Thursday, April 10, 2014

काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदान करा

काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदान करा
  • राज्यातल्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपले. आता पुढचा टप्पा 17 तारखेला आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून या परिवर्तनाच्या लढयात उतरले पाहिजे. ही निवडणूक म्हणजे नवा स्वातंत्र्य लढा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि तो काँग्रेसच्या ताब्यात गेला. आगीतून फुफाट्यात म्हणतात तशीच ही अवस्था होती. आता काँग्रेसच्या ताब्यातून देश सोडविण्यासाठी मतदारांनी मतदान केले पाहिजे. काँग्रेस विरोधी मतदान करून परिवर्तन घडवायचे आहे.
  • मतदानाला जाताना प्रत्येकाने मनात एकच विचार करायचा आहे, की गेल्या दहा वर्षात आभाळ भेदून गेलेल्या महागाईला विरोध करण्यासाठी हे मतदान करत आहोत. रास्त किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी हे मतदान आपण करणार आहोत. माझे एक मत काँग्रेसने केलेल्या महागाईच्या विरोधात असणार आहे. काँग्रेसने या खेपेलाही 2009 च्या जाहीरनाम्या प्रमाणे 100 दिवसात महागाई कमी करू असे फसवे आश्‍वासन दिलेले आहे. पण शंभर दिवसांची वाट पाहण्याची गरज नाही. एका दिवसात आपण महागाई कमी करू शकू. तो दिवस म्हणजे मतदानाचा. काँग्रेस विरोधी मतदान करून महागाईचे समर्थन करणार्‍या, किंमती स्थीर ठेवण्यात अपयश आलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर करायचे आहे.
  • आज देशात महिला सुरक्षित नाहीत. महिलांचे संरक्षण करण्यात काँग्रेसला अपयश आलेले आहे. याचे कारण महिलांचे संरक्षण केले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे ही काँग्रेसची इच्छाच नाही. महिलांची बेअब्रू करण्याचीच काँग्रेसची प्रथा राहिलेली आहे. लातूरमध्ये काँग्रेसच्या युवक अध्यक्षाने आपल्याच महिला कार्यकर्तीची हत्या केली. जो प्रकार दिल्लीत होता तोच प्रकार आता गल्लीतही होताना दिसत आहे. एका बहुजन समाजातल्या युवा कार्यकर्तीला गायब करून तिची हत्या करण्याचे दुष्कर्म काँग्रेसचा कार्यकर्ता करतो. ही काँग्रेसमध्ये सर्वत्र रूजलेली प्रवृत्ती आहे. महिलांकडे पाहण्याची काँग्रेस नेत्यांची दृष्टी ही अत्यंत वाईट असते. म्हणूनच महिलांनी आत्मसन्मानासाठी काँग्रेस विरोधी मतदान करायचे आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशभर बलात्कारांचे, महिलांवरील हल्ल्यांचे, त्यांच्या हत्यांचे प्रमाण वाढलेेले आहे. निर्भयासारख्या सामुहीक बलात्काराचे प्रकरण काँग्रेसच्या राजवटीत घडलेले आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून गेल्यावर्षी दिल्लीत निवडणुका होण्याआधीपासुन आम आदमी पक्षाने निर्भयाला न्याय अशा नावाची पोस्टर्स संपूर्ण दिल्लीत लावली. महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा केजरीवाल यांनी उचलून धरला. त्यामुळे निर्भया घटनेने संतापलेली तरूणाई मतदानाला उतरली. काँग्रेसची सत्ता खेचून घेण्यासाठी मतदान केले. निर्भयाचा मुद्दा केजरीवाल यांनी उचलल्यामुळे मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला. पण त्याच केजरीवाल यांनी सामान्य माणसांचा विश्‍वासघात केला. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. काँग्रेसचा पाठींबा नाकारण्याची धमक केजरीवाल यांच्याकडे नव्हती. पुढे 49 दिवसात  त्यांनी राजीनामा दिला. देशाचे 49 दिवस वाया घालवले. सामान्य जनतेची फसवणूक करण्याचे काम केजरीवाल यांनी केले. त्यामुळे आम आदमीची संतप्त प्रतिक्रीया बाहेर पडली. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला बाहेर पडल्यावर एका रिक्षाचालकाने केजरीवाल यांना थोबाडीत मारली. वाईट वागणार्‍या राज्यकर्त्यांना असे थोबाडले पाहिजे ही सामान्य माणसाची प्रतिक्रीया होती. ज्या विश्‍वासाने दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीकडे सोपवली होती त्या विश्‍वासाचा केलेला घात होता. त्यामुळे सामान्य     माणसाची उमटलेली ती प्रतिक्रीया होती. पण प्रत्येकाला काँग्रेसला किंवा त्यांच्या समर्थकांना थोबडून काढणे शक्य होणार नाही. अगदी इच्छा असली तरी असल्या नेत्यांना थोबाडणे शक्य होणार नाही. तर जनतेचा विश्‍वासघात करणार्‍या नेत्यांना थोबाडण्यासाठी एकच बटण दाबा. मतदान करा आणि अशा काँग्रेस, आम आदमी पार्टी नावाची गुप्त काँग्रेस यांना हद्दपार करा. केजरीवाल यांना थप्पड खाल्ल्यानंतर थोडा पश्‍चाताप झाला. त्यामुळे ते राजघाटावर चेहरा पाडून बसले. आपण जनतेचा विश्‍वासघात करत आहोत याची त्यांना जाणिव झाली. त्यामुळे त्यांनी पुढचे नाटक केले ते त्या रिक्षाचालकाला घरी जावून भेटण्याचे. पण केजरीवाल यांनी  दिल्लीच्या मतदारांची माफी मागायला पाहिजे होती. राज्य चालवण्यास आम्ही नालायक आहोत, केवळ काँग्रेसच्या पैशावर भाजपला दिल्लीच्या सत्तेपासून रोखण्यासाठी हे केले होते हे त्यांनी जाहीर कबूल करण्याची ही वेळ होती. पण सुंभ जळला तरी पिळ सुटत नाही त्याप्रमाणे काँग्रेसला वाचवण्यासाठी केजरीवाल यांनी गांधीगिरी करण्याचा आव आणला. अशा ढोंगी पुढार्‍यांना नाकारण्यासाठी मतदान करणे हेच आपले कर्तव्य आहे.
  • तरूणांना दारूच्या, डान्सबारच्या नादी लावून अवैध धंदे करणार्‍यांना प्रोत्साहन देण्याचे काम काँग्रेस करते आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांनी डान्सबार विरोधात लढा दिला होता. महाराष्ट्रात  डान्सबारवर बंदी आणली होती. आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रूंनी ते विरघळून गेले होते. त्यांनी आपल्या विवेक बुद्धीप्रमाणे महिलांचा मोर्चा काढला, विधानसभेत आवाज उठवला. गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर दबाव आणून डान्सबारवर बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. पण या नराधम काँग्रेसने न्यायालयात जावून ही बंदी उठवली आणि डान्सबार  सुरू केले. मुलांना लहान वयातच दारू पिण्याचे ट्रेनिंग मिळावे यासाठी गल्ली बोळातील चिल्लर काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले. राम ठाकूर-प्रशांत ठाकूर यांनी तर हरामखोरीचा कहर केला. डान्सबार, दारूचे अड्डे चालवणार्‍या संतोष शेट्टीला शिक्षण सभापती केले. आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे आमदार विवेक पाटील महिलांचे संसार उद्धवस्त होवू नयेत म्हणून डान्सबारवर बंदी आणतात तर राम ठाकूर-प्रशांत ठाकूर यांच्यासारखे वाईट विचारांचे लोक शिक्षण सभापतीपदावर बार मालकाला बसवतात. हा फरक मतदारांनी लक्षात घेतला पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार असल्यामुळे, राज्यात काँग्रेस सरकार असल्यामुळे ही डान्सबारवर बंदी घालता आली नाही. त्यामुळे दररोज असंख्य संसार दारूपायी उजाड होताना दिसत आहेत. कायदे करण्याचे काम विधीमंडळाचे, सभागृहाचे आहे.
  •  तोच कायदा न्यायालयात येतो. आपली बाजू सरकारने भककमपणे मांडली असती तर त्या कायद्यात पळवाट निघाली नसती. डान्सबारवरची  बंदी कायम राहीली असती. पण निष्क्रिय सरकार, निष्क्रिय नेते केंद्रात असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दारूमुळे अकाली मरण, अपघात आणि पैशाचा नाश या प्रकारातून तरूणांना वाचवायचे असेल, आया बहिणींचे उजाडणारे संसार वाचवायचे असतील तर सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. आमदार विवेक पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणभाऊ जगताप यांना लोकसभेत पाठवले पाहिजे. सक्षम कायदे करून महिलांना न्याय देण्यासाठी असे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. प्रत्येकाने मतदानाला जाताना हाच विचार करायचा आहे की माझे मतदान हे डान्सबारला विरोध करण्यासाठी आहे. इटालियन महिलेच्या तालावर नाचणार्‍या देशाला वाचवण्यासाठी मी हे मतदान करत आहे. काँग्रेसने निवडणुकीत तिकीटे सगळ्या भ्रष्ट लोकांना दिलेली आहेत. भ्रष्टाचाराचा आदर्श घालून दिलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने तिकीट दिलेले आहे. काय चालले आहे हे?
  • बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला सहा सहा महिने रजा मिळते आणि तुरूंगात न राहता तो घरी येतो. काय अर्थ आहे अशा शिक्षेला? अशा गुन्हेगारांना पाठीशी        घालणार्‍या काँग्रेसने संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांना तिकीट दिले आहे. आपल्या पदाचा वापर प्रिया दत्त फक्त संजय दत्तला वाचवण्यासाठी करणार. अशा लोकांना आपण निवडून देणार आहोत? त्यांना हटवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदान करायचे आहे. मतदान करताना बाहेर पडताना  या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींना आपण विरोध करण्यासाठी मतदान करणार आहोत हा विचार करून बाहेर पडायचे आहे. म्हणजे योग्य बटण दाबले जाईल.

