prafulla phadke mhantat

Thursday, June 25, 2020

अंधश्रद्धेचा बाजार थांबवा


कोणतेही संकट आले की आपल्याकडे देवाला साकडे घालण्याची परंपरा आहे. पण देवाला घातलेेले साकडे हे फक्त त्या संकटातून तरण्याची, संकटाशी सामना करण्याची ताकद मिळावी यासाठी असते. देव तुमचे कोणतेही संकट दूर करत नसतो. संकटाशी मुकाबला हा करावाच लागतो. जे भोग आहेत ते भोगण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण कोरोनाच्या निमित्ताने आता देशात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. काही हौशे गवशे नवशे  याचा गैरफायदा घेत आहेत. महाराष्ट्रात त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. पण सध्या आलेल्या कोरोनाच्या संकटात अन्य राज्यात अंधश्रद्धेचे स्तोम माजत चालले आहे. विशेषत: उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि आसाम यांसारख्या राज्यांमधील महिलांनी तर कोरोनाला देवीचे रूप मानले आहे. कोरोनामातेचा कोप झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी तिची पूजा केली जात आहे. यावरून आपल्याला देशात जागरूकता किती आहे, हे सहज लक्षात येईल. कोरोनामातेची पूजा केली तर देवीचा कोप संपुष्टात येईल आणि ती आपल्यातून निघून जाईल, अशी जी भावना तयार झाली आहे आणि त्यातून कोरोनामातेचे जी पूजाअर्चा सुरू आहे, हे फार घातक आहे. कोणतीही अंधश्रद्धा पसरत जाणे हे घातक असते. आपल्याकडे याचा प्रसार फार वेगाने होतो. म्हणजे रोगापेक्षा आणि साथीपेक्षाही प्रचंड वेग अशा घटनांना असतो.
 खरं तर कोरोनाला हरवायचे असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. त्याऐवजी अंधश्रद्धा पसरवली जाणार असेल, तर संकट दूर कसे होईल?  कोरोनापासून बचाव करण्यासाठी मन पक्के असणे हा लढाईचा एक पैलू आहे. ईश्वराची आराधना केल्यास मानसिक बळ मिळते, ही आपली श्रद्धा आहे. त्यामुळे या श्रद्धेचे पालन करून मानसिक बळ वाढविणे यात चूक काहीच नाही. पण, कोरोनाला देवीचे रूप मानून, ती कोपली आहे असे समजून जी अंधश्रद्धा पसरवली जात आहे, तिला कुठेतरी आळा घातला जाणे गरजेचे आहे. कोणताही देव किंवा देवी ही माणसाचे गैर कसे काय करेल? असे करत असेल तर त्यांना देव कसे म्हटले जाईल? देव संकट दूर करत असता तर राम कृष्णांना संघर्ष करावा लागला नसता. संकटांशी आपणच लढा द्यायचा असतो हे राम कृष्ण यांनी दाखवून दिले आहे. ते तर ईश्वराचे अवतार असूनही त्यांना संघर्ष करावा लागला आहे, आपण तर सामान्य माणसे आहोत. त्यामुळे हा लढा आपल्याला द्यायचा आहे. कसल्याही अंधश्रद्धा न बाळगता काम करणे गरजेचे आहे. पण यूपी, बिहारसारखी मागास राज्ये, अविकसीत राज्ये हा प्रकार करत आहेत आणि त्याचा प्रसार देशभर होण्याची भिती आहे.
