prafulla phadke mhantat

Wednesday, July 15, 2020

महाजॉब्जचा दिलासा


कोरोनाचे वाढते संकट आणि त्यामुळे बंद पडत चाललेल्या उद्योगांमुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. आज लाखो लोकांनी आपला रोजगार गमावला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘महाजॉब्स पोर्टल’ नावाचे जॉब नोंदणी पोर्टल सुरु केले. बेरोजगारांसाठी हा नक्कीच दिलासा आहे. या पोर्टललला पहिल्याच दिवशी  700 उद्योजकांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दिला आहे, तर सुमारे 15 हजारांहून अधिक इच्छुकांनी या ठिकाणी नोंदणी केली आहे. त्यामुळे अशा एखाद्या पोर्टलची खूपच आवश्यकता होती आणि हे पोर्टल रोजगार देण्याच उपयुक्त ठरेल असे दिसते.
आज राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात काम मागणार्‍या हातांची संख्या बेसुमार आहे. त्या तुलनेत काम देणार्‍यांची संख्या अपुरी पडते आहे. अर्थात हे काही आजचे दृष्य नाही. अगदी स्वातंत्र्यापासून बेरोजगारीचे प्रमाण आपल्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. काम मागणार्‍यांना काम देण्यास आपले सरकार कायम कमी पडत आलेले आहे. सरकार कोणतेही असो, त्या सरकारपुढचा पहिला प्रश्न असायचा तो बेरोजगारीचा. त्यामुळे अनेक दशके आपल्याकडे यावर फक्त चर्चा घडत राहिल्या, त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न फार कमी झाले. या कालावधीत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात बेरोजगारी कमी करणे, रोजगार निर्मितीला प्राधान्य देणे हा मुद्दा असायचा. अर्थात त्याला फारसे यश कोणालाच आले नाही. पण त्यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे होते. त्यामुळे हे नवे पोर्टल सुरू करण्याचे काम सरकारने केले असेल तर ती चांगली गोष्ट आहे. अर्थात पोर्टल सुरू केले म्हणजे लोकांना रोजगार मिळेल असे नाही. कारण पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज होतेच की. त्यांच्याकडून कोणाला कधी रोजगार मिळाला? तिथे जाउन फक्त नाव नोंदणी करून यायचे. एम्प्लॉयमेंट कार्ड काढले की तरूण वर्षानुवर्षे वाट पहात असायचे. तोच प्रकार या डिजीटल योजनेत होणार का असाही प्रश्न आहे. पण आज वाढती बेरोजगारी आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे  हे कोरोनाचे संकट आलेले आहे. आता कोरोना, लॉकडाऊन यामुळे संपूर्ण जगभरात महामंदीचे, महाबेरोजगारीचे संकट आहे. एप्रिल 2019 पासून देशातील बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांच्या खाली राहिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर अलेली ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी असून बहुतांश संस्थांनी त्यांची नोकर भरती प्रक्रिया थांबवली आहे किंवा कर्मचारी कपात केली जात आहे. या अडचणीमुळे नव्याने इंजिनिअर झालेल्या पदवीधारकांना संधी शोधत असताना योग्य वेळेत नोकरी मिळण्याकरिता अडचणी येत असल्याचे भारतातील सर्वात मोठ्या आयपी संचलित ‘इन्क्युबेशन लॅब ब्रिजलॅब्ज सोल्युशन एलएलपी’द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमधील जवळपास 1 हजारच्या आसपास विद्यार्थ्यांदरम्यान केल्या गेलेल्या या सर्वेक्षणातून इंजिनिअर्सना नोकरीसाठी सक्षम बनवण्यात कौशल्यातील तफावत भरून काढण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली. अर्थात सर्वच प्रकारच्या पदवीधरांची ही परिस्थिती आहे. या सर्वेक्षणात फक्त इंजिनीअर्सचा उल्लेख असला तरी सर्वांची अवस्था तीच आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता, नोकरी शोधणार्‍यांसाठी एखाद्या मजबूत कौशल्य समूहाची गरज आहे. जी परिस्थिती इंजिनिअर विद्यार्थ्यांची आहे, तशीच अवस्था एम.बी.ए., एम.ए. आणि इतर पदवीधारकांचीही आहे. जवळपास सर्वच विभागातील नोकरभरती ठप्प आहे. जे नोकरीवर आहेत त्यांनाही कमी करण्याचा आणि खर्चात कपात करण्याचा निर्णय अनेक कंपन्यांनी यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आलेली आहे. त्यामुळे कोणतेही नवे खर्च त्याला झेपणारे नाहीत.
