prafulla phadke mhantat

Tuesday, December 18, 2018

लाचार नेत्याचे उपद्व्याप

December 17, 2018 07:00:11 AMलाचारी माणसाला काय करायला लावते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे नाव घ्यावे लागते. एरव्ही दखलपात्रही नसलेली ही कर्तृत्वशून्य व्यक्ती, अचानक आक्रमक झाल्याचा आव आणला आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणेंवरच टीका करू लागली. हे म्हणजे अतिच झाले. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांच्या मागे मागे फिरणारे आणि गोंडा घोळणारे रामदास कदम हे राणेसाहेबांनी शिवसेना सोडल्यावर हतबल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची लाचारी करून आपल्या पदरात विरोधी पक्षनेतेपद पाडून घेतले. पण, त्या पदाची जी शान होती, शोभा होती, ती रामदास कदमांनी पार धुळीला मिळवून टाकली. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, ‘गाढवाला गुळाची चव काय?’ त्याप्रमाणे रामदास कदमांचे झाले. विरोधी पक्षनेता पद काय असते, हेच त्यांनान समजल्यामुळे त्या पदाची पार वाट लावून टाकलीच, पण स्वत:ची लायकी दाखवून दिली. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाइतकाच विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. मुख्यमंत्र्यांबरोबरीचे स्थान विरोधीपक्ष नेत्याचे असते. हे रामदास कदमांना कधी कळलेच नाही. कारण, अभ्यास करण्याची, शिकायची त्यांना कधी जरुरी वाटली नाही. पाय चाटून आणि लाचारी करून, लोकांचे जोडे उचलण्यात धन्यता मानून लाभाचे पद मिळवायचे एवढेच ज्यांना जमते, अशा स्वाभिमान शून्य माणसाला पदाचे महत्त्व काय कळणार? नेमके झाले तसेच. विरोधी पक्षनेत्याची ताकद म्हणजे, सत्ताधारी पक्षाला घाम फोडण्याची धमक असावी लागते. नारायण राणे हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना घाम फुटायचा. सभागृहात समोर राणे दिसले की, त्यांच्या छातीत धडधड व्हायची. आज हा तोफखाना काय आगीचे गोळे सोडणार, या विचारातच विलासराव सभागृहात येत. हा विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा राणेसाहेबांनी निर्माण केला होता. त्याआधीही जे जे विरोधी पक्षनेते होऊन गेले, त्यांनी त्या सभागृहाचे पद सन्मानाने भूषवले होते. यात शरद पवार, नारायण राणे, गोपिनाथ मुंडे, नितीन गडकरी, छगन भुजबळ अशा नेत्यांनी सभागृहे दणाणून सोडलेली होती. त्यांच्या भाषणांचा, चर्चेचा योग्य परिणाम होऊन जनतेची कामे होत होती. पण, हे कधी रामदास कदमांना समजलेच नाही. त्यांनी आपल्या चार वर्षाच्या काळात या पदाची शान घालवली. विरोधी पक्षनेता म्हणून बोलताना अभ्यास करावा लागतो, त्यासाठी सरकारच्या चुका दाखवण्यासाठी सगळे संदर्भ उभे करावे लागतात, यासाठी डोके लागते. पण, यांचे डोके फक्त फेटा बांधण्यापुरते आणि लाचारीने खाली गेलेल्या मानेला ओझे असल्यासारखे आहे. त्यांना कधी अभ्यास करायचा असतो, हे समजलेच नाही. उद्धव ठाकरेंची लाचारी करायची, आदित्य ठाकरेंसारख्या पोरसवदा बाळाचे पाय चाटायचे, या पलीकडे रामदास कदमांनी काही केलेच नाही. त्यामुळे फक्त आपल्याला शिव्या देण्यासाठी नेमले आहे, असाच समज रामदास कदमांचा झाला. उठसूट शिव्या देणे म्हणजे पक्षाचे काम, अशी अवस्था रामदास कदमांची झाली. त्या शिवसेनेची रामदास कदमांनी शिव्या देणारी सेना अशी अवस्था करून टाकली. विकासकामे नाहीत, अभ्यासपूर्ण वक्तव्ये नाहीत, आपण कोणत्या खात्याचे मंत्री आहोत याचे भान नाही, फक्त खासदारनारायण राणे यांच्यावर बेछूट टीका करणे, हाच एककलमी कार्यक्रम हाती घेऊन हे रामदास उद्धव ठाकरेंचे दास म्हणून राहू लागले. पण, नारायण राणेसाहेबांवर टीका करण्यासाठी यांच्या अंगात काही कर्तृत्व आहे का, हे आधी रामदास कदमांनी पाहायला पाहिजे. शिडी लावून उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला कशासाठी जातात. रामदास कदम हे पर्यावरण मंत्री आहेत, औरंगाबादचे पालकमंत्री आहेत. त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने काय काम केले, हे सांगता येईल का? कोकणातील नाणार प्रकल्प लादण्यासाठी आणि तेथील हजारो कलमे, आंब्यांची झाडे उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्या खात्याचा हिरवा कंदील दाखवला. नाणार प्रकल्पाला ना हरकत देऊन पर्यावरणाची हानी करण्याचा प्लॅन आखला आणि हे म्हणे पर्यावरण मंत्री. औरंगाबादचा कचरा प्रश्न इतका चिघळला की, त्यावरून दंगली घडल्या. पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री या नात्याने तो प्रश्न हाताळण्यासाठी यांनी काय केले? काहीही केले नाही. कारण, करण्यासाठी कर्तृत्व असावे लागते. यांचे कर्तृत्व फक्त शिव्या देण्याचे. सडकछाप गुंडाप्रमाणे वावरणा-या कदमांना पत्रकार परिषदेला सामोरे जाता येत नाही की, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देता येत नाहीत. फक्त नारायण राणे यांच्यावर टीका करायची या पलीकडे काहीही येत नाही. पर्यावरण मंत्री म्हणून प्लास्टिक बंदी आणून प्लास्टिक पिशवीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा नवा धंदा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला. दर महिन्याला खंडणीप्रमाणे प्लास्टिकपोटी दंड गोळा करायला जायचे आणि प्लास्टिक उत्पादक कारखानदारांकडून काही मिळते काय, याची तोडपाणी करायचे धंदे फक्त रामदास कदमांनी केले. प्लास्टिक बंदी आणायची, तर संपूर्ण का नाही आणली? किराणा व्यापारी, हॉटेल चालक अशा मोठय़ा व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशवी वापरली, तर त्यापासून पर्यावरणाची हानी होत नाही. पण, तीच पिशवी रस्त्यावरच्या गरीब विक्रेत्याने वापरली की, पर्यावरणाची हानी होते. असले बेअक्कल कारभार फक्त रामदास कदमच करू शकतात. पर्यावरण मंत्री आहेत की, शिवसेनेसाठी खंडणी, पक्षनिधी गोळा करणारे मंत्री आहेत, असाच प्रश्न पडतो. ज्या ज्या पदावर ते गेले, तेथे तेथे रामदास कदमांनी घाण करून टाकलेली दिसून येते. आपल्याला कोणी विचारत नाही आणि काही जमत नाही, याची जाणीव झाल्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी आता रामदास कदमांनी नवा उद्योग सुरू केलेला आहे, तो म्हणजे नारायण राणेंवर टीका करायची. राणेंवर टीका केली की, आपल्याला प्रसिद्धी मिळेल यामुळे आपले नाकर्तेपण झाकून ठेवून बेछूट आरोप करण्याचे तंत्र रामदास कदमांनी हाती घेतले. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते म्हणून किती शान असायला पाहिजे होती. पण, यांनी पार स्वत:ची आणि पद, पक्ष सगळय़ाचीच वाट लावली आहे. लाचारी करून मिळालेल्या पदांचे हे असे असते.

