबद्धपणे केलेले दिसून येते. हा पुतळा उभारण्यासाठी देशभरातून मला लोखंड पोलाद दान करा असे आवाहन काही वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी केले होते. त्याला प्रतिसादही मिळाला होता. ते त्यांनी करून दाखवले. आम्ही मात्र गेली चार वर्षे शिवस्मारक, आंबेडकर स्मारक यावर नुसत्या चर्चा करत आहोत, घोषणा करत आहोत. त्यावरून आमची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते आहे, असेच म्हणावे लागेल. सरदार वल्ललभाई पटेल यांच्या या पुतळ्यावर जवळपास ३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या पुतळ्याच्या पायथ्याशी सरदार पटेलांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे.‘पद्मभूषण’प्राप्त शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची संरचना तयार केली आहे. ३३ महिन्यांत २५० अभियंते, ३४०० मजुरांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे. या पुतळ्याच्या एका बाजूला अभयारण्य आहे, तर दुसरीकडे नर्मदा नदी आहे. भौगोलिक स्थिती आणि या पुतळ्याचे सौंदर्य पाहता या पुतळ्यामुळे या परिसरातील पर्यटन वाढेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. मुंबईतील समुद्रातील शिवस्मारकाचा उद्देशही असाच होता. पर्यटनाला प्रोत्साहन देणारे हे स्मारक कधी होणार हा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे मोदींनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी ताकद, नियोजन पणाला लावली, ते नियोजन आमच्याकडे नाही असेच दिसून येते आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे भूमिपूजन २०१३ मध्ये झाले. तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. परंतु पंतप्रधान झाल्यावरही त्यांनी तो प्रकल्प पूर्ण केला. भूमिपूजन करून, पायाभरणी करून अध्र्यावर सोडून दिला नाही. हे आम्हाला कधी जमणार? संधीपासून, मोठय़ा पदापासून आम्ही नेहमीच लांब राहिलो. एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानत राहिलो. तसे केले नसते तर यशवंतराव चव्हाण, शरद पवार हे पंतप्रधान झाले असते. काम करण्यापेक्षा कामात अडथळे निर्माण करण्याची प्रवृत्ती आमच्याकडे फार आहे, याचा परिणाम म्हणून शिवस्मारक, आंबेडकर स्मारकाचे काम रेंगाळत आहे. हे काम कोणाच्या कारकिर्दीत घडले, कोणते सरकार होते या विचारात आम्ही श्रेयवादाच्या लढाईत एकमेकांच्या कामात खोडा आणत राहिलो आणि या स्मारकांमध्ये वाद निर्माण करत बसलो, हे चुकीचे आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी मोदी सरकारच्या कृतीतून काही आदर्श घेतला पाहिजे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’बाबत गुजरातमध्ये एकजूट होती.आता काँग्रेसचा विरोध असल्याचे भासवले जात असले तरी तो चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला कुठेही विरोध नाही झाला, वाद नाही झाला, तर तो नियमित वेळेत तयार झाला. असे कालबद्ध नियोजन आम्ही शिवस्मारक, आंबेडकर स्मारकाबाबत का करू शकलो नाही याचा महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी अतंर्मुख होऊन विचार केला पाहिजे. या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चा केवढा परिणाम आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे गुजरात, गांधी, पटेल आणि मोदी यांचीच नावे चर्चेत राहणार आहेत याची सोय केलेली आहे. हे तीनही नेते गुजरातचे होते. गुजरातचे नाव यामुळे मोठे होईल. त्याचप्रमाणे काँग़्रेस जी गांधी-नेहरू या नावाभोवती फिरते आहे त्यामध्ये गांधी नेहरूंपेक्षाही सरदार पटेलांना मोठे करून ठेवले आहे. आज तरी सरदार पटेलांइतका मोठा पुतळा या देशातच नव्हे तर जगातही कुठेच महात्मा गांधींचा नाही की नेहरूंचा नाही. त्यामुळे पटेलांचे वजन वाढवून काँग्रेसमधला नेहरू-पटेल वाद बाहेर काढण्याची संधी यातून भाजपला मिळू शकते. हा गुजराती व्यवहारीपणा सर्वानी लक्षात घेतल्यामुळे त्यावर टीका होऊ लागली आहे.पण या सगळय़ांपासून महाराष्ट्रातील नेत्यांनी काहीतरी नक्की शिकले पाहिजे. योग्य नियोजन आणि मतभेद, पक्षभेद विसरून आम्ही या दोन स्मारकांसाठी एकजूट दाखवल्याशिवाय त्यातील अडथळे अडचणी संपणार नाहीत. महाराष्ट्रातील नेत्यांनी आज आपला बाणेदारपणा जपून आपली इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. कोणी केले, कोणाच्या काळात केले, मुख्यमंत्री कोण होता किंवा त्याचे श्रेय कोणी निवडणुकीसाठी घेईल असला बालिश विचार न करता महाराष्ट्र एकवटला आणि महाराजांचे स्मारक उभे राहिले हे ऐकायला आनंद होईल. तमाम महाराष्ट्राने युगपुरुष आंबेडकरांच्या स्मारकासाठी एकजूट दाखवली हा अभिमान असला पाहिजे.
at November 03, 2018
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ▼  November (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ►  December (26)
    • ▼  November (30)
      • ग्राहकांवर बोजा नको
      • ‘वजनदार’ शिक्षणपद्धतीला चाप
      • अधिभार की जिझिया कर?
      • शिक्षणातील अडथळ्य़ांची शर्यत
      • मुंबई तुला सलाम!
      • अनुभव समृद्ध राजकारणी यशवंतराव चव्हाण
      • राम का नाम बदनाम ना करो।
      • याचे अनुकरण नको!
      • सरकारची लिव्ह अँड रिलेशनशीप
      • सरकारचे आर्थिक धोरण संशयास्पद
      • शिवसेनेला चपराक
      • शेतक-यांच्या प्रश्नात राजकारण नको
      • महापालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायालयीन हातोडा
      • सिंह, बैल आणि कोल्ह्याची गोष्ट
      • मुंबई महापालिकेचा नियोजनशून्य कारभार
      • आता अंत नका पाहू!
      • नक्षलवादाचा राजकीय फायदा
      • शिवसेनेचा आततायीपणा
      • आराम हराम है।
      • नामांतराचे राजकारण
      • काँग़्रेस जाहीरनाम्यातच फसली
      • भाजपचे शक्तिप्रदर्शन
      • पुतळ्याची उंची, काँग्रेसची गोची
      • बचाओ.. पण कोणाला?
      • दिवाळीवर दुष्काळाचे सावट
      • कन्नड पोलिसांचा महाराष्ट्रद्वेष
      • महाराष्ट्राची इच्छाशक्ती कमी पडते?
      • संरक्षण घोटाळ्यांची परंपरा
      • राजेशाही अजून डोक्यातच आहे!
      • योग्य निवड
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.