  त्यामुळेच या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ‘महाजॉब्स पोर्टल’ नावाचे जॉब नोंदणी पोर्टल सुरु केले, ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे. आज लाखो तरूणांनी यावर आपली नोंद केल्याचे दिसते आहे. यातून रोजगाराच्या प्रतिक्षेत किती जण आहेत हे चित्र समोर येते. महाराष्ट्रातील तरूणांचा विचार केला तर त्यांची तक्रार असते की परप्रांतीय आमचा रोजगार हिरावून घेतात. प्रत्येक राज्यातील स्थानिकांची ही तक्रार असतेच. लॉकडाउन झाल्यावर जे परप्रांतीय सोडून गेले त्यांच्या जागी अनलॉक झाल्यावरही नवी भरती करण्याचे धाडस अनेक कंपन्यांनी केलेले नाही. आज अनेक कंपन्यांनी अजूनही आपल्याकडे असणार्‍या परप्रांतीय मजुरांची, कर्मचार्‍यांची ते परतून येतील यासाठी वाट बघणे पसंत केले आहे, तर औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणच्या एमआयडीसी विभागातील अनेक कंपन्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे बंद करण्यात आल्यानेही नोकर भरती ठप्प आहे. राज्य सरकारने सुरु केलेल्या या जॉब्स पोर्टलचा कितीजणांना फायदा होणार हे आज तरी सांगता येणार नाही. याचे आणखी एक कारण असे की आपल्याकडे काम नाही झाले तरी चालते पण श्रेय कोणाला मिळणार याचा हिशोब केला जातो. रोजगार मिळाला नाही तरी चालेल पण दिखावा झाला पाहिजे. सरकार काहीतरी करते आहे हे दिसले पाहिजे. पण जे काही सरकार करणार आहे त्याचा फायदा राजकीय पक्षांना कसा मिळेल याचाच विचार अधिक केला जातो. त्यामुळेच हे महापोर्टल सुरू केले असले तरी  एकाच वेळी दोन नावाने हे पोर्टल चालवले जात आहे. एक शिवसेनेच्या मार्फत तर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत. यातून काय साध्य होणार आहे? सरकार महाविकास आघाडीचे आहे. पोर्टल सरकारचे आहे मग त्यावर आपला हक्क सांगून तरूण शक्ती आपल्या पक्षाकडे ओढण्याची ही घाई का केली जात आहे? ही पक्षाची सदस्यता नोंदणी नाही. नुकतीच इंदिरा गांधी इन्स्टिट्यूूट ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च या संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांचा 34 हजार कोटी रुपयांचा मोबदला बुडाला आहे. म्हणजे 25 मार्च ते 14 एप्रिल या काळात करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये 11.6 कोटी श्रमिकांचे रोजगार गेले. दुसर्‍या टप्प्यात 15 एप्रिल ते 3 मे या दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये 7.9 कोटी श्रमिकांना रोजगार गमवावा लागला आहे. या संस्थेच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या दोन्ही लॉकडाऊनमध्ये ज्या श्रमिकांचे रोजगार गेले, ते ज्या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती त्या राज्यांतील होते. कोरोना रुग्ण सर्वाधिक असणार्‍या आघाडीच्या पाच राज्यांतून 40 टक्के श्रमिक आहेत, तर रोजगार गमावलेले 70 टक्के श्रमिक कोरोना रुग्ण असलेल्या आघाडीच्या 10 राज्यांतील आहेत. या संस्थेने केलेल्या अभ्यासातून रोजंदारीवर काम करणारे किंवा अनौपचारिक क्षेत्रातील श्रमिकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे.  दोन्ही लॉकडाऊनचा विचार करता, शहरी भागात काम करणा-या श्रमिकांना या काळात सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. ग्रामीण भागात हालचालींवर कमी प्रतिबंध असल्यामुळे ग्रामीण भागातील श्रमिकांना फायदा झाला आहे.
ग्रामीण भागातूनच देशभरात शेतमाल व अन्य खाद्यपदार्थ वितरित होत असल्यामुळे या भागांत प्रतिबंध कडक केले गेले नव्हते. त्यामुळे येथील लोकांच्या रोजगारावर मोठा विपरित परिणाम दिसून आला नाही. या अहवालाशिवाय इंडस्ट्री चेंबर फिक्की व इंडियन एंजेल नेटवर्क यांनी ‘भारतीय स्टार्टअपवर झालेला कोरोनाचा प्रभाव’ या विषयावर एक पाहणी केली. या पाहणीनुसार, देशातील 12 टक्के स्टार्टअप बंद पडले आहेत. त्यामुळे या पोर्टलचा फायदा काय होतो हे बघावे लागेल.