Wednesday, April 9, 2014

  • गांधीशाहीचा अस्त आता दूर नाही

  • 2014 ची लोकसभा निवडणूक ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. कारण या निवडणुकीत प्रत्येकजण सर्वशकतीनीशी लढण्यासाठी उतरला आहे. या निवडणुकीत उत्साह आणि उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे. पहिल्यांदाच सर्वपातळीवर मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. ही खरी परिवर्तनाची लाट म्हणावी लागेल.
  • वर्षानुवर्षे, दशकानुदशके निवडणुका होत होत्या. पण मतदानाची टककेवारी दिवसेंदिवस कमी होत चालली होती. प्रत्येक निवडणुकीत अमूक इतके हजार मतदार वाढले. तमूक इतके टकके मतदार वाढले. अशा बातमया येत होत्या. पण ज्या प्रमाणात मतदारांची संख्या वाढत होती, मतदार याद्या वाढत होत्या त्याप्रमाणात मतदान करण्यासाठी मतदार बाहेर पडत नव्हते. त्यामुळे मतदानाचा टकका घसरत चालला होता. लोकसभा निवडणुकीला 35 ते 52 च्या दरमयान मतदान झालेले दिसत होते. हे असे का होत होते?
  • तर मतदान करणारी मंडळी तीच ती होती. मतदानाची टक्केवारी घसरायची. पण मतदान करणारे लोक पूर्वीचे जे होते तेच करत होते. नवमतदार मतदान करत नव्हता. नवमतदारांना मतदानापासून रोखले जात होते. त्यांची नावे यादीत असूनही त्याची जाणिव करून दिली जात नव्हती. त्यामुळे तीच माणसे, नेहमीचीच माणसे मतदान करत होती.
  • महाराष्ट्रातला मोठा मतदारसंघ म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नाव घेतले जाते. फार पूर्वीपासून या मतदारसंघात सर्वात जास्त मतदार होते. 2004 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 48 टक्केच्या आसपास मतदान झाले होते. 2008 ला या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली तेव्हा 37 टक्केच्या आसपास मतदान झाले होते. या तीन वर्षात जवळपास 15 टक्केंनी मतदार वाढले होते. 2007 ला झालेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने नवमतदार नोंदवले गेले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का पुन्हा कमी झाला. 48 टक्केच्या हिशोबाने 2004 मध्ये साधारण 8 लाख मतदारांनी मतदान केले होते. मतदार वाढल्यावरही पोटनिवडणुकीत 2008 मध्ये 8 लाखाच्या आसपासच मतदान झाले होते. त्यामुळे चित्र असे होते की मतदारयादीतील नावे वाढत आहेत. पण मतदान करणारे ठराविक लोकच आहेत. त्यामुळे तेच लोक पुन्हा पुन्हा मतदान करतात आणि तेच लोक पुन्हा पुन्हा निवडून येतात.
  • म्हणूनच ही निवडणूक अत्यंत परिवर्तनाची अशी आहे. प्रस्थापित अशा काँग्रेसने नवमतदारांना मतदानापासून रोखण्याचे विविध फंड हाताळले. त्यावर निर्बंध आल्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस कशाप्रकारे मतदारयादीत फेरफार करते, मतदानापासून मतदारांना अंधारात ठेवते याचे उदाहरण आपण खारघरमध्ये पाहिले आहे. खारघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पनवेल काँग्रेसने बरीच हेराफेरी केली होती त्यामुळे जागृत नागरिकांनी आक्षेप घेतले. त्यामुळे महिनाभर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. मतदारांना फसवण्याचे काँग्रेसचे षडयंत्र धुळीस मिळाले. त्यामुळे खारघरमधून काँग्रेस हद्दपार झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत काहीतरी घोटाळा करण्याच्या हेतुने राम ठाकूर यांनी कट केला. तहसिलदार कार्यालयातील काही कर्मचार्‍यांना हाताशी धरून मतदारओळखपत्र वाटपाचे काम आपल्या शाळेकडे घेतले. इथल्या शिक्षकांना ऐन परिक्षांच्या काळात हे काम करायला लावले. हे करताना यादीतील अनेकांची नावे गायब केली. आपल्या गुंडांना या शाळेत बसवले आणि अनेकांची ओळखपत्रे आणि नावे गायब केली. जी नावे इंटरनेटवर आहेत, तहसिलदार कार्यालयातील यादीत आहेत ती नावे राम ठाकूर यांच्या यादीतून गायब होतात. मतदारांना तुमचे नावच यादीत नाही असे सांगून मतदानापासून रोखण्याचे कारस्थान काँग्रेसमध्ये सुरू आहे. साधारण जी मते आपल्याला मिळणार नाहीत असे वाटते ती नावे गायब करायची, त्यांची ओळखपत्रे गायब करायची हे प्रकार सुरू केले आहेत. या प्रकारांना आळा बसल्याशिवाय कसे परिवर्तन घडणार? कशी मतदानाची टक्केवारी वाढणार? सामान्य माणसाने मतदान केंद्रावर जावून भांडत बसायचे का? माझे नाव यादीत आहे, निवडणूक आयोगाच्या यादीत आहे, पण मतदानकेंद्रावरच्या यादीत नाही म्हणून त्याने मतदानापासून वंचित रहायचे का? राम ठाकूर यांच्यासारखे दुष्ट लोक मतदान यादीत फेरफार करत असताना सामान्य माणसांनी गप्प बसायचे का? पवन चांडक यांच्यासारख्या तहसिलदारपदावर असलेल्या अधिकार्‍यांनी कसलीही शहानिशा न करता राम ठाकूर यांचे महणणे बरोबर आहे असे जाहीर वकतव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे. मतदानाची टककेवारी वाढवण्यासाठी असे गैरप्रकार रोखले गेले पाहिजेत. एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रशासनापुढे आव्हान असताना पवन चांडक यांच्यासारखे अधिकारी राम ठाकूरांसारख्या गैर प्रवृत्तीला पाठीशी घालत असतील, गुंडशाहीला पाठीशी घालत असतील तर ते लोकशाहीला मारक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
  • पनवेल काँग्रेसची गुंडगिरी रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असले तरी देश पातळीवर प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. बहुतेक सरकारी कार्यालयातून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना, आस्थापना मतदान करा असा प्रसार आणि प्रचार करताना दिसत आहेत. भित्तीपत्रके, फलक लावून, प्रचारफेरी काढून मतदान करण्याबाबत जनजागृती करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणार आहे हे निश्‍चित. जी टक्केवारी 50 च्या आसपास घुटमळत होती तीचे प्रमाण 60 ते 65 च्या पुढे नेले म्हणजे परिवर्तन निश्‍चित आहे.
  • आज सत्ताधार्‍यांचा त्रास हा प्रत्येक घटकाला होत आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ती काँग्रेस एक देशविघातक शक्ती आहे याची जाणिव सर्व स्तरातून होताना दिसत आहे. त्यामळे अगदी डॉक्टर आणि हॉटेलचालकही यासाठी आव्हान करत आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये मतदान केल्याची खूण दाखवा, बोटावरची शाई दाखवा आणि हॉटेलच्या बिलात 25 टक्के सूट मिळवा असे आवाहन केले आहे. तर अनेक हॉस्पिटलमधून तपासणी फी मध्ये सवलत देण्याचे जाहीर केले आहे. मतदारांमध्ये वेगवेगळ्या पातळींवरून होणारे हे प्रयत्न अत्यंत स्वागतार्ह आहेत. फक्त मतदार मतदान करण्यासाठी मतदानकेंद्रावर आला आणि राम ठाकूर यांच्यासारख्या गैरप्रवृत्तींनी त्यांना तुमचे नावच यादीत नाही सांगून रोखले तर प्रशासन काय बंदोबस्त करणार आहे हा खरा प्रश्‍न आहे. आज या देशात परिवर्तनाची लाट आहे. पण ती लाट थोपविण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब करणे हेच काँग्रेसकडून होणार आहे.
  • दारू आणि पैशाचा, बळाचा वापर करून मतदारांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेसमधून होत आहे. गेल्या चार दिवसात किती रककम पोलिसांनी पकडली आहे? किती दारूचा साठा पकडला गेला आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. नागपूरात काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांची मतदारांना वाटण्यासाठी घेवून चाललेल्या पैशाची गाडी पकडली. कोट्यवधी रूपयांच्या नोटा या गाडीत सापडल्या. या गाडीची चावी देण्यास मुत्तेमवार तयार नव्हते त्यामुळे निवडणूक आयोगाने ही गाडीच ताब्यात घेतली होती. असाच प्रकार पंढरपूर, सांगली अनेक ठिकाणी घडला. दारूच्या बाटल्या आणि पैशाचा ढीग याचा वापर करून, बळाच्या वापराने निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत. पण यावर मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडणे हाच उपाय आहे.
  • या निवडणुका सत्ताधारी, विरोधक यांच्याबरोबरच प्रसारमाध्यमे, सोशल मिडीया, प्रशासन यांच्यातही होत आहेत. सर्व पातळीवरून होणार्‍या या निवडणुकीत नवमतदारांनी मतदानाला निर्भयपणे बाहेर पडण महत्त्वाचे आहे. मतदानाचा टक्का वाढवून या देशात खर्‍या लोकशाहीची स्थापना होणार आहे. काँग्रेसच्या गांधीशाहीचा अस्त आता दूर नाही.

दादांनी करंगळी दाखवली तर, साहेबांनी लोटा घेतला...

दादांनी करंगळी दाखवली तर,

 साहेबांनी लोटा घेतला...

  • युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. निवडणुका हे युद्धच. त्यामुळे एरव्ही आपल्या पक्षकार्यकर्त्यांचे कान उपटणारे शरद पवार यातून वाचले आहेत. नाहीतर त्यांनी हातात लोटा घेतला असताना तशी टिका त्यांच्यावर झाली असती.
  • धरणात पाणी कुठून आणायचं हे सांगताना करंगळी वर करून दाखवणारे अजित पवार यांनी आपल्या भाषणातून आपल्या असमर्थतेची कबुलीच दिली होती. कारण धरणात करंगळी वर करून पाणी भरायचं असं महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं असतं तरी धरण भरणं सोडा, पण जमिन ओलीही झाली नसती. धरण मोठं आहे म्हणून नाही तर राष्ट्रवादी खूप छोटा आहे म्हणून. मात्र धरण भरणाची, पाणी अडवण्याची आणि जनतेला पाणी पाजण्याची ताकद गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात निश्‍चित आहे.
  • साहजिकच सगळे लोक देशभरात नमो नमो करताना दिसतात. या मोदींचे कौतुक शरद पवारांना सहन झाले नाही आणि त्यांनी आपली प्रचाराची पाळी घसरवली. आता शरद पवारांकडून हे वक्तव्य अपेक्षित नाहीच. पण तरीही युद्धात आणि निवडणुकीत सगळं क्षम्य असतं म्हणून सोडून द्यावे लागेल. अन्यथा अन्य कोणी असे वक्तव्य केले असते तर शरद पवारांनी त्याच कान उपटले असते. पण पवारांचे कान कोण उपटणार?
  • मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सगळेजण  मोदी मोदी करतात त्यावर शरद पवारांनी वक्तव्य केले की, सकाळ दुपार संध्याकाळ लोक तेच नाव घेतील. म्हणजे सकाळी उठल्यावर जाताना( इथे हातात लोटा धरून) खूण करून शरद पवारांनी हशा मिळवायचा प्रयत्न केला. पण लोटापरेडची आठवण मोदींमुळे शरद पवारांना व्हावी हे त्यांच्यातील हरल्याचे लक्षण आहे. 
  • काही केल्या काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार नाही. राष्ट्रवादीला फारसे यश मिळण्याची चिन्ह नाहीत. 21 जागा लढविणारी राष्ट्रवादी आणि 400 जागा लढविणारा भाजप. यांच्यात तुलनाच होवू शकत नाही. त्यामुळे मानसिक पराभवाने आलेल्या नैराश्यातून पवारांकडून मोदींवर टिका केली आहे. पण याच मोदींचा लोटा उचलून नेण्याची वेळ भविष्यात पवारांवर येवू नये म्हणजे मिळवली म्हणावे लागेल.
  •   नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जे आपत्ती निवारण महामंडळ उभे केले होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठ्या मनाने या मंडळाचे अध्यक्षपद शरद पवारांना दिले होते. याचा फायदा शरद पवारांना होईल असा कधी विचार वाजपेयींनी केलेला नव्हता. पण आज गुजरात भूकंपानंतर शरद पवारांनी मोदींना मदत दिली म्हणून सोशल मिडीयावरून अपप्रचार केला जात आहे. ज्या मंडळाचे अध्यक्षपद शरद पवारांना भाजपमुळे मिळाले त्याचा कसला टेंभा मिरवता?
  • आता या निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. त्यांना कमी पडणार्‍या संख्याबळासाठी राष्ट्रवादी पुढे येणार यात शंकाच नाही. मित्र पक्ष जोडण्याची भूमिकाही शरद पवारच करणार आहेत. याची भिती काँग्रेस बोलून दाखवत आहे. त्यामुळे या बदल्यात आपल्या लोट्यात पवारांना मोदींचेच पाणी वाहावे लागेल.

