prafulla phadke mhantat

Saturday, July 11, 2020

मूलाधार व्यास



 आज गुरूपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.
   व्यासांचे कौरव-पांडव ह्या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. ह्या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उद्धस्त झाली असेल त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते.
   गीतेच्या प्रारंभी जी अर्जुन-विषादाची वेदना प्रगटते, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेला उपदेश आहे. व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांनी आपली धार्मिक आणि वैचारीक परंपरा निर्माण केली. म्हणून त्यांना हे गुरूत्व प्राप्त झालेले आहे. म्हणौनि भारतीं नाहीं। तें न्हवे चि लोकीं तिहीं। एणें कारणें म्हणिपे पाहीं। व्यासोच्छिष्ट जगत्रय॥  असे ज्ञानोबा म्हणतात. व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. प्रात:स्मरणात व्यासांच्या नमनाचा जो श्लोक आहे त्यात आधीच्या तीन, पुढची एक आणि मधले व्यास धरुन एकूण पाच पिढ्यांचा उल्लेख केलेला आहे. व्यासं वसिष्टनप्तारं, शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वंदे, शुकतातं तपोनिधिम् कोण? तर व्यास वसिष्ठांचा पणतू, शक्तीचा नातू, पराशराचा पुत्र आणि शुकाचा पिता. सर्व ज्ञानांचे मूळ असल्यामुळेच त्यांना गुरू म्हटले जाते. त्यांच्या स्मरणातून आपल्या सदगुरुची पूजा केली जाते. आपली गुरूपरंपरा फार मोठी आहे.
भगवान शंकर त्यांचे शिष्य विष्णू त्यांचे शिष्य ब्रह्मा अशी ती सुरू होते.
    त्यानंतर भगवान श्री राम, भगवान श्रीकृष्ण हे देवावतार असूनसुद्धा गुरुअंकित आहेत. अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा गुरू असतो. जो सकल जिवास चांगले शिकवितो. सुसंस्कार देतो तो गुरू. सत् म्हणजे सत्य परमात्म्याची भेट घालून देणारा, त्याला सद्गुरू म्हणावे. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला मंत्र, तंत्र, उपदेश देणारे भरपूर गुरू भेटतील. पण आपल्या शिष्यास सद्वस्तूची ओळख करून देणाराच सद्गुरू होऊ शकतो. सद्गुरूपेक्षाही मोठा श्रीगुरू असतो. ज्ञानोबा माउलींना एकनाथ महाराज श्रीगुरू म्हणूनच संबोधतात. एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले। श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर्।्।
   याही पुढे गुरूची एक पायरी असते. ती म्हणजे जगद्गुरू. आद्य शंकराचार्य, तुकोबाराय आणि श्रीकृष्ण परमात्मा यांना जगद्गुरू ही उपाधी आहे. कारण ते सगळ्या जगाचे गुरू ठरलेले आहे. असा जगद्गुरू परमात्मा साक्षात भगवंत हा अर्जुनाजवळ होता. आणि गंमत अशी की, अर्जुन वेडयासारखे श्रीकृष्ण परमात्म्यालाच प्रश्न करू लागला. कारण अर्जुनाकडे अहंकार उरला होता. उरलेला अहंकारच त्याचा मुखातून देवालाच ज्ञान शिकवू पाहात होता. वास्तविक पाहाता भगवान श्रीकृष्णाने धर्म, न्याय, नीती, नियम यांचा वस्तुपाठ अगदी लहान वयातच जगताला दाखवून दिला होता. देवकी आणि वसुदेवासाठी तो बाळकृष्ण झाला. कुमारींच्यासाठी तो गोकुळी गेला होता. लहान असतानाच पूतनेचा वध केला. गर्वाने फुगलेल्या इंद्रदेवाचा गोवर्धन उचलून अहंकार घालविला. लेकीबाळींना, मुलंमाणसांना त्रास देणारा कालिया त्याच्या डोक्यावर थयथय नाचून लहानपणीच यमसदनास पाठविला. गोकूळ नगरीवर आलेले संकट घालविण्यासाठी बारा गाव अग्नी प्राशन केला. बह्मदेवास वेड लावण्यासाठी गोमातेचं वासरू बनला. अत्यंत लहान वयातच कंसमामासारख्या अनेक राक्षसांना त्याने यमसदनास पाठविले. याच श्रीकृष्णाने गोकूळनगरीत समाजकारण केले. मथुरेला जाऊन पक्के राजकारण केले तेही समाजहितासाठी आणि द्वारकेत मात्र पूर्णपणे धर्मकारणच केले. कारण तिथे तो धर्माचा राजा होता व राजाचा धर्म पाळणारा म्हणूनच तो द्वारकाधीश झाला. हे सगळं अर्जुनाला माहीत होतं. तो बालपणापासूनच अर्जुनाचा जिवलग होता. युक्तीच्या सगळ्या गोष्टी देवाला माहिती होत्या. त्याने महाभारताचे युद्ध होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले. कारण युद्धामुळे होणारा संहार त्याला माहीत होता. तो टाळावा यासाठी तो प्रयत्नशील होता. हे युद्ध आप्तइष्टातच होऊन दोन्हीही बाजूंचे नुकसान होणार होते. या सर्व गोष्टींचा अनुभव श्रीकृष्णाला होता. पण तरी देखील देवाला काहीच कसे कळत नाही. तो मला माझ्याच गुरूंच्या विरूद्ध लढायला भाग पाडतो. वरील सद्गुरू, गुरू, श्रीगुरू, जगद्गुरू या संज्ञेमध्ये गुरू द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे कुठेच बसत नाहीत. केवळ एक क्रूर, अनीतीची पाठराखण नाइलाजास्तव का होईना करावी लागते म्हणून ते अर्जुनासारखा उत्तम शिष्य असूनही त्याला मारण्यासाठी शत्रूच्या पक्षात उभे राहतात. ही धर्मनीती नाही. पण जे आपले गुरू आहेत, ज्यांच्याकडून मी विद्या घेतली, त्यांच्या वधास कारणीभूत होणे हे योग्य नाही. त्यांना मारून राज्य मिळविणे योग्य नाही त्यापेक्षा दयेचीच भिक्षा मागणे योग्य होईल. ते माझ्या नशिबाचे, रक्ताचे भोग समजून तसे करणे योग्य होईल पण गुरुवधाच्या पापात पडणे योग्य होणार नाही अशी धारणा अर्जुनाची आहे. तसं पाहिलं तर गुरूंचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे. गुरू हा संतकुळीचा राजा आहे. तो माय, बाप, बंधू, भगिनी, मित्र, सगा, सोरा अशा सगळ्या नात्यांचा सूत्रधार आहे. तो ब्रह्मनंद देणारा आहे. परमसुखद आहे. फक्त ज्ञानपूर्ती आहे. द्वंद्व असण्याचं काहीच कारण नाही. कारण गुरू हा त्याचाही पुढे आहे. ज्ञानमूर्ती असल्याने त्याचे ज्ञान गगनासारखे विस्तीर्ण आहे. भावाच्या पलीकडे तो पोहोचलेला असल्यामुळे सत्त्व, रज, तम या त्रिगुणांच्या पलीकडे आहे.
जो शुद्ध, अतिपवित्र, आत्मज्ञानी आहे. स्वआत्म्याशी रत आहे. असे असल्यामुळेच तो पूर्ण निर्भय आहे. नित्य तृप्त व सदा मुक्त आहे.
सच्चिदानंद असल्याने तोच सद्गुरू आहे. त्याला नमस्कार करून त्यांनाच आशीर्वाद संपादन करणे हे सर्वोत्तम आहे. हे जे सर्व अनुभवाचे ज्ञानभांडार व्यासांनी निर्माण केले त्यामुळे ते सदैव वंद्य झाले. म्हणून त्यांच्या नावाने गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.





at July 11, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.