Wednesday, September 2, 2026

सप्तधारा एक विकसीत भारत घडवेल


भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाच्या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी देशाला एक स्पष्ट, पारदर्शक आणि दूरगामी आराखडा सादर केला. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण वंदे मातरम् गाऊन देशाने आपली क्षमता बळकट करण्याचा संकल्प केला. २०२२च्या पंच प्रतिज्ञेपासून पुढे जात देशाने आता सप्तधारा (शक्तीचे सात प्रवाह) या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे, जी भारताच्या आर्थिक, तांत्रिक आणि सामरिक क्षमतांना नव्या उंचीवर नेईल. सप्तधारा हा केवळ सरकारी धोरणांचा संच नाही, तर १.४ अब्ज भारतीयांच्या सामूहिक स्वप्नांचे प्रकटीकरण आहे. विकासाच्या सप्तधारेचे सात प्रमुख स्तंभ नव्या भारताचा पाया रचत आहेत.


यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्पादन क्षेत्र आहे. ‘मेक इन इंडिया’, ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्रांनी तळागाळातील उत्पादनात क्रांती घडवून आणली आहे. आपले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, जे २०१४-१५ मध्ये अंदाजे १.९ लाख कोटी रुपये होते, ते २०२४-२५ पर्यंत जवळपास सहा पटीने वाढून १२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. त्याचप्रमाणे मोबाइल फोनचे उत्पादन १८,००० कोटी रुपयांवरून ५.४५ लाख कोटी रुपयांपर्यंत म्हणजे तब्बल २८ पटीने वाढले आहे. आज, भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश आहे. मोबाइल फोन निर्यातीतील १२७ पटींची वाढ हे सिद्ध करते की, भारत आता आयातीवर अवलंबून नाही, तर जागतिक गरजा पूर्ण करणारा एक निर्यातदार देश बनला आहे.

कृषी आणि अन्न उत्पादन हा दुसरा घटक आहे. आपले शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतकºयांना जागतिक निर्यात बाजारपेठेशी जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. फळबाग उत्पादन, जे २०१३-१४ मध्ये २८०.७ दशलक्ष टन होते, ते आता ३१ टक्क्यांनी वाढून ३६७.७ दशलक्ष टन झाले आहे. मत्स्य उत्पादनात अभूतपूर्व १०४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, ते ९.६ दशलक्ष टनांवरून १९.५ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. कृषी-अन्न निर्यातीमध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाटा १३.७ टक्क्यांवरून २०.४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.


यानंतरचा प्रवाह आहे, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष. नवीन भारत हा नवोन्मेषाचा भारत आहे. २०१४ पूर्वी देशात जेमतेम ३५० स्टार्टअप्स होते, तर आज २०२६ मध्ये भारतात २.३ लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. युनिकॉर्न कंपन्यांची संख्या चारवरून १२० हून अधिक झाली आहे. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या एकवरून वाढून जवळपास ४४० झाली आहे. भारत आता जगातील तिसºया क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून ओळखला जातो आणि जागतिक नवोन्मेष निर्देशांकात ८०व्या स्थानावरून ३८व्या स्थानावर पोहोचला आहे. एआय, ६-जी, क्वांटम तंत्रज्ञान आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा देशातील तरुणांना भविष्यासाठी तयार करत आहेत.

गती शक्ती हा पुढचा प्रवाह आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेंतर्गत भारतात बहुविध वाहतूक साधनांचे जाळे उभारले जात आहे. राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९१,२८७ किमीवरून १,४६,००० किमीपेक्षा जास्त झाली आहे, म्हणजेच यात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हाय-स्पीड कॉरिडॉरचे बांधकाम ३२ पटीने वाढून ३,०५२ किमी झाले आहे. आज, भारताकडे जगातील दुसºया क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे. रेल्वेचे जवळजवळ पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे, जे एकेकाळी केवळ २० टक्क्यांपर्यंत मर्यादित होते. हायड्रोजन ट्रेनच्या आगमनाने वाहतूक क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेच्या युगाची सुरुवात झाली आहे.


संरक्षण शक्ती हा एक यातील महत्त्वाचा प्रवाह आहे. भारत संरक्षण उपकरणांचा आयातदार नव्हे, तर निर्यातदार बनत आहे. संरक्षण उत्पादनात जवळपास चौपट वाढ झाली आहे आणि संरक्षण निर्यात ५६ पटीने वाढून ३८,४२४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘मिशन सुदर्शन चक्र’ आणि हायपरसॉनिक संरक्षण तंत्रज्ञानाने आपल्या सैन्याला अजिंक्य बनवले आहे. सशस्त्र माओवादावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे आणि देशाची रचना विस्कळीत करणाºया वैचारिक (शहरी) नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी देश पूर्णपणे सतर्क आहे.

हरित आणि नील अर्थव्यवस्था हा महत्त्वाकांक्षी प्रवाह आहे. हवामान बदलाच्या विरोधातील जागतिक लढ्यात भारत आज आघाडीवर आहे. आपली नवीकरणीय ऊर्जा क्षमता ७६.३८ गिगावॅट्सवरून २८८.५८ गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा क्षमतेत तब्बल ५९ पटींनी वाढ झाली आहे. स्थापित नवीकरणीय आणि सौर क्षमतेमध्ये भारत आता जगात तिसºया क्रमांकावर आहे. २०२५च्या ऐतिहासिक शांतता कायद्याने अणुऊर्जेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा केला. गॅस ग्रीडचा विस्तार ७० शहरांवरून ७०० शहरांपर्यंत झाला आहे. नील अर्थव्यवस्थेंतर्गत मत्स्यव्यवसायात १४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही १.५ लाखांवरून २.५ दशलक्ष झाली आहे, ज्यामुळे स्वच्छ भारताच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली आहे. सॉफ्ट पॉवर हा एक महत्त्वाचा स्त्रोत असणार आहे. भारताची सांस्कृतिक मूल्ये जगाला मार्गदर्शन करत आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची संख्या ३१ वरून ४४ झाली आहे. आज जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. ‘हील इन इंडिया’ आणि आयुर्वेदाने भारताच्या आरोग्यसेवा प्रणालीला जागतिक स्तरावर स्थापित केले आहे. परदेशी पर्यटकांच्या आगमनात लक्षणीय ४३ टक्के वाढ झाली आहे. वेव्हज समिटसारख्या कार्यक्रमांनी भारताची सर्जनशील आणि अ‍ॅनिमेशन/गेमिंग अर्थव्यवस्था एक सॉफ्ट पॉवर म्हणून जगासमोर आणली आहे.

No comments: