prafulla phadke mhantat

Thursday, June 25, 2020

आर्थिक कोंडी हाच उपाय


भारतातीय अर्थव्यवस्थेत आज 70 टक्केपेक्षाज जास्त उत्पादने आणि ग्राहकसवयी या चीनी उत्पादनांच्या आहेत. या चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकणे हाच सध्याच्या घडीला फार मोठा उपाय आहे. एकेकाळी भारतीय लोकसंख्या हा जगभरात चेष्टेचा विषय होता. पण ही वाढती लोकसंख्या हाच संपूर्ण जगाच्यादृष्टीने, प्रगत राष्ट्रांच्या दृष्टीने बाजारपेठ होती. या बाजारपेठेसाठी आर्थिक, बाजारी आक्रमणे झाली, सांस्कृतिक आक्रमणे झाली आणि आपण त्यांच्या आधीन झालो. गेल्या दोन अडीच दशकात चीनने पूर्णपणे भारताची बाजारपेठ काबीज करून स्वत: समृद्ध झालेला आहे. म्हणूनच आज त्यांच्या उत्पादनावर बहिष्कार टाकणे आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळणे हाच उपाय आहे. सीमेवर आपले सैनिक हौतात्म्य पत्करत असताना, सीमेचे रक्षण जीवाची पर्वा न करता लढत असताना त्या सैनिकांना ताकद देण्याचे काम आपले आहे. ही ताकद चीनी उप्पादनावर बहिष्कार टाकून दिली जाईल.
  काळाची गरज म्हणून आपल्याला आजच्या काळाची ही  नवी अस्त्रे उगारावी लागतील.  शत्रुशी लढण्या अर्थशस्त्रे... हा नवा नारा आता सर्वत्र उमटत आहे. विकसित देश अण्वस्त्रसंपन्न झाल्याने आणि अण्वस्त्रांचे तसेच युद्धाचे दुष्परिणाम जग जाणून चुकल्याने, आता प्रत्यक्ष युद्ध करण्यासाठी सारेच कचरू लागले आहेत. कसेही करून युद्ध टाळून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याकडे जगाचा कल दिसत आहे. तरीदेखील शेजारी देशच नव्हे, तर त्यांचे मित्रदेशसुद्धा एकमेकांवर गुरकावत असतात, एकाचा राग दुसर्यावर काढत असतात. प्रसंगी याचा भडका उडतो आणि मग दोन्हीकडच्या सैन्यांना एकमेकांसमोर नाईलाजास्तव उभे राहावे लागते. लडाखच्या गलवान सीमेवरील संघर्षात चीन आणि भारताचे सैनिक एकमेकांपुढे आले आणि यामध्ये 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले, तर तब्बल 43 चिनी सैनिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. गलवान सीमेवरील भारतीय भूभाग हडपण्यासाठी चीनने हा संघर्ष विकत घेतलेला आहे. आज काही केल्या चीन ऐकत नाही.यापूर्वीही चीनशी भारताने अनेकवेळा संघर्ष घेतलेला आहे. प्रसंगी त्याला माघार घेण्यासही भाग पाडले आहे. पण, चिवट चीन आपले विस्तारवादी राजकारण सोडण्यास तयार नाही. चीनशी युद्ध तर शक्य नाही, पण त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या तर तो नरमाईची भूमिका निश्चितच स्वीकारू शकतो. भारताच्या डीमॉनिटायझेशनने चीनला एक झटका दिलेला आहे. अनेक जण म्हणतात की, डीमॉनिटायझेशनमुळे काय झाले? पण, ज्या वेळी भारत सरकारने चलनबंदीचा निर्णय घेतला त्यानंतर तीन महिने चीनची अर्थव्यवस्था आचके देत होती. आज भारत-चीन व्यापार 88 दशसहस्र डॉलर्सचा आहे. त्यावर जर परिणाम झाला, तरच चीनवर काही फरक पडेल, अन्यथा त्याचे वागणे बदलणे शक्य नाही.
    चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणे एवढ्यासाठीही गरजेचे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग यांच्या गेल्या सहा वर्षांत अनेकदा भेटी झाल्या. उभयतांनी एकमेकांची निमंत्रणे स्वीकारून त्या त्या देशांचे दौरे केले व एकमेकांचे आदरातिथ्य स्वीकारले. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वेळा चीनमध्ये गेले. त्या निमित्ताने काही आर्थिक आणि वाणिज्यिक करार चीनसोबत झाले. आज व्यवसायाच्या दृष्टीने बघितले, तर चीनच्या 500 हून अधिक कंपन्या भारतात ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना हाकलणे, त्यांच्यावर बहिष्कार टाकणे हे उपाय केले पाहिजेत. कदाचित वाटेल की त्या कंपन्यांमध्ये काम करणारा आमचा कामगार त्यामुळे बेरोजगार होईल. ही भिती सोडायला हवी. त्या उद्योगांवर भारतीय शिक्का मारून आता कबजा केला पाहिजे. चीन जर आमच्या सीमेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत असेल तर  त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी त्यांच्या उद्योगांवर कबजा घेण्यास काहीच हरकत नाही. यामार्गे आर्थिक कोंडी करणे हाच मोठा अपाय आहे.