at December 18, 2018
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ▼  December (26)
      • भरघोस मराठी चित्रपटांची निर्मिती
      • ग्राहकहिताकडे दुर्लक्षच
      • बिगर काँग्रेस सरकारची परीक्षा
      • निवडणुकीचा फंडा
      • शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची नौटंकी
      • आहोत का आम्ही पुरोगामी?
      • फक्त शाब्दिक बुडबुडे नकोत
      • बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
      • कांद्याने केला शेतक-याचा वांदा
      • बाजारात तुरी
      • परप्रांतीयांवरून महाराष्ट्रात गदारोळ का?
      • ७२ तासांत तागडे पुन्हा खाली
      • लाचार नेत्याचे उपद्व्याप
      • राफेलची हवाच गेली!
      • उशिरा सुचलेले शहाणपण
      • वैयक्तिक टीकेचा परिणाम
      • महाराष्ट्रात काँग्रेस नेतृत्वहीनच!
      • जागतिक पातळीवर नाचक्की
      • भाजपसाठी धोक्याची घंटा!
      • अभि‘नेते’
      • दुष्काळग्रस्तांची क्रूर चेष्टा
      • महिलांनीच खंबीर व्हावे
      • काळाच्या पुढचे पाहणारे बाबासाहेब
      • आयत्या घरात घरोबा..
      • आर्थिक नियोजन चुकले..!
      • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारा
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ►  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ▼  2018 (387)
    • ▼  December (26)
      • भरघोस मराठी चित्रपटांची निर्मिती
      • ग्राहकहिताकडे दुर्लक्षच
      • बिगर काँग्रेस सरकारची परीक्षा
      • निवडणुकीचा फंडा
      • शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची नौटंकी
      • आहोत का आम्ही पुरोगामी?
      • फक्त शाब्दिक बुडबुडे नकोत
      • बदलत्या जीवनशैलीचा परिणाम
      • कांद्याने केला शेतक-याचा वांदा
      • बाजारात तुरी
      • परप्रांतीयांवरून महाराष्ट्रात गदारोळ का?
      • ७२ तासांत तागडे पुन्हा खाली
      • लाचार नेत्याचे उपद्व्याप
      • राफेलची हवाच गेली!
      • उशिरा सुचलेले शहाणपण
      • वैयक्तिक टीकेचा परिणाम
      • महाराष्ट्रात काँग्रेस नेतृत्वहीनच!
      • जागतिक पातळीवर नाचक्की
      • भाजपसाठी धोक्याची घंटा!
      • अभि‘नेते’
      • दुष्काळग्रस्तांची क्रूर चेष्टा
      • महिलांनीच खंबीर व्हावे
      • काळाच्या पुढचे पाहणारे बाबासाहेब
      • आयत्या घरात घरोबा..
      • आर्थिक नियोजन चुकले..!
      • स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारा
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.