Tuesday, April 8, 2014

राहुल गांधींचे देशविघातक विचार

राहुल गांधींचे देशविघातक विचार

  • काँग्रेसचे भंपक युवराज देशात गुजरात मॉडेल नव्हे तर बिहार मॉडेलची गरज असल्याचे वक्तव्य करत आहेत. यावरून काँग्रेसची प्रवृत्ती किती गुंडगिरीची, भ्रष्टाचाराची आहे याचीच ही कबूली आहे. काँग्रेसचा खरा चेहराच उघड करण्याचे काम राहुल गांधींनी केलेले आहे. यावरूनच राहुल गांधींच्या अकलेचे दर्शन होताना दिसते. काँग्रेसचे सगळे नेते आपण केलेली पापे झाकायचा प्रयत्न करत आहेत तर हे युवराज काँग्रेस नेत्यांनाच नागवण्याचा आणि त्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे यातून दिसत आहे.
  • या देशात बिहार मॉडेलची अपेक्षा करणे म्हणजे देशात यादवी माजवणे, अंदाधुंदी माजवणे, भ्रष्टाचार माजवण्याची अपेक्षा आहे. ज्या गुजरातला नरेंद्र मोदींनी उंचीवर नेऊन ठेवले, ज्या बिहारला नितिशकुमार यांनी एका विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले त्या दोनही सक्षम अशा मोदी आणि नितिशकुमार यांच्यावर टिका करून राहुल गांधींनी आपण किती देशद्रोही आहोत, दहशतवाद्यांचे पाठिराखे आहोत हेच सिद्ध केलेले आहे. त्यामुळे या देशातून काँग्रेसला हटवले नाही तर देशात इथून पुढे अनागोंदी, अनाचार माजेल हे निश्‍चित झालेले आहे.
  • या देशातील 1980 नंतरचा नरक अशी ज्याची अवस्था आहे ते राज्य म्हणजे बिहार. या बिहारमध्ये काँग्रेसच्या राजवटीत, लालूप्रसाद यादव यांच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था कधीही अस्तित्वात नव्हता. दिवसाढवळ्या खून पडायचे. चोरी,लूटमार, भ्रष्टाचार याशिवाय या बिहारमध्ये काहीच नव्हते. त्यामुळे बिहारमधील तरूण देशात सर्वत्र रोजगारासाठी बाहेर पडताना दिसत होता. बिहारमधून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्राच्या दिशेने, मुंबईच्या दिशेने येत होते. आजही येत आहेत. पण गेल्या काही वर्षात म्हणजे भाजप आणि संयुक्त जनता दलाची सत्ता आल्यापासून येथून लोंढे बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. दुर्दैवाने नितिशकुमार यांनी भाजपची साथ सोडून आत्मघात करून घेतला. पण चांगल्या लोकांना नावे ठेवून हे महामूर्ख राहुल गांधी मोदी-नितिशकुमारांचे राज्य नको, त्यांच्यासारखा विकास नको तर लालू यादव सारखा भ्रष्टाचार या देशात असला पाहिजे, तोच पॅटर्न असला पाहिजे असे म्हणतात, यासारखे यादेशाचे दुर्दैव ते काय? आज काँग्रेसला कोणी जवळ करत नसताना त्यांना लालू यादव यांचाच आधार आहे. भ्रष्टाचारामुळे तुरुंगवास भोगत असलेले आणि निवडणुकीपुरते बाहेर आलेले लालूप्रसाद यादव हे राहुल गांधींचे आदर्श असतील तर या राहुल गांधींचे पार्सल इथल्या जनतेने इटलीत फेकले पाहिजे. या देशात कायद्याचे राज्य येण्याची गरज असताना राहुल गांधी अराजकता आणण्याचे बोलत असतील तर या राहुल गांधींचा सर्वस्तरावर निषेध व्हायला पाहिजे.
  • या राहुल गांधींना बिहारचे प्रेम नेहमीच वाटत आलेले आहे. अर्थात  बिहारमधून त्यांना तेवढेच हद्दपार केले जाते हा भाग वेगळा. बिहार विधानसभा निवडणुकीत हे महाशय बरळले होते की, महाराष्ट्राचा विकास, मुंबईचा विकास हा बिहारी लोकांनी केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात पन्नास वर्ष काँग्रेसचे नेते राज्य करत आहेत त्यांना काहीच अक्कल नव्हती असे म्हणून महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना निष्क्रिय ठरविण्याचे काम राहुल गांधींनी केले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार , विलासराव देशमख यांच्यासारखे दिग्गज नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या राज्यात होवून गेले. त्यांना नालायक ठरविण्याचे काम या राहुल गांधींनी केलेले आहे. देशभरात बिहार पॅटर्न आणण्यासाठीच त्यांनी आदर्श भ्रष्टाचारात आकंठ  बुडालेल्या अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण मराठी जनतेने काही झाले तरी महाराष्ट्राचा बिहार करण्याचे राहुल गांधींचे स्वप्न पूर्ण होवू देता कामा नये. राहुल गांधी ही एक वाईट प्रवृत्ती या देशात संचारते आहे. या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला पाहिजे. कारण या देशात बिहार पॅटर्न राबवण्याचे स्वप्न ते पहात आहेत. या देशात दहशत निर्माण करण्याचा सल्ला ते देत आहेत. हे देशाचे दृष्टीने अत्यंत घातक आहे.
  • उत्तर प्रदेशातील दहशतवादी की जो नरेंद्र मोदींची खांडोळी करण्याची भाषा करतो, त्याला तुरुंगात जावे लागल्यामुळे राहुल गांधींचे डोके फिरले आहे. आता बिहारमध्ये कोणी गुंड, दहशतवादी मिळतात का ते पाहायला हे महाशय तिथे जातात आणि देशात बिहार पॅटर्नची गरज असल्याचे  वक्तव्य करतात. पंतप्रधानपदाचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना पुढे केलेले आहे. अशा नेत्यांपासून देशाला किती धोका आहे हे यातून दिसून येते.
  • आज बिहारी गेली अनेक दशके स्थलांतर करत आहेत. त्यांना कोणताही रोजगार नसल्यामुळे महाराष्ट्रात येवून ते जगत आहेत. इथे ते मोठे होत आहेत. त्यांचे राहणीमान सुधारत आहे. इथून पैसा कमवून जातात आणि गावाकडे पाठवतात. कारण त्यांना त्यांच्या गावात, राज्यात कुठेही रोजगार मिळत नाही. अशी परिस्थिती देशभर निर्माण झाली पाहिजे हे राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे इथल्या तरूणांना देशोधडीला लावण्याचे स्वप्न आहे. इथल्या तरूणांनी राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध करून त्यांना साफ नाकारले पाहिजे. या देशात बिहारप्रमाणे बेरोजगारी वाढली पाहिजे, देशातील तरूण रोजगारासाठी वणवण हिंडले पाहिजेत. त्यांची कुटुंबापासून ताटातूट करण्याची इच्छा राहुल गांधींची आहे. माणसाला दु:खी करण्याचा हा बिहार फॉर्म्युला इथला मतदार कदापिही या देशात येवू देणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
  • बिहारमध्ये कोणता आदर्श राहुल गांधींना दिसला? महाराष्ट्रात बिहारी लोकांनी काय केले? राहुल गांधी आणि त्यांचे लुच्चे,लाचार, लोचट हुजरे याचे उत्तर देतील काय? बिहारची भ्रष्ट संस्कृती या देशात येण्यासाठीच महाराष्ट्रीतील नेत्यांना काँग्रेसने तिकीटे दिली आहेत काय? विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राचा बिहार करण्याचे स्वप्न राहुल गांधी यांचे असणार आहे काय? या सगळ्याची उत्तरे मिळाली पाहिजेत.
  • बिहारमध्ये रस्ते नाहीत, कसल्या सुविधा नाहीत. रोजगार नाही, कायदा सुव्यवस्था नाही. एखाद्याची गाडी पार्क केलेली असेल तर ती जागेवर राहील याची खात्री नसते. लालूप्रसाद यादव यांनी आपल्या प्रचारासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी वर्‍हाडींना नेण्यासाठी शोरूममधल्या गाड्या बाहेर काढल्या होत्या. ही फार मोठी दहशत होती. अशी दहशत राहुल गांधींना या देशात हवी आहे काय? यासाठीच पाकीस्तानी, तालिबानी, तमिळी दहशतवाद्यांना ते पाठिशी घालत आहेत काय? आपल्या वडिलांचा खून करणार्‍यांना फाशी होवू नये यासाठी प्रयत्न करण्यामागचा राहुल गांधी यांचा हाच हेतु आहे काय? या देशात खून पडावेत, अत्याचार व्हावेत, महिला असुरक्षित रहाव्यात यासाठीच देशात बिहार पॅटर्न राहुल गांधींना हवा आहे काय?
  • समलिंगी संबंधांचे समर्थनही राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी केले होते. सध्या देशात सर्वात जास्त समलिंगी संबंध बिहारमध्ये आहेत. हीच संस्कृती भारतात राहुल गांधीना आणायची आहे काय? त्यासाठीच राहुल गांधींनी लग्न केलेले नाही काय? याचे स्पष्टीकरण त्यांच्या नेत्यांनी दिले पाहिजे.
  • एकंदरीत राहुल गांधींचे विचार या देशाला अत्यंत घातक असे आहेत. बुथकॅप्चरींग, निवडणुकीतील हिंसाचार, दहशत ही बिहारची संस्कृती आहे. बिहारमधील राजकीय गुंडगिरीचे वातावरण अनेक हिंदी चित्रपटातून आलेले आहे. प्रकाश झा याने काढलेला गंगाजलसारखा चित्रपट, एन चंद्राचा प्रतिघात हा चित्रपट बिहारी संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्रपट आहेत. हीच संस्कृती हा या देशाचा पॅटर्न बनविण्याचे राहुल गांधींचे स्वप्न कदापिही पूर्ण होवू देता कामा नये. देशाच्या दृष्टीने ते घातक आहे. त्यासाठी राहुल गांधींनाच आता देशविघातक शक्ती म्हणून जाहीर करण्याची वेळ आलेली आहे.

‘आप’ मतलब

‘आप’ मतलब

आप-म्हणजे आम आदमी पार्टी. या पार्टीच्या स्थापनेपासूनच ही पार्टी काँग्रेसचे प्रॉडक्ट आहे असा संशय होताच. म्हणजे जेव्हा पत्रकार परिषद घेवून रॉबर्ट वढेरा याच्यावर आरोप केले आणि नंतर त्यावर मौन राखले. दुसरे दिवशी गडकरींवर आरोप केले. गडकरींनी त्याला महत्त्व दिले नाही तर तो मुद्दा सतत लावून निवडणुकीचा केला आहे. पण वढेराकडे केजरीवाल यांनी लक्ष वेधून लोकांना विसरायलाही लावले. केजरीवाल यांना मॅडम सोनियानी पद्धतशीर मॅनेज केले. तेव्हाच हे काँग्रेसचे पिल्लू आहे हे स्पष्ट झाले होते. फक्त आपण वेगळे आहोत हे भासवण्यासाठी काँग्रेसवर टिकेने सुरूवात केली. मूळ लक्ष होते ते भाजप आणि नरेंद्र मोदीच.

दिल्लीत काँग्रेसचा पाठिंबा घेवून 49 दिवस सरकार चालवणारे केजरीवाल यांचे पितळ उघडे पडले ते तेव्हाच की जेव्हा त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेतला. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात लढणारा आप, काँग्रेसच्या पाठिंब्यावर का सरकार बनवतो? 49 दिवसांनंतर सरकार सोडण्याऐवजी तेव्हाच नकार दिला असता तर विश्‍वास बसला असता. पण ते काँग्रेसचे पिलू आहे.
आता आणखी एक गोष्ट स्पष्ट करते की, आम आदमी पार्टीने म्हणजे आपने सोनिया गांधींच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही. का? आप-मतलब. पी चिदंबरम यांच्या विंरोधात उमेदवार उभा केलेला नाही, का? तर आप-मतलब. ज्या सलमान खुर्शिदने गरीबांना वाटाण्याच्या अक्षदा मारल्या त्या सलमान खुर्शिद विरोधात उमेदवार उभा केला नाही. का? आप-मतलब.
महाराष्ट्रात आदर्श घोटाळ्यातील महत्त्वाचे असलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमध्ये उमेदवार दिला नाही. देशद्रोही आणि हिंदूविरोधी भूमिका घेणारा ओवैसी याच्या विरोधात आम आदमी पार्टीचा उमेदवार नाही.
हे सगळे काँग्रेसच्या तिकिटावर लढणारे उमेदवार आहेत. त्याच्याविरोधातील मते आम आदमीकडून वळू नयेत यासाठी आम आदमीने आपला उमेदवार उभा केला नाही. हे सगळे केजरीवाल यांनी काँग्रेसला वाचविण्यासाठी केलेले काम आहे. काँग्रेस इतकाच केजरीवाल यांच आम आदमी पक्ष देशासाठी घातक आहे. कारण जो पक्ष नरेंद्र मोदींच्या विरोधात राळ उठवतो, तो काँग्रेसबद्दल गप्प बसतो. ज्याप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपकडे जाणारी मते थोपविण्यासाठी काँग्रेसने आपच्या 28 जागा निवडून आणल्या व भाजपला सत्तपासून रोखले, तोच प्रकार पुन्हा करण्यासाठी आम आदमी पार्टीने लोकसभेत केलेला आहे. दिल्ली ही रंगीत तालिम होती.
केजरीवाल यांना दिल्लीत सरकार बनवायचेच नव्हते. पण ती एक लोकसभेची ट्रायल होती. तोच प्रकार करून काँग्रेस आपल्या ऐवजी आपच्या नावाने उमेदवार उभे करत आहे. आप चा आप मतलब हा आहे. त्यामुळे देशभरात सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे की आप म्हणजे काँग्रेस आहे.

अब की बार...

सध्या देशात परिवर्तनाची लाट आहे. आत्ता नाही तर कधीच नाही अशा अवस्थेत देश येवून ठेपला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला हटवू शकणार्‍या नरेंद्र मोदींची साथ हा देश करणार नसेल तर आपल्याला कसलीही अपेक्षा ठेवता येणार नाही. कारण गेल्या सात दशकात काँग्रेसने या देशाची एवढी वाट लावली आहे की देश एका प्रगतीपथावर आणायचा असेल तर ‘अब की बार, मोदी सरकार ’असेच म्हणावे लागेल.
प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, या देशात सुरवातीपासून जेवढ्या वाईट गोष्टी झाल्या आहेत तेव्हा काँग्रेसचेच सरकार होते. अगदी या देशाचे तुकडे पडले, भारत पाकीस्तान हे दोन वेगळे देश निर्माण केले तेही काँग्रेसमुळेच. अंखड भारताचे स्वप्न संपुष्टात आणले ते या देशविघातक काँग्रेसमुळेच, हे लक्षात घेतले पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर या देशातील मुलांना इतिहासाच्या पुस्तकात शिकवले जायचे की काश्मिर हे भारताचे नंदनवन आहे. पण या स्वर्गाप्रमाणे सुंदर असलेल्या काश्मिरची वाट लावली ती या काँग्रेसने, नेहरू गांधी या घराण्यांनी. सुंदर काश्मिरला पाकव्याप्त काश्मिर करून भारताचा तुकडा पाडण्याचे काम केले ते या काँग्रेस सरकारनेच केले हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्यापासून जेवढ्या म्हणून वाईट गोष्टी, संकटे या देशावर आलेली आहेत तेव्हा तेव्हा काँग्रेसचेच सरकार होते. त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे झालेले आहे म्हणून हे सरकार आपल्याला हटवायचे आहे. त्यासाठी मनामनात घुमले पाहिजे, ‘अब की बार, मोदी सरकार.’
26/11 चा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचेच सरकार होते. हे सरळसरळ पाकीस्तानने मुंबईत घुसून केलेले युद्ध होते. काय करत होते काँग्रेस सरकार? कुठे होती सरकारची गुप्तहेर यंत्रणा? कशी घुसखोरी होवू दिली? हा प्रश्‍न प्रत्येकाने काँग्रेसला विचाराचा आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचा आहे. अशा सरकारला आम्ही निवडून देणार आहोत काय? प्रत्येकाचे अंतर्मन जागृत होईल आणि सांगेल, नाही, अब की बार मोदी सरकार. हे काँग्रेसचे गद्दार सरकार आपल्याला नकोच.
गेल्यावर्षी भारतीय सीमेत चीनी सैन्याची घुसखोरी झाली. भारतीय जमिन चीनने हडप केली. यापूर्वीही असाच प्रकार पंडित नेहरूंच्या काळात झाला होता. तरीही हे सरकार गप्प बसले. कारण हे रड्यांचे, नपुंसकांचे सरकार होते. चीनला आपल्या हद्दीत घुसून, भारतीय भूभाग बळकावू देणारे सरकार काँग्रेसचे होते. असे सरकार आम्हाला नको आहे. यासाठी आपल्याला निर्धार करायचा आहे, ‘अब की बार मोदी सरकार.’
आमचा सैनिक सीमेवर लढतो. त्यामुळे आपण देशात सुरक्षित असतो. पण त्याच सैनिकांची मुंडकी कापून पाकीस्तान नेते तेव्हा पाकीस्तानची पाठराखण करण्याचे काम काँग्रेसचे सरकार करते. हे काम पाकीस्तानने केलेले नाही तर पाकीस्तानी सैन्याच्या वेशात आलेले दहशतवादी होते अशी सारवासारव देशाचे काँग्रेसचे संरक्षणमंत्री करतात. यासारखे दुर्दैव आणखी कोणते असेल? पाकीस्तानची पाठराखण करणारे आणि देशाच्या सैन्याचे अहित चिंतणारे काँग्रेस सरकार आपल्याला नाकारायचे आहे. त्यासाठी एकच पर्याय आहे, तो महणजेे‘ अब की बार, मोदी सरकार.’
भारतीय लष्कराची चेष्टा करण्याचे काम, थट्टा करण्याचे काम काँग्रेसने सतत केलेले आहे. सैन्यासाठी लागणार्‍या बोफोर्स तोफा खरेदीतही काँग्रेसने भ्रष्टाचार केलेला होता. दलाली घेवून या देशाला लुटले आणि सैन्याची फसवणूक केली. हे करणारे लोक कोण होते? तर विद्यमान काँग्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पती राजीव गांधी. काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी. देेशाची फसवणूक करणारे सरकार होते ते काँग्रेसचे होते. म्हणून निर्धार करायचा आहे असे सरकार नको, ‘अब की बार मोदी सरकार.’
कुठे घोटाळा आणि भ्रष्टाचार केला नाही काँग्रेसने? तर असे एकही क्षेत्र सापडणार नाही. भारतीय सैन्याच्या गणवेषाचा पैसा खाण्याचे कामही काँग्रेसने केले. तिथेही भ्रष्टाचार केला. भारतीय लष्कराची छळवणूक करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. समोर शत्रू हल्ला करत असतानाही तो हल्ला परतवून लावण्याचे बळ आणि मानसिकता  सैनिकांमध्ये शिल्लक राहू नये यासाठी काँग्रेसने हरामखोरी केली. त्यांच्या पोषाखाच्या खरेदीत भ्रष्टाचार केला. असले हे बदमाश सरकार उलथवून लावायचे आहे. हा नवा स्वातंत्र्य लढा आहे. सुराज्यासाठी चाललेला हा संघर्ष आहे. या लढाईचा एकच निकाल असला पाहिजे तो म्हणजे ‘अब की बार मोदी सरकार.’
पंजाब हा लढवय्यांचा देश. पंजाब म्हटले की पंजाबचा सिंह लाला लजपतराय आठवतात. पंजाब म्हटले की शहीद भगतसिंग आठवतात. पंजाबी माणसाचे रक्तात देशाभिमान सळसळत असतो. अशा पंजाबी लोकांचे सरदारांचे हत्याकांड काँग्रेसने केले. हजारो निरपराध शीख बांधवांची कत्तल केली. अत्यंत निर्दयपणे त्यांना भोसकून, जाळून मारण्यात आले. हे करणारे लोक काँग्रेसचे होते. देशाचा तुकडा पाडण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले होते. त्या प्रयत्नाचाच एक भाग हा शीखांचे हत्याकांड होता. अशा देशात फूट पाडणार्‍या, नरसंहार करणार्‍या सरकारला देशाच्या अखंडतेसाठी बाजूला ठेवले पाहिजे. त्याजागी नवे सरकार आले पाहिजे. ते सरकार असेल ‘अब की बार मोदी सरकार.’
भारतीय सीमेवरील युद्धानंतर सीमला करार झाला. आमच्या हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देवून युद्धात विजय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या समझोत्यामध्ये भारताने मिळवलेली जमिन पाकीस्तानला परत करण्याचा अधमपणा याच काँग्रेसने केला. तेव्हा जर समझोता केला नसता आणि सैन्याने मिळवून दिलेल्या त्या विजयाची शान राखली असती तर आज पाकीस्तान भारताला दबून राहिले असते. पण काँग्रेसने साठ वर्षात आमही किती दुबळे आहोत हेच दाखवून दिले. स्वातंत्र्यानंतरचा पहिला पंतप्रधान पंडित नेहरू हा एक रडया आणि आत्ताचे मनमोहनसिंग हे एक दुबळे नेतृत्त्व. या दोन्हींच्या मध्ये जेवढे काँग्रेसचे पंतप्रधान झाले ते सगळे फदे निघाले.
इशान्य भारताचा भाग हा कायम अशांत राहिला आहे. कोणामुळे? कारण या देशात काँग्रेसचे सरकार आहे. आसाममध्ये हिंदू लोकांची सातत्याने  कत्तल होते. हा दहशतवाद निपटून काढण्यासाठी या देशाला समर्थ, बलवान अशा सरकारची गरज आहे. गेली सात दशके ज्यांनी राज्य केले ते दुबळे आणि देशघातक ठरले. म्हणूनच अब की बार, मोदी सरकार हा मंत्र जपायचा आहे. तो सिद्ध करून दाखवायचा आहे. मोदींना देशाचे पंतप्रधान करायचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. देशप्रेमापोटी या देशात काँग्रेस विरोधी लढणार्‍या छोट्या छोट्या शकतीसुद्धा अखेर नरेंद्र मोदींच्याच पाठिशी राहणार आहेत. अगदी शिवसेनेच्या विरोधात लढत असलेले राज ठाकरे यांनीही स्पष्ट केले आहे की माझे निवडून आलेले खासदार मोदींनाच  पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. त्यामुळे छोट्या ताकदींचाही विचार फार महत्त्वाचा असणार आहे. आघाडीतील आहे की युतीतील आहे असा विचार न करता उमेदवार योग्य आहे. मोदींच्या समर्थनार्थ जाणार आहे याचा विचार करून सगळ्या मोदी समर्थकांचा विचार मतदारांनी केला पाहिजे. कारण ही काँग्रेसची घाण या देशातून बाहेर काढायची आहे.
काश्मिरमधून पंडितांना देशोधडीला लावले ते काँग्रेस सरकारच्या काळातच. सीमेवर चहुबाजूंनी आक्रमण होताना शांत बसणारे आणि दहशतवाद्यांना पायघडया घालणारे सरकार हे काँग्रेसचेच. अशा सरकारला हाकलून काढण्यासाठी आता सज्ज व्हायचे आहे. महाराष्ट्र हा मर्दांचा देश आहे. महाराष्ट्रातून या काँग्रेसला इतकया जोरात पेकाटात लाथ घातली पाहिजे की ती काँग्रेस इटालीत जावून पडली पाहिजे. अगदी फूटबॉलप्रमाणे काँग्रेसला उडवायची आहे, कारण अब की बार मोदी सरकार.
राष्ट्रकूल घोटाळ्यात भ्रष्टाचार करून जगभरात भारताची बदनामी करणारे सरकार हे काँग्रेसचे आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा करणारे आणि देशाला लुटणारे सरकार हे काँग्रेसचे आहे. भारतातील दूरदर्शन हे घराघरात पोहोचलेले माध्यम. या माध्यमाचा जो लोगो होता त्यात सत्यम शिवम सुंदरम हे वाकय होते. ते काढून टाकण्याचा अधमपणा केला तो काँग्रेसनेच. सत्यमेव जयते ला विरोध करण्याचे कामही काँग्रेसनेच केले. कारण सत्य दडपून टाकण्याची निती काँग्रेसची आहे. अशा सत्य दडपून अधर्माचे राज्य आणू पाहणार्‍या काँग्रेसला हाकलून काढण्यासाठी प्रतयेकाने तयार असले पाहिजे. मोठ्या संख्येने मतदान करून अब की बार मोदी सरकार असा नारा द्यायचा आहे.