सध्याच्या परिस्थितीत परस्परसौहार्दपूर्ण संबंध काही कामाचे नाहीत, असे जर चीनला वाटत असेल तर चीनवर, त्या देशातील उत्पादनांवर बहिष्कार घालणे हेच प्रभावी अस्त्र ठरू शकते.
 खोटा बुरखा चढवूनत एकीकडे चीन शांततेची भाषा बोलतो आणि दुसरीकडे भारताच्या पाठीत खंजीर खुपसतो. लडाखच्या गलवान खोर्यातील हिंसाचारामुळे सारे भारतीय जनमानस संतापलेले आहे. सार्या देशातच चीनविरोधी लाट उसळलेली आहे. आजवर स्वदेशी जागरण मंचने, चिनी उत्पादनांवर बंदीचे अस्त्र उगारा, यासाठी आंदोलने केली, भारतीयांना चीनच्या विस्तारवादी भूमिकेबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्या वेळी चीनविरोधी भूमिका फारशी पटली नव्हती. पण, आज ज्या वेळी चिनी कुकृत्याचे परिणाम समोर दिसू लागले, त्या वेळी भारतीयांच्या मुठी आवळल्या जाऊ लागल्या आणि कधी एकदा चीनच्या नरडीचा घोट घेतो, अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.
    चीनचे भारताशी शत्रुत्व काही नवे नाही. ज्या वेळी आपण पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावर एकाकी पाडण्याचा प्रयत्न करीत होतो, त्याकरिता जागतिक पातळीवर लढा देत होतो, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी प्रयत्न करत होतो, त्या वेळीही चीनने पाकिस्तानच्या मैत्रीपोटी भारताच्या या कामात खोडा घालण्याचेच काम केले होते. 2017 मध्ये डोकलाममध्येही त्याने भारताच्या विश्वासाला तडा देण्याचे काम केले. मात्र, भारताच्या कणखर भूमिकेमुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली. अगदी 1962 पासूनचा इतिहास काढला, तर वारंवार चीनने भारताच्या प्रदेशात घुसखोरी केलेली दिसून येईल. गेल्या सहा वर्षात मोदींची सत्ता केंद्रात आल्यानंतर चीनच्या विस्तारवादाला खीळ बसली आणि त्यामुळे तो चवताळला. त्यामुळे या युद्धजन्य परिस्थितीला अनेक विद्वान मोदी सरकारला दोष देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण किती दिवस आपण परावलंबी रहायचे याचाही विचार या लोकांनी केला पाहिजे. त्यानंतरही अनेक प्रसंगात त्याने भारतात पाय रोवून आपल्या भूभागावर दावा करण्याचे प्रताप केले. पण, प्रत्येक वेळी आपल्या सैन्याने ते हाणून पाडले.
    चीनची आर्थिक कोंडी करायची असेल, तर त्याच्या व्यापारावरच घाला घालण्याची गरज निर्माण झाली आहे. चीनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे, ती जर बंद पडली तर चीनची कोंडी झाल्याशिवाय राहायची नाही. ज्याप्रमाणे पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने काढून टाकला व या देशापासून आपली सुटका करवून घेतली, तसाच चीनचाही त्या प्रकारचा दर्जा काढून घेण्याची वेळ आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी चिनी उत्पादनांचा वापर होत असेल त्या त्या ठिकाणी त्यांचा वापर करणे थांबविले पाहिजे. निव्वळ चिनी उत्पादनांचा वापर बंद करून चालणार नाही, त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. एक भारतीय म्हणून आपले ते परमकर्तव्य आहे. आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. मोठमोठ्या शहरात चीनने त्यांच्या मालाची साठेबाजी करवून ठेवली आहे. चीनचे एक धोरण आहे, ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा, त्या क्षेत्रात प्रचंड पैसा ओतायचा. त्या क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या कंपन्यांची नाकेबंदी करायची, त्यांची उत्पादने बाजारपेठेतून हद्दपार होतील, यासाठी साम-दाम-दंड-भेदाच्या नीतीचा वापर करायचा. त्याच क्षेत्रातील स्वस्तातील स्वस्त उत्पादने बाजारात आणायची आणि तशीच दर्जात्मक उत्पादनेही पर्याय म्हणून ठेवायची. यातून सध्याच्या कंपनीची वितरणाची साखळी मोडायची, त्या कंपनीची शक्य तेवढी आर्थिक कोंडी करून तिला गाशा गुंडाळायला भाग पाडायचे आणि आपली एक ाधिकारशाही प्रस्थापित करायची, असे ते धोरण आहे. पण, 135 कोटी भारतीयांनी जर एकमताने ठरवले तर चिनी कंपन्या, त्यांची उत्पादने भारतीय बाजारपेेठेतून हा हा म्हणता गायब झाल्याचे चित्र दिसू शकेल. आज काळाची गरज, देशाची गरज म्हणून प्रत्येकाने निर्धार करण्याची हीच ती वेळ आहे.