 आपल्यापैकी प्रत्येकाने पावलोपावली सतर्क राहणे आणि आणि इतरांना सतर्क करणे गरजेचे असताना अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते, हे समाजविघातक कृत्य मानले पाहिजे. सरकारच्या पातळीवरून जागरूकता अभियान जोरात सुरू आहे. विविध सामाजिक संघटनाही आघाडीवर आहेत. वर्तमानपत्रांमधूनही बातम्या दिल्या जात आहेत, टीव्हीवर तर उपायांचे प्रात्यक्षिकच बघायला मिळते आहे. असे असतानाही उपाय प्रभावी का ठरत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जागरूकता निर्माण करण्यासाठी जे अभियान प्रशासनाकडून राबविले जात आहे, इतरांकडून राबविले जात आहे, त्यात काही त्रुटी तर नाहीत ना, याचाही शोध तातडीने घेतला पाहिजे आणि प्रभावी उपाय अंमलात आणले पाहिजेत. ज्या गतीने कोरोनाच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे, ती चिंता वाढविणारी आहे. काय होणार, परिस्थिती कधी सुधारणार, सुधारणार की आणखी बिघडणार, रोजगाराचे काय होणार, मुलांच्या शिक्षणाचे काय होणार... असे अनेक प्रश्न सतावू लागले आहेत. पण त्यासाठी वाट पाहणे, काम करणे हेच आपल्या हाती आहे. कोणाही बुवा, बाबाला साकडे घालून हा प्रश्न सुटणार नाही.
 आता कोरोना व्हायरस किती घातक आहे, कसा संक्रामक आहे, संक्रमण होते कसे, मनुष्यावर हा व्हायरस कसा आक्रमण करतो, याबाबत देशातील बहुसंख्य लोक अजूनही अज्ञानी आहेत, हे सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी जनतेला माहिती देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन केले. असे असतानाही लोकांना संकटाचे गांभीर्य कळू नये, हे अनाकलनीय आहे. कोरोनामुळे देशात प्राणहानी होऊ नये यासाठी अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करून केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केले. या लॉकडाऊनच्या काळात उद्योग-व्यवसाय ठप्प होते. मजुरांच्या हाताला काम नव्हते. कारखाने बंद असल्याने अनेक ठिकाणी कामगार कपात झाली, अजूनही सुरू आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. सगळीकडून प्रचंड नुकसान होते आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करणे अपेक्षित होते. कोरोनापासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे अपेक्षित होते. परंतु, या आघाडीवर नागरिक अपयशी ठरले असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी कोरोनाला थोपविण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न केलेत, त्यावर आपणच पाणी फेरले आहे. कोरोना नियंत्रित ठेवण्यात भारताने मोठे यश मिळविल्याबद्दल संपूर्ण जगाने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीला कौतुक केले होते. पण, आज कौतुक करण्यासारखी परिस्थिती राहिली आहे काय, याचा नागरिकांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. प्रश्न असा पडतो की, लोकांना कोरोना व्हायरस किती घातक आहे याचीच नीट माहिती अजूनही नसेल, तर त्यांनी काळजी घ्यायचीच कशी? सुरक्षेचे कोणते उपाय केले पाहिजेत, याबाबत सरकार दिवसरात्र नागरिकांना समजावून सांगत आहे. पण, त्याचा उपयोग होताना दिसत नाही. मास्क लावूनच घराबाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, काम नसेल तर घरीच सुरक्षित राहावे, हात साबणाने सतत धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, अन्न शिजविताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सगळी तपशीलवार माहिती सरकारकडून दिली जात असतानाही नागरिक त्या माहितीचा उपयोग करताना दिसत नाहीत, याला काय म्हणायचे? हे सगळं बाजूला ठेवून जर कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल तर ते फार घातक आहे. अंधश्रध्देचा हा बाजार चीनी बाजारापेक्षा घातक असेल. म्हणून अंधश्रद्धांना रोखण्याचे काम केले पाहिजे. कोरोना हा कोणत्याही कोपाने निर्माण झालेला रोग नाही तर तो चीनच्या पापाने झालेला आहे त्यावर उपाय म्हणजे चीनी मालावर बहिष्कार टाकणे हाच आहे.                                                                                                                                                                  







at June 25, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ▼  June (48)
      • उपचाराचे राजकारण
      • ‘भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ
      • संधीचा फायदा नाही
      • परिवर्तनाची वारी
      • मुखवटा बदलण्याचा डॅ्रगनचा डाव
      • ‘भक्तांची कैवारी, पंढरीची वारी
      • मुंबई सुरू करा
      • आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी
      • अंधश्रद्धेचा बाजार थांबवा
      • चीनची पोटदुखी
      • लॉकडाउन आता नको रे बाबा...