काँग्रेसरूपी रावणाचा नाश करण्याचा
निर्धार करण्याचा दिवस रामनवमी

भारतीय संस्कृतीत रामायण अत्यंत महत्त्वाचे आहे. आदर्श आणि न्याय राज्यव्यवस्थेसाठी रामायणातील रामराज्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या देशात रामराज्य यावे असे प्रत्येकाला वाटते. आजही या देशात रामराज्य यावे असे वाटण्याचे कारण आज रामराज्य नाही म्हणून तसे वाटते आहे. कारण राम हा एक विचार होता. या विचारानेच राज्य करून हे राष्ट्र बलवान होईल याचा प्रत्येकाला विश्‍वास आहे. आजचा दिवस रामनवमीचा. तो आपण साजरा करतो कारण राम पुन्हा जन्माला यावा म्हणून. आजही या देशाला रामाच्या विचारांची गरज आहे कारण, प्राण जाय पर वचन न जाय अशा विचाराने हे रघुवंशी या देशाचे रक्षण करत होते.
राम हा सगळ्या देशभक्तांनी, देशाचे हीत चिंतणार्‍या लोकांनी मिळून घडवलेला एक अविष्कार होता. तो केवळ दशरथपुत्र नव्हता. तो केवळ कौसल्येचा नव्हता. तो सर्वसमावेशक आणि सर्व जनतेचा होता. असे एकत्रित बळ त्याला देवून तो घडवला गेला होता. कारण सर्वत्र रावणाचे राज्य होते. रावणाची दहशत होती. रावण म्हणजे पौलत्स्य वधासाठी केलेली निर्मिती म्हणजे राम. तत्कालीन अशा वसिष्ठ, विश्‍वामित्र, ऋष्यशृंग, अत्री, अग्नी असे असंख्य ऋषी मुनी, दशरथ, जनक, दाक्ष असे अनेक राजे, कौसल्या, कैकयी आदी महाराण्या यांच्या संयुक्त प्रयत्नांनी राम घडवला होता. कारण रावणाची दहशत आणि ताकद एवढी मोठी होती की भारतातील कोणताही एक राजा रावणाचा बंदोबस्त करू शकत नव्हता. रावणाचा बंदोबस्त करण्यासाठी एखादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच उभी करणे आवश्यक आहे असा विचार त्यावेळी मांडण्याचे काम ऋषी मुनींनी केले. अनेक मित्रपक्ष जोडून रावणवधासाठी एक आघाडी निर्माण करण्याचे काम ऋषिमुनींनी केले होते. जसे आज या देशावर काँग्रेसचे संकट आहे, तसेच संकट तेव्हा रावणाचे होते. रावण दहातोंडी होता. आजही काँग्रेसची अशीच दहा तोंडे आहेत. महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, घोटाळेबाज, चारित्र्यहीन नेते, महिलांची सुरक्षा, व्यसनाधिनतेला प्रोत्साहन देणे, गुन्हेगारी ही काँग्रेसच्या दहा तोंडाची ओळख आहे. ही दहा तोंडे फोडून त्याचे पोट फोडून त्याला संपविणे हे फार मोठे आव्हान होते. जसे आज काँग्रेसचे एकापेक्षा एक भयानक असे चेहरे आहेत. तसेच स्वरूप तेव्हा रावणाचे होते. त्यामुळे रावणाला संपविण्यासाठी रामाकडे एकमुखाने नेतृत्त्व दिले गेले. ज्यांनी रामाच्या नेतृत्त्वाला विरोध केला असे यामध्ये संपुष्टात आले. आज ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींकडे काँग्रेस संपविण्यासाठी नेतृत्त्व दिले गेले आहे तसेच तेव्हा रामाकडे दिले गेले होते. म्हणून राम विचार हा रामनवमीच्या दिवशी समजून घेणे आवश्यक आहे.
रामापूर्वीही अनेक शकती रावणावर मात करू शकतील अशा होत्या. पण रावणाने कौशल्याने त्यांना आपलेसे केले. रावणाला मारू शकेल असा एक राजा या देशात होता. तो म्हणजे सहस्त्रार्जून. या सहस्त्रार्जूनाने रावणाला पकडून आणून बंदी केला होता. परंतु रावणाचे वडील पुलत्स्य  हे सहस्त्रार्जूनाचे पुरोहीत होते. त्यांनी भिक्षा महणून रावणाला मागितले. दिलेले दान कोणताही क्षत्रिय परत घेवू शकत नाही. त्यामुळे सहस्त्रार्जूनापासून रावणाला अभय मिळाले.
दुसरा राजा होता तो वनपाल. वननरांचा महणजे वानरांचा राजा वाली. हा महाशकतीमान होता. त्याने रावणाला पकडून आणून आपला मुलगा अंगद याच्या पाळण्यावर बाहुला महणून खेळण्यासाठी बांधला होता. पण कालांतराने रावणाने गोड बोलून वालीशी संधी करार केला. तुझ्या सीमांचे रक्षण माझे सैन्य करेल, तुझा सैन्यावरचा खर्च वाचेल, तुझे राज्य सदैव सुरक्षित राहील असे सांगून संधीकरार केला. सीमेवरच्या सुरक्षेची चिंता मिटल्यामुळे वाली व्यसनाधीन झाला आणि सीमा रक्षणाची जबाबदारी रावणाकडे दिली. रावणाकडे सीमेच्या आता वालीला ठेवल्यामुळे तो बंदीवान झाला. वाली फसला. त्यामुळे रावणाचा बंदोबस्त करू शकेल अशी नवी ताकद निर्माण करणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी विविध राजे, महाराजे, ऋषि-मुनी यांनी एकत्रित येवून स्वतंत्र आघाडी निर्माण केली आणि रावणवधाचा इतिहास रचला. याच्या नियोजनाप्रमाणे रामाचा जन्म होण्याचा हा दिवस म्हणजे राम नवमी.
आज या देशावर काँग्रसचे संकट आहे. काँग्रेसची दहशत आहे. या काँग्रेसच्या संकटापासून सोडविणारे विचार या देशात येवून गेले. पण ते काँग्रेसने कपटाने खोडून काढले. सोनिया गांधी- राहुल गांधी या विचारापासून देशाला वाचविण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी शरद पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेतली होती. ती भूमिका शरद पवारांनी कायम ठेवली असती तर आज जी जागा नरेंद्र मोदींची आहे ती जागा त्यांना मिळाली असती. पण ज्याप्रमाणे  पुलत्सांनी सहस्त्रार्जूनाला फसवले, त्याप्रमाणे काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये येणे भाग पाडले. काँग्रेसच्या आघाडीसोबत गेल्यामुळे शरद पवार हे सतत टिकेचे लक्ष होत गेले. काँग्रेसच्या पापाचे पातक हे शरद पवारांच्या माथ्यावर फोडले जावू लागले.
त्यामुळे आता काँग्रेसचा नाश करण्यासाठी नरेंद्र मोदी हा पर्याय आपल्यापुढे उभा आहे. सर्व देशाने त्यांच्या पाठीशी उभे राहून या देशाचे रक्षण करण्याची हीच वेळ आहे. कौसल्येच्या मोहपाशातून, राज्याच्या मोहपाशातून रामाला बाहेर काढून रावणवधाच्या कर्तव्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यासाठी कैकयीसारखी कठोर भूमिका घेण्याची हीच वेळ आहे. कैकयीने स्वार्थासाठी रामाला वनवासात धाडला हा विचार खोडून टाकला पाहिजे. कारण तिचे जेवढे भरतावर प्रेम होते त्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम रामावर होते. पण आपल्यावर टिका होईल याची तमा न बाळगता तीने ते कठोर कृत्य केले महणून राम वनवासात गेला. रामालाही त्याची जाणिव होती त्यामुळे त्याचा कैकयीवर कधीच राग नवहता. राम येईपर्यंत भरताने एका विश्‍वस्ताप्रमाणे रामाचे राज्य सांभाळले होते. कारण राम देशकार्यासाठी चालला होता.
आज सोनिया गांधींनी इथली युवापिढी व्यसनाधीनतेत गुंतवली आहे. डान्सबारची संस्कृती या देशावर लादली आहे. या डान्सबारला विरोध करून निरोगी आणि कर्तव्यदक्ष पिढी तयार करण्याच्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांच्या भूमिकेला विरोध केेलेला आहे. सोनिया काँग्रेसने गावागावात दारूची दुकाने, बिअरशॉपी पोहोचवल्या आहेत. शहरात डान्सबार, लेडीज बार सुरू केले आहेत. त्यावर बंदी आणली तरी न्यायालयात जावून काँग्रेसने ती बंदी उठवली. आज आपल्या मुलाबाळांचे भवितव्य डान्सबारमध्ये आणि दारूच्या प्याल्यात नष्ट व्हावे असे आपणास वाटते काय? आपली मुलं तशीच सर्वांची मुलं. आपला मुलगा व्यसनी होवू नये आपणास वाटते तसेच या देशातील तरूण व्यसनमुक्त झाला पाहिजे हा विचार केला पाहिजे. मग त्यासाठी काँग्रेसची ही सोनिया गांधींची डान्सबार संस्कृती संपुष्टात आणली पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर सर्वांनी जाण्याची हीच वेळ आहे. काँग्रेसच्या या दहातोंडी  रावणाचा नाश करण्यासाठी काँग्रेसविरोधी मतदान केले पाहिजे. हाच रामनवमीचा निर्धार असला पाहिजे. राम नवमी हा सुट्टी साजरा करण्याचा  दिवस नाही. तर या देशात रामराज्य यावे याचा संकल्प दिन आहे.
रावणाची आई कर्कशा, केकसा किंवा कैकया नावाने ओळखली जाते. तिचा विचार होता की सगळीकडे असूरशक्तीचा धाक असला पाहिजे. राक्षसी प्रवृत्ती सगळीकडे संचारली पाहिजे. तिच्या आज्ञेने साक्षात शिवशंकरालाही हिमालयातून आपल्याकडे घेवून जाण्यासाठी रावणाने भोळ्या शंकराला आपल्या भकतीने वश केले होते. देवगणांनी ते कारस्थान गणपतीच्या मदतीने उधळून लावले. आता रावणाच्या आईप्रमाणेच सोनिया गांधी राहुल गांधी नामक पुत्राला काँग्रेसचा प्रचार करण्याचे सांगत आहेत. त्या राहुल गांधींना रोखणे हे आज आपले कर्तव्य आहे.
2014 च्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होतानाच नरेंद्र मोदींनी दक्षिणेकडे यशस्वी मोहीम सुरू केलेली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासारखा मित्र मिळवला आहे. रामाची आणि सुग्रिवाची जशी मैत्री जमली तशीच ही मैत्री काँग्रेसरूपी रावणाचा नाश करण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आता लक्ष एकच ते म्हणजे काँग्रेसरूपी रावणाच्या विचारांचा नाश करून या देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आणले पाहिजे. त्याचा निर्धार आणि निश्‍चय करण्याचा हा दिवस आहे.
आज गल्ली ते दिल्ली या देशात राम नाम जपना पराया माल अपना अशी संस्कृती काँग्रेसने चालवली आहे. रामाचे नाव लावून हरामखोरी करणारे काँग्रेसचे नेते रायगडात आहेत. अशा रावणाच्या वंशजांना धडा शिकवण्यासाठी अंतुलेंसारखे बिभिषण आपल्या पाठीशी आहेत याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आजच्या रामनवमीचा हाच विचार आहे की  या देशात रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे.
आजचा विनोद