at June 25, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ▼  June (48)
      • उपचाराचे राजकारण
      • ‘भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ
      • संधीचा फायदा नाही
      • परिवर्तनाची वारी
      • मुखवटा बदलण्याचा डॅ्रगनचा डाव
      • ‘भक्तांची कैवारी, पंढरीची वारी
      • मुंबई सुरू करा
      • आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी
      • अंधश्रद्धेचा बाजार थांबवा
      • चीनची पोटदुखी
      • लॉकडाउन आता नको रे बाबा...
      • सत्य परिस्थिती समोर यावी
      • भवितव्य अंधारात
      • आंबट द्राक्षांची गोष्ट
      • वाईट परिस्थिती
      • चोख उत्तर देण्याची वेळ
      • यांना कुणीतरी आवरा
      • आर्थिक कोंडी हाच उपाय
      • शिक्षणाच्या नावानं ...
      • आषाढस्य प्रथम दिवसे।
      • ‘ चुकीची वेळ'
      • लाठीचे रहस्य..
      • अहंभाव गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी
      • लोकशिक्षणाची वारी
      • प्रामाणिक माणसांना महातवितरणचा शॉक
      • माया ही पंढरी, सेवा ही पंढरी
      • चाले हे शरिर कोणाचिये सत्ते/
      • पाहु दे पंढरी । डोळा गळा॥
      • वारी चुकू न दे हरी...
      • समाजप्रबोधनाचे माध्यम वारी
      • स्वयंशिस्त हे वारीचे वैशिष्ठ्य
      • या जेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं....
      • संतांची मांदियाळी
      • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
      • जाते माहेराला जाते माहेराला
      • पाउले चालती पंढरीची वाट
      • जीवनवाहिनीला हिरवा झेंडा दाखवा
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • आता पावसाची प्रतिक्षा
      • ज्योतिषी हे का सांगत नाहीत?
      • अनेक भाव मनात आहेत...
      • तारणहार....
      • कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण
      • मराठीपण आमच्या रक्तात उतरलं पाहिजे
      • महायुद्धाची नांदी
      • या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
      • पुनश्च हरिओम
      • अनलॉक व्हायचे आहे....
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ►  July (59)
    • ▼  June (48)
      • उपचाराचे राजकारण
      • ‘भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ
      • संधीचा फायदा नाही
      • परिवर्तनाची वारी
      • मुखवटा बदलण्याचा डॅ्रगनचा डाव
      • ‘भक्तांची कैवारी, पंढरीची वारी
      • मुंबई सुरू करा
      • आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आषाढी
      • अंधश्रद्धेचा बाजार थांबवा
      • चीनची पोटदुखी
      • लॉकडाउन आता नको रे बाबा...
      • सत्य परिस्थिती समोर यावी
      • भवितव्य अंधारात
      • आंबट द्राक्षांची गोष्ट
      • वाईट परिस्थिती
      • चोख उत्तर देण्याची वेळ
      • यांना कुणीतरी आवरा
      • आर्थिक कोंडी हाच उपाय
      • शिक्षणाच्या नावानं ...
      • आषाढस्य प्रथम दिवसे।
      • ‘ चुकीची वेळ'
      • लाठीचे रहस्य..
      • अहंभाव गळून जाण्याचा सोहळाः पंढरीची वारी
      • लोकशिक्षणाची वारी
      • प्रामाणिक माणसांना महातवितरणचा शॉक
      • माया ही पंढरी, सेवा ही पंढरी
      • चाले हे शरिर कोणाचिये सत्ते/
      • पाहु दे पंढरी । डोळा गळा॥
      • वारी चुकू न दे हरी...
      • समाजप्रबोधनाचे माध्यम वारी
      • स्वयंशिस्त हे वारीचे वैशिष्ठ्य
      • या जेजारणीनं केलं, मला पंढरीला नेलं....
      • संतांची मांदियाळी
      • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
      • जाते माहेराला जाते माहेराला
      • पाउले चालती पंढरीची वाट
      • जीवनवाहिनीला हिरवा झेंडा दाखवा
      • परिस्थितीवर मात करण्याचे शिक्षण
      • आता पावसाची प्रतिक्षा
      • ज्योतिषी हे का सांगत नाहीत?
      • अनेक भाव मनात आहेत...
      • तारणहार....
      • कोरोनाचे वादळ आणि पर्यावरण
      • मराठीपण आमच्या रक्तात उतरलं पाहिजे
      • महायुद्धाची नांदी
      • या संघर्षात स्वदेशीचे महत्व पटेल
      • पुनश्च हरिओम
      • अनलॉक व्हायचे आहे....
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.