      • सत्य परिस्थिती समोर यावी
      • भवितव्य अंधारात
      • आंबट द्राक्षांची गोष्ट
      • वाईट परिस्थिती
      • चोख उत्तर देण्याची वेळ
      • यांना कुणीतरी आवरा
      • आर्थिक कोंडी हाच उपाय
      • शिक्षणाच्या नावानं ...
      • आषाढस्य प्रथम दिवसे।
      • ‘ चुकीची वेळ'
      • लाठीचे रहस्य..
      • अहंभाव गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी
      • लोकशिक्षणाची वारी
      • प्रामाणिक माणसांना महातवितरणचा शॉक
      • माया ही पंढरी, सेवा ही पंढरी
      • चाले हे शरिर कोणाचिये सत्ते/
      • पाहु दे पंढरी । डोळा गळा॥
      • वारी चुकू न दे हरी...
      • समाजप्रबोधनाचे माध्यम वारी
      • स्वयंशिस्त हे वारीचे वैशिष्ठ्य
      • या जेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं....
      • संतांची मांदियाळी
      • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
      • जाते माहेराला जाते माहेराला
      • पाउले चालती पंढरीची वाट
      • जीवनवाहिनीला हिरवा झेंडा दाखवा
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • आता पावसाची प्रतिक्षा
      • ज्योतिषी हे का सांगत नाहीत?
      • अनेक भाव मनात आहेत...
      • तारणहार....
      • कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण
      • मराठीपण आमच्या रक्तात उतरलं पाहिजे
      • महायुद्धाची नांदी
      • या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
      • पुनश्च हरिओम
      • अनलॉक व्हायचे आहे....
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ▼  June (48)
      • उपचाराचे राजकारण
      • ‘भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ
      • संधीचा फायदा नाही
      • परिवर्तनाची वारी
      • मुखवटा बदलण्याचा डॅ्रगनचा डाव
      • ‘भक्तांची कैवारी, पंढरीची वारी
      • मुंबई सुरू करा
      • आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी
      • अंधश्रद्धेचा बाजार थांबवा
      • चीनची पोटदुखी
      • लॉकडाउन आता नको रे बाबा...
      • सत्य परिस्थिती समोर यावी
      • भवितव्य अंधारात
      • आंबट द्राक्षांची गोष्ट
      • वाईट परिस्थिती
      • चोख उत्तर देण्याची वेळ
      • यांना कुणीतरी आवरा
      • आर्थिक कोंडी हाच उपाय
      • शिक्षणाच्या नावानं ...
      • आषाढस्य प्रथम दिवसे।
      • ‘ चुकीची वेळ'
      • लाठीचे रहस्य..
      • अहंभाव गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी
      • लोकशिक्षणाची वारी
      • प्रामाणिक माणसांना महातवितरणचा शॉक
      • माया ही पंढरी, सेवा ही पंढरी
      • चाले हे शरिर कोणाचिये सत्ते/
      • पाहु दे पंढरी । डोळा गळा॥
      • वारी चुकू न दे हरी...
      • समाजप्रबोधनाचे माध्यम वारी
      • स्वयंशिस्त हे वारीचे वैशिष्ठ्य
      • या जेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं....
      • संतांची मांदियाळी
      • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
      • जाते माहेराला जाते माहेराला
      • पाउले चालती पंढरीची वाट
      • जीवनवाहिनीला हिरवा झेंडा दाखवा
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • आता पावसाची प्रतिक्षा
      • ज्योतिषी हे का सांगत नाहीत?
      • अनेक भाव मनात आहेत...
      • तारणहार....
      • कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण
      • मराठीपण आमच्या रक्तात उतरलं पाहिजे
      • महायुद्धाची नांदी
      • या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
      • पुनश्च हरिओम
      • अनलॉक व्हायचे आहे....
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.