तू की तुझा भाऊ?

राम ठाकूर ‘शामा’ म्हणजे शाळा मास्तर असताना त्यांच्या वर्गात सुनीत आणि विनीत ही दोन जुळी मुले होती. ती दोघे अगदी सारखी दिसायची. त्यामुळे शामा ची म्हणजे मास्तरांची नेहमीच पंचाईत व्हायची. दोघांपैकी एकजण अकाली मरण पावला. काही दिवसांनी दुसरा शाळेत आला. तेव्हा या मास्तरांनी प्रश्‍न विचारला, ‘ अरे काय तुम्ही दोघे इतके सारखे दिसता की नेमका कोण ओळखताच येत नाही. तुमच्या दोघांपैकी एकजण मेला असे समजले. पण तू मेलास की तुझा भाऊ? तूच सांग.’
काय उत्तर द्यावे त्या मुलाने अशावेळी?
..........................................

आणि हाही विनोदच

तर अशा भोळ्या मास्तरांनी सध्या पनवेलमध्ये राहुल नार्वेकरांच्या खर्चातून जोरदार सभा घेण्याचे सत्र सुरू केले आहे. या सभेला येणारे सगळे लोक नार्वेकरांचे भरपूर कोडकौतुक करत आहेत. सभास्थानी गोरेगोमटे नार्वेकर सर्वांमध्ये उठून दिसत आहेत. नार्वेकरांचा प्रचार आपण करतो आहोत भासवत आहेत पण माघारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ते शिव्यांची लाखोली वहात आहेत.
    नार्वेकरांच्या प्रचाराला ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती ते शशिकांत शिंदे, प्रमोद हिंदुराव यांनी प्रचाराला येणे सोडून दिले आहे. त्यामुळे इच्छा नसतानाही वैतागुन राम ठाकूर आपल्या चिरंजीवांबरोबर जात आहेत. एकतर राष्ट्रवादीचे नेते प्रचाराला येत नाहीत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्याच प्रचाराला येत नाहीत तर भविष्यात विधानसभा निवडणुकीत आपल्या चिरंजीवांच्या प्रचाराला ही लोकं काय येणार? या चिंतेने राम  ठाकूर यांना ग्रासलेले आहे. त्याचा परिणाम त्यांना ऐन प्रचारात भाषण करताना नेमके काय बोलावे सुचत नाही.
 काँग्रेसचे जे वक्ते आहेत त्यांना अन्य विषयांवर बोला असे सांगूनही ते पुन्हा पुन्हा नार्वेकरांच्या उच्चशिक्षणावर येतात. त्यामुळे जेव्हा शाम म्हात्रे, जी आर पाटील हे नेते उमेदवार उच्चशिक्षित आहेत त्यामुळे त्यांना मते द्या अशी मागणी करतात तेव्हा राम ठाकूर त्या वक्त्याकडे अगदी खाऊ की गिळू अशा भावनेने बघतात. कारण शेजारी आपले अर्धवट शिक्षण झालेले चिरंजीव बसलेले असतात. सहाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. आत्ता जर आपण नार्वेकरांच्या उच्च शिक्षणाबाबत बोलत बसलो तर विधानसभेला आम्हालाही पनवेलला उच्चशिक्षित आमदारच पाहिजे. प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील असणार आहेत. त्यांनी उच्चशिक्षण घेतलेले आहे. कर्तबगार आहेत. पनवेलमध्ये विकासकामे केलेली आहेत. त्यांच्यापुढे आपले चिरजींव अगदीच खुजे वाटतात. याची जाणिव राम ठाकूर यांना होते आणि ते मुठी आवळायला सुरूवात करतात. त्यांनी मुठी आवळायला सुरूवात केली की काँग्रेसचे वक्ते गप्प बसतात.
   पण राहुल नार्वेकर आपल्या भाषणाला सुरूवात करताना मी डबल गँ्रज्युएट आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेतून बोलू शकतो. असे सांगितल्यावर राम ठाकूर यांचा चांगलाच तिळपापड होतो. कारण राम ठाकूर यांना इंग्रजी आणि हिंदी दोन्हीही येत नाही. प्रशांत ठाकूर यांना इंग्रजी येत नाही. राम ठाकूर सातवीपास तर चिरंजीव बारावीपर्यंत पोहोचलेले. राम ठाकूर यांच्या लहानपणी इंग्रजी आठवीपासून होते त्यामुळे त्यांना इंग्रजी येत नाही. हिंदी बोलायचे तर ‘भागते भागते धबागदिशी पड्या’ अशा पद्धतीचे त्यांचे बोलणे. त्यामुळे नार्वेकर जेव्हा मी तिनही भाषेत बोलू शकतो म्हणतात तेव्हा राम ठाकूर अक्षरशा व्यासपिठावर पाय आपटू लागतात. आपल्या जखमेवर मीठ चोळणार्‍या या नार्वेकरांना आता असा झोपवतो बघा असा पणच ते करतात. त्यात ज्यांच्यापुढे हे भाषण चाललेले असते ते सगळे ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चरचे कर्मचारी असतात. म्हणजे ठिकठिकाणी सभेला वक्तेच नाही तर श्रोतेही घेवून जाण्याची दयनीय अवस्था काँग्रेसवर आलेली असते. या सगळ्या आपल्याच कर्मचार्‍यांसमोर आपला पाणउतारा होत असल्यामुळे निवडणुका होवू देत मग तुम्हा सगळ्यांकडे पाहतो अशा आवेशाने सगळ्या कामगारांकडे राम ठाकूर बघत असतात.
पण सगळ्यात गमतीची गोष्ट अशी की सगळीकडे वक्ते एकच आहेत पण समोर बसलेले श्रोतेही एकच आहेत याची जाणिव नार्वेकरांना झालेली नाही. अशा सभांमधून नार्वेकरांना मताधिक्य देण्याची भाषा राम ठाकूर करत आहेत, हा विनोदच नव्हे काय?
- धुरंधर


जेव्हा त्यांची पाठ दुखते

जेव्हा त्यांची पाठ दुखते


राम ठाकूर जेव्हा शेतकरी कामगार पक्षात होते, तेव्हा त्यांना अचानक पाठदुखी सुरू झाली. राम ठाकूर यांना पाठदुखी सुरू झाली की समजायचे त्यांना आता पक्ष सोडायचे वेध लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पाठ दुखत आहे. ते कारण सांगून म्हणे त्यांनी खजीनदारपदाचा राजीनामा दिला. वास्तविक हाकलूनच काढलं होतं त्यांना. पण लाज वाचविण्यासाठी राजीनामा दिल्याचा बहाणा केला. त्यासाठी पाठदुखीचं कारण पुढे केलं.लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की राम ठाकूर यांची पाठ दुखायला लागते. म्हणजे बाळंतपणापूर्वी एखाद्या गरोदर महिलेला जशा प्रसववेदना सुरु होतात त्याप्रमाणे राम ठाकूर यांना पक्ष बदलताना अशा पाठवेदना सुरू होतात. 2004 निवडणुकीत राम ठाकूर हे शेतकरी कामगार पक्षात होते. त्यावेळी त्यांनी शेकाप बरोबर असूनही अंतर्गत गटबाजी, गद्दारी असे प्रकार करून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले. जसे आज राहुल नार्वेकरांना पाडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तसे. शेकापशी गद्दारी करून थोडेच दिवसात ते काँग्रेसवासी झाले. त्यावेळी राम ठाकूर यांची पाठ दुखत होती. लोकांना दाखवण्यासाठी म्हणून ते दवाखान्यात गेले. पाठीत नेमकी कसली उसण भरली आहे की, हाडं सरकली आहेत की आणखी काय समस्या आहे हे डॉक्टरांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी एक्स रे काढण्यास सांगितले. राम ठाकूर यांनी पाठीचा एक्स रे काढून घेतला. एक्सरेच्या फोटो प्रिंट आपल्या खाटेखाली ठेवल्या. दुसरे दिवशी डॉक्टरांना फोन केला. ‘अहो मी एक्स रे काढला आहे तरी मला अजून बरे वाटत नाही.’ डॉक्टर म्हणाले, ‘अहो, एक्सरे काढायचा असतो तो आत काय बिघाड झाला आहे हे पाहण्यासाठी. तो एक्सरेचा फोटो मला दाखवायला नको का? ’पण राम ठाकूर यांना काही केल्या पटत नव्हते. त्यांना वाटत होते एक्सरे च्या मशिनपुढे नेल्यावर पाठीला काही ट्रीटमेंट केलेली आहे. त्याने आपल्याला बरे वाटले पाहिजे. या अडाणी समजुतीमुळे त्यांनी ती ट्रीटमेंट अर्धवट सोडून दिलेली होती.आता अधून मधून निवडणुकीच्या टायमाला ही पाठदुखी उसळून येते. तेव्हा ते एक्सरेची ती फिल्म आपल्या पाठीवरून फिरवतात आणि त्यांना बरे वाटते.  आताही त्यांची पाठ दुखते आहे. त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा लोकसभा उमेदवाराला पाडण्याचे वेध लागले आहेत. जुनाच एक्सरे दाखवत सध्या फिरत आहेत. एक्सरे नी म्हणे त्यांना बरे वाटते. शरीरातील रचना बिघाड शोधून काढण्याचे, अंतरंगातील छायाचित्रण करण्याचे कौशल्य क्ष किरण यंत्रात असले तरी अंतर्मनाची छबी उमटवण्याचे मशिन अजून तयार झालेले नाही. तोपर्यंत राम ठाकूर यांना अशा बेडुक उड्या सर्वत्र मारता येतील. आता मोदी लाट आहे. काँग्रेसचे सरकार जाणार आहे. त्यामुळे अजून दोन महिन्यांनी उसण भरलेली ही पाठ कुठे गेली असेल याचा अंदाज आज तरी लावता येत नाही. मात्र, जाता जाता राहुल नार्वेकरांच्या पाठीत गुद्दा मारून जाणार हे मात्र निश्‍चित.

Sunday, June 9, 2013

आज देशाला परिवर्तन हवे आहे



 

 आज देशाला परिवर्तन हवे आहे

आज देशाला परिवर्तन हवे आहे

 

नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या निवडणुकीचे प्रचार प्रमुख केले आणि अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या . नरेंद्र मोदींना विरोध करणारे लोक अत्यंत अंध पाने आणि पूर्वग्रह दुषित हेतूने विरोध करताना दिस्तत.
आज देशाला एका परिवर्तनाची गरज आहे. अशा परिस्थितीत नवे नेतृत्व निर्माण होणे गरजेचे आहे. नव्याचे नेहमीच सर्वाना आकर्षण असते. राजीव गांधी जेव्हा वैमानिक होते तेव्हा त्यांना विमान चालवण्याचा अनुभव होता . तरीही या देशातील जनतेने देश चालवायला त्यांना दिलाच ना ?
मग नरेंद्र मोदींना विरोध करण्याची प्रवृत्ती का बळावत आहे?
केवळ गोध्रा प्रकरणाने त्यांना विरोध केला जात आहे . हा कॉंग्रेस आणि तत्सम विचाराच्या लोकांचा मनाचा संकुचितपणा आहे.
इंदिरा गांधी हत्येनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शीखांचा संहार केला होता .त्याची जबाबदारी राजीव गांधी यांच्यावर कोणी लाडात नाही
मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे हिंदुत्ववादी नेते म्हणूनच पहिले जाते . असा दुजाभाव का?
नरेंद्र मोदी यांच्यामुळे भा ज प ला सत्ता मिळाली तर ते दीर्घ काळ ती संधी सोडणार नाहीत अशी कोणाला वाटते काय?

Sunday, September 18, 2011

वाल्याचा वाल्मीकि या देशात घडला हे आम्ही विसरलो का


नरेन्द्र मोदी उपोषानाला बसले आणि अनेकानि भुवया उंच केल्या


कांग्रेस नेत्यानी तर बाह्याच सरसावल्या


कारण, मोदी यांच्यामुले बीजेपी ची ताकद वाढू शकते याचा धसका कांग्रेस्सने घेतलेला दिसतो


गेल्या दहा वर्षात नरेन्द्र मोदिंची प्रतिमा ही कॉंग्रेसने गोधरा चे खलनायक अशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला


पण नरेन्द्र मोदिनी गुजरात विकासात देशात पहिल्या क्रमांकावर नून ठेवला


गुजरात हे राज्य विकासाचे मॉडल म्हणून ओलाखाले जाते


गुजरातचा कायापलट नरेन्द्र मोदिनी केला आणि ते किती विकसीत झाले आहे याची काबुली कांग्रेस्स्चे नेतेही आतल्या आवाजात देतात, साक्षात् पृथिविराज चव्हान यानिही हे मान्य केले होते


महाराष्ट्राचे नव निर्माण करायला गेलेल्या राज ठाकरे यानिनी काही दिवसापूर्वी गुज्रातला भेट दिली अणि नरेन्द्र मोदींच्या कामाची तारीफ केलि


अन्ना हजारे यांच्यासकट अनेकानि गुजरातचे काम मान्य केले


त्यामुले कांग्रेसला खर्या अर्थाने धड़की भरली


मोदी जर bjp che संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील तर राहुल गांधींचा करिश्मा चालणार नाही


tyamule modina badnam karnyache prasarmadhyamana hatashi धरून काम कॉंग्रेसने चालवला आहे


कांग्रेस म्हणते तसे मोदी खलनायक असतीलही कदाचित , म्हणजे क्षणभर तसे गृहीत धरु पण जा देशात वाल्याचा वाल्मीकि होतो तिथे चांगले काम करनारे नरेन्द्र मोदी यांचे मोठेपण का मान्य होऊ शकत नाही?


विरोधकांचे मोठेपण मान्य करण्याचे धाडस कधी कांग्रेस्सला येणार?


बंगलादेश युद्धानंतर अटल बिहारी बाजपेयी यानि इंदिरा गाँधी यांचा गौरव दुर्गा म्हणून केला होता हे कांग्रेसला कधी कलानार ? मोदींच्या सद्भावानेची टिंगल करने चुकीचे आहे हे कांग्रेस्सने लक्षात ghyave