at July 15, 2020
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Contributors

  • Dare | Dream
  • prafulla phadke mhantat

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Report Abuse

facebook

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

Subscribe To

Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments

Search This Blog

Pages

  • Home

Featured Post

दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच

कुख्यात कम्युनिस्ट हुकूमशहा जोसेफ स्टॅलिन एका मुलाखतीत म्हणाले होते की, शिक्षण हे एक शस्त्र आहे, ज्याची परिणामकारकता ते कोणाच्या हातात आहे आ...

Total Pageviews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!

Top Videos

megagrid/recent
Your Responsive Ads code (Google Ads)
Your Responsive Ads code (Google Ads)

Trending Weekly

4/sgrid/recent

Most Recent

4/sidebar/recent

Social Plugin

  • facebook
  • twitter
  • whatsapp
  • reddit
  • pinterest
  • vk
  • instagram
  • youtube

प्रफुल्ल फडके याचा ब्लॉग

बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. संपादक - +919152448055

Top Stories

megagrid/recent
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Term & Conditions
  • Disclaimer
  • DMCA
  • Sitemap

Follow Us

Contact form

Processors Info

Processors Info

राजकारण

राजकारण

क्राईम

क्राईम

देश-विदेश

देश-विदेश

संपादकीय

संपादकीय

मनोरंजन

मनोरंजन

धाराशिव

धाराशिव

महाराष्ट्र

महाराष्ट्र

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

Footer Copyright

Design by - Dainik Trishakti | Distributed by Orbit Digital
prafulla phadke mhantat

About Us

प्रफुल्ल फडके हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारे संवेदनशील लेखक व ब्लॉग लेखक आहेत. त्यांच्या लेखणीतून समाजातील घडामोडी, लोकहिताचे प्रश्न, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक विचार वाचकांपर्यंत पोहोचतात.
  • मुख्य पान
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • आणखी
  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy

What's New

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

ताज्या बातम्या

 कठीण समय येता कोण कामास येतो?

कठीण समय येता कोण कामास येतो?

 कोल्हटकरी नाटके

कोल्हटकरी नाटके

 विच्छा माझी पुरी करा

विच्छा माझी पुरी करा

 ‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

‘आत्मनिवेदन’ भक्तीचे पदर

महंताचे आचरण कसे असावे

महंताचे आचरण कसे असावे

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

शुद्ध ज्ञान निरूपण या समासात उपनिषदातील महावाक्यांचा अभ्यास

गुरू आणि सदगुरू यातील फरक

गुरू आणि सदगुरू यातील फरक

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

श्रवणभक्ती’ व ‘कीर्तनभक्ती’ या एकमेकांवर आधारित

                                     संसारातील टोमणे

संसारातील टोमणे

‘पादसेवन भक्ती’

‘पादसेवन भक्ती’

Popular Posts

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • कोल्हटकरी नाटके
    मराठी रंगभूमीच्या इतिहासात नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या नावाचे एक सुवर्णपान आहे. महाराष्ट्राचा छोटा गडकरी म्हणून ओळखल्या जाणाºया बाळ कोल्हटक...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...

Labels

  • uttam nirnay
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • संपादकीय

Blog Archive

  • ►  2026 (342)
    • ►  July (22)
    • ►  June (57)
    • ►  May (60)
    • ►  April (42)
    • ►  March (52)
    • ►  February (51)
    • ►  January (58)
  • ►  2025 (541)
    • ►  December (56)
    • ►  November (52)
    • ►  October (54)
    • ►  September (1)
    • ►  August (46)
    • ►  July (62)
    • ►  June (59)
    • ►  May (49)
    • ►  April (43)
    • ►  March (36)
    • ►  February (38)
    • ►  January (45)
  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2022 (227)
    • ►  May (15)
    • ►  April (52)
    • ►  March (48)
    • ►  February (54)
    • ►  January (58)
  • ►  2021 (510)
    • ►  October (8)
    • ►  September (38)
    • ►  August (49)
    • ►  July (62)
    • ►  June (61)
    • ►  May (56)
    • ►  April (60)
    • ►  March (60)
    • ►  February (56)
    • ►  January (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  December (59)
    • ►  November (15)
    • ►  October (16)
    • ►  September (53)
    • ►  August (35)
    • ▼  July (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  June (48)
    • ►  May (51)
    • ►  March (24)
    • ►  February (34)
    • ►  January (33)
  • ►  2019 (109)
    • ►  December (45)
    • ►  November (11)
    • ►  April (2)
    • ►  March (9)
    • ►  February (17)
    • ►  January (25)
  • ►  2018 (387)
    • ►  December (26)
    • ►  November (30)
    • ►  October (26)
    • ►  September (20)
    • ►  August (28)
    • ►  July (32)
    • ►  June (35)
    • ►  May (39)
    • ►  April (35)
    • ►  March (38)
    • ►  February (53)
    • ►  January (25)
  • ►  2017 (31)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  August (11)
    • ►  July (2)
    • ►  May (1)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
    • ►  February (10)
  • ►  2016 (232)
    • ►  September (1)
    • ►  August (25)
    • ►  July (19)
    • ►  June (26)
    • ►  May (29)
    • ►  April (30)
    • ►  March (31)
    • ►  February (29)
    • ►  January (42)
  • ►  2015 (165)
    • ►  December (23)
    • ►  November (22)
    • ►  September (2)
    • ►  August (36)
    • ►  July (33)
    • ►  June (12)
    • ►  February (13)
    • ►  January (24)
  • ►  2014 (206)
    • ►  December (28)
    • ►  November (25)
    • ►  October (9)
    • ►  September (4)
    • ►  July (12)
    • ►  June (23)
    • ►  May (20)
    • ►  April (85)
  • ►  2013 (1)
    • ►  June (1)
  • ►  2011 (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
  • ►  2010 (4)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  March (2)

फॉलोअर

Powered by Blogger.