- सध्या महाराष्ट्र आणि देशाला धोका आहे तो ओवेसीच्या एमआयएम पक्षापासून. देशहितापेक्षा हा पक्ष देशघातक कामांचेच स्वप्न पहात असतो. त्यामुळे त्या ओवेसी आणि त्याच्या पक्षाला वेसण घालणे फार महत्त्वाचे आहे. दाउद, छोटा शकील, टायगर मेमन यांच्या मुसक्या आवळणे शक्य नसले तरी सध्या जो मोकाट सुटला आहे त्याच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाही तर हेच लोक या देशात, राज्यात मुंबईत घातपात करू शकतील अशी परिस्थिती आहे.
- अर्थात ओवेसी आणि त्याच्या पक्षाला महाराष्ट्रा शिरकाव करू दिला तो कॉंग्रेसनेच. विहीरीतील आपल्या बांधवांना धडा शिकवण्यासाठी एखाद्या बेडकाने सापाशी मैत्री करावी आणि त्याला विहीरीत प्रवेश करू द्यावा तसाच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या ओवेसीला आवरणे आवश्यक आहे. महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही पण ती महत्वाकांक्षा विधायक असली पाहिजे. हैदराबादचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे दु:साहस याच प्रकारात मोडणारे आहे. जो रझाकार भारतात येण्यास तयार नव्हता आणि पाकीस्तानवर ज्याचे प्रेम होते त्याची ही औलाद आपल्या पोटात ठेवणे म्हणजे विषाचे प्राशन करण्यासारखे आहे, म्हणून त्याला वेळीच ठेचला पाहिजे.
- देशातील सध्याच्या पिढीला हैदराबाद मुक्तिसंग्राम इतिहासाबद्दल तशी कमीच माहिती आहे. सरदार पटेल यांच्या पोलादी हातांनी धैर्याने आणि चतुराईने तत्कालीन हैदराबादच्या निझामाचे साम्राज्य भारतात विलीन करून जिनांचे दु:स्वप्न धुळीस मिळवले होते. हैदराबादच्या ओवेसींकडून सुरू असलेले फुटीर राजकारण समजून घ्यायचे असेल तर मुक्तिसंग्रामाचा इतिहास विसरून चालणार नाही. ओवेसी यांना समजून घेण्यासाठी हैदराबाद येथे जन्मलेला आणि वाढलेला मजलिसे इत्तिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) समजून घ्यावा लागेल. जिना यांच्या मुस्लिम लीगप्रमाणेच एमआयएमचा आधारही फक्त आणि फक्त मुसलमान मतदारच आहे. जो मतदार आपला हक्काचा म्हणून एकेकाळी कॉंग्रेस अवलंबून होती, ज्या मतदारांवर समाजवादी पार्टीने सतत डोळा ठेवला आणि अबू आझमीसारख्यांना पोसले तोच मतदार एकत्र करण्यासाठी मुसलमान मतदारांची माथी भडकवण्याचे काम ओवेसी करत आहे. ही देशात दुफळी माजवण्याची तयारी आहे, ती वेळीच रोखली पाहिजे.
- भारतात वेळोवेळी मुस्लिमांच्या अनेक राजकीय आणि सामाजिक संघटना उभ्या झाल्या आहेत. पण त्यातील मुस्लिम लीग आणि मजलिसे इत्तिहादुल मुस्लिमीन आजही जिवंत आहेत. यांचे प्रभावक्षेत्र भले मर्यादित असेल, वेळ येताच हे पुन्हा सक्रिय होतात. आता मुंबई बॉंबस्फोटातील दोषी याकूब याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ओवेसी यांनी फुत्कार सोडण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्त ओवेसी यांनी फुटीरता आणि धर्मांधतेला खतपाणी घालणे सुरू केले आहे. या रणनीतीचा परिणाम लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत पाहण्यास मिळत आहे. राजकारणात येऊन ओवेसी यांनी या खेपेला मुस्लिम मतदारांच्या बळावर फुटीर राजकारण करत मुस्लिम मतदारांच्या मनात व मेंदूत खळबळ माजवून दिली आहे. कधी नव्हे इतके लोक ओवेसीला भेटण्यासाठी, त्याच्या पक्षात जाण्यासाठी एकत्र होत आहेत. त्यांना चांगला विचार दिला तर हरकत नाही पण याच संघटनातून जर काही देशविघातक कृत्य केले गेले तर ते फार महागात पडेल हे लक्षात घेतले पाहिजे.
- देशातील कॉंग्रेस क्षीण होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी आपला डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. केरळात कोया यांनी जो डाव साधला, त्याच मार्गाने जात आंध्र आणि आसपासच्या प्रदेशात ताकद वाढवण्याचा ओवेसींचा प्रयत्न आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने त्यांचा उत्साह वाढला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचे सत्तेत येणे मुसलमानांसाठी वरदान ठरले. कारण, पाकिस्तान बनल्यानंतर कॉंग्रेसच्या मागे जाण्याशिवाय मुसलमानांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. याचा पुरेपूर फायदा मुसलमानांना व्होट बँक बनवून कॉंग्रेसने घेतला. अगदी याच प्रकारे कॉंग्रेसचा पुरेपूर फायदा करून घेण्यात मुसलमानांनीही काही कसर सोडली नाही. नंतरच्या काळात जिथे जिथे मुसलमान बहुसंख्येने आहेत त्या ठिकाणी ते आपले छोटे छोटे पक्ष बनवत राहिले. असदुद्दीन ओवेसी यांनी याचाच तर फायदा घेतला. भारतात जेव्हा जेव्हा कॉंग्रेस अडचणीत आला तेव्हा त्याला मुस्लिम मतदारांनी तारले. त्यामुळे मुस्लिम नेत्यांना आत्मविश्वास आहे की, वेळ येईल तेव्हा मुस्लिम पक्षांना सरकार बनवायचे असेल तर कॉंग्रेस पक्ष नक्कीच धावून येईल. त्यामुळे पुढील काळात सत्ता मिळवण्यासाठी कॉंग्रेस आणि मुस्लिम पक्षांमध्ये जवळीक पाहण्यास मिळाली तर आश्चर्य करण्याचे कारण नाही. केरळमध्ये मुस्लिम लीग हा पक्ष सत्तेत कॉंग्रेसचा भागीदार राहिला आहे. महाराष्ट्रात गरज लागेल तेव्हा कॉंग्रेस साथ देईल, याची ओवेसी यांना खात्री आहे. एकूणच काय तर सत्तेची चव चाखत राहण्यासाठी कॉंग्रेस ओवेसींचा लाभ घेईल आणि ओवेसी कॉंग्रेसचा. पण याचा दुरूपयोग ओवेसी करून घेईल यात शंकाच नाही.
Monday, August 3, 2015
ओवेसीला वेळीच रोखा, नाहीतर आहे धोका
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment