Sunday, March 13, 2022

भारूडातील नाट्यमयता


मराठी रंगभूमीवरचे जे अविष्कार आहेत की, ज्याच्यामध्ये नाट्य दडलेले आहे, यातील एक प्राचिन प्रकार म्हणजे भारूड. याचा अध्यात्माशी संबंध असला, प्रबोधनाचा संबंध याच्याशी असला, तरीही ती एक प्रकारची नाट्य चळवळ आहे. त्यामध्ये अभिनय आणि नाटकाला वाव आहे. म्हणूनच मराठी रंगभूमीच्या इतिहासात भारूडाचा समावेशही नाटकात करावा लागेल. खरेतर भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे. अनेक संतांनी समाज प्रबोधनपर भारूडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारूडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यात नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत, परंतु एकनाथांचे नाव हे भारूडाशी अतूट जोडले गेले आहे. आपल्याकडे लोककलांचा वापर नाटकासाठी नेहमीच केला गेलेला आहे. नाटकासाठी विविध फॉर्म लागतात तसा भारूड हा एक नाटकास पोषक असा फॉर्म आहे.


महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग हा गीतप्रकार होता. त्यावरून भारूड हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. वेदकाळी व वेदोत्तरकाळी येते प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे, करमणुकीचे प्रकार होत. त्यातून वैदिक देव व त्यांच्या शौर्य प्रसंगांची स्तुती गायली जायची. याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली, तेव्हा कालमानानुसार पालटते रूप घेऊन जानपद वाङमय भारूड स्वरूपात आले असावे. भारूडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारूडाचा प्रधान हेतू हाच होता. तर ‘बहुरूढ’ या शब्दाचा अपभ्रंश ‘भारूड’ झाला असेही काहींचे मत आहे.

एकनाथांच्या भारूडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारूडांत आढळते. नाथांच्या भारूडांत विषयांची विविधता खूप आहे. साºया जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारूडांमधून व्यक्त झाले आहे. भारूडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भजन तसेच गूढगुंजन आहे. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारूडे ही आध्यात्मिक प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच संस्कृत वाङमयात जे स्थान पुराणांचे आहे तेच संत वाङमयात भारूडांचे आहे. भारूड रचनांमध्ये नाट्यतत्त्वे ठासून भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे नाट्यरूपांतर सहजतेने होते.


भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बºयाच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. संस्कृत किंवा प्राकृत भाषेत भारूड हा शब्द भारूड या गीत प्रकाराला उद्देशून जरी असला, तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही. त्यामुळे भारूड या काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतच झाला. संत ज्ञानेश्वर हेच भारूडाचे आद्यरचनाकार असावेत, असा एक प्रवाह मानतो. मात्र त्या आधीही भारूडे प्रचलित होती. संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले.

भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तीदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण आदी बाबी असे विविध विषय एकनाथांच्या भारूडांत दिसून येतात. भारूडाचे साधारणपणे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे ‘चिंचेच्या पानी एक देवालय उभारीले, आधी कळस मग पाया रे किंवा मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...सारख्या कूट रचना यात असतात. पण सोंगी भारूड हा प्रकार अधिक लोकप्रिय झाला. कारण त्यात नाट्यबिजे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक जत्रांमध्ये तमाशांप्रमाणे भारूडाचा कार्यक्रम जोरात केला जातो.


एकनाथ महाराजांनी ४५० वर्षांपूर्वी एडका या भारूडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारूडांचा उपयोग केला जातो. किंबहुना आपल्याकडे जी पथनाट्ये सादर केली जातात, त्यातही कुठेतरी भारूडाचे स्वरूप आढळते.

खरे म्हणजे लोकशिक्षणासाठी संतांनी भारूडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारूडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यामाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारूडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारूडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारूडात आहे असे म्हटले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारूडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे. तो रंगभूमीशी अत्यंत जवळचा आहे. अनेक नाटककारांनी एकांकिकेसाठी भारूडाचा वापर केल्याचे दिसून येते. पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारूडकर्त्या भारूडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरकर्ते आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे यांनी महाराष्ट्रभर वारकरी भारूडे सादर केली. पुरुषवेश धारण करून या दोघी बहिणींनी मुंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारूडासाठी अलोट गर्दी व्हायची. वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे २०११ मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भारूडाची कला जिवंत ठेवली आहे, त्यांनी १४ मे २०१६ पर्यंत बहुरूपी भारूडचे २१०० प्रयोग केले आहेत.


- प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा

9152448055\\

मनो‘रंजना’

 



मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा आलेख मांडला, तर त्यात सुलोचना, जयश्री गडकर, आशा काळे, उमा भेंडेपासून अलका कुबलपर्यंत सात्विक, सोशिक, धार्मिक, सासूचा किंवा सुनेचा छळ सहन करणाºया, रडणाºया, देवाला आळवणी करणाºया, त्यानिमित्ताने अष्टविनायक, साडेतीन पिठे, दत्तस्थाने अशा यात्रा करून नवस फेडणाºया अभिनेत्रींचा एक ग्राफ दिसतो, तर दुसरीकडे बिनधास्तपणा, बोल्ड, लढाऊ अशा आक्रमक अभिनेत्रींमध्ये पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे यांसारख्या अभिनेत्रींचा दुसरा ग्राफ दिसून येतो; पण या कसल्याही पठडीत न अडकता आपल्या कारकिर्दीचा उंचच उंच आलेख मांडणारी अभिनेत्री म्हणजे रंजना. अर्थात रंजना देशमुख. आज ३ मार्च हा तिचा स्मृतीदिन. आपली दोन दशकांची यशस्वी कारकीर्द संपवून एका अपघाताने तिची एक्झीट झाली; पण कायम स्मरणात राहणारी अभिनेत्री अशीच तिची कारकीर्द होती.


आपल्या अभिनयातून वैविध्य दाखवणे आणि प्रेक्षकांची पुरेपूर करमणूक करणे या विचाराने पछाडलेली दमदार अभिनेत्री म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सोनेरी कोडे होते. अस्सल गावरान मराठमोळ्या नऊवारीतही तितकीच ती चपखल दिसायची, तर बेलबॉटम आणि पाश्चिमात्य वेषभूषेतही ती तितकीच सुंदर दिसत होती. आपल्या समोर कोण हीरो आहे याची तिला कधी चिंता नव्हती की, कसले टेन्शन. आपण आपली भूमिका चोख करायची आणि सहकलाकाराला आपल्याबरोबर अभिनयाच्या उंचीवर न्यायचे हे तिला चांगले जमत होते. अशावेळी समोर अशोक सराफसारखा कलाकार असला, तर अभिनयाची जुगलबंदी बघायलाच नको. गोंधळात गोंधळ, बिनकामाचा नवरा, सासूवरचढ जावई, गल्ली ते दिल्ली अशा अनेक चित्रपटांमधून दोघांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे; पण विनोदीपणाचा शिक्का तिने आपल्यावर पडू दिला नाही, तर वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा तिने दाखवल्या.

हीच खरी दौलत या चित्रपटात श्रीराम लागू, नीळू फुले, यशवंत दत्त, अशोक सराफ, आशा काळे, रवींद्र महाजनी असे दिग्गज कलाकार समोर असताना, त्यात तिने साकारलेली खलनायिका ही लक्षात राहणारी होती. इचलकरंजीतील कापड उद्योगातील राजकारणात तिने वर्चस्वासाठी केलेल्या उचापती आणि नवरा रवींद्र महाजनीला प्रेमाच्या मुठीत ठेवून सर्वांना जेरीस आणणारी खलनायिका तिने साकारली, तेव्हा हीच ती लोकांना हसवणारी रंजना आहे का, असा प्रश्न पडतो.


सासुरवाशिणमध्ये सासुरवास करणाºया ललिता पवारला वठणीवर आणण्यासाठी आणि रडूबाई आशा काळेला आधार देण्यासाठी रंजनाची आक्रमकता भाव खाऊन जाते. अनंत मानेंसारखे निर्माते-दिग्दर्शक तर तिच्यासाठी चित्रपट बनवू लागले होते. कोल्हापुरातील चित्रपटगृहावर तिकिटांचा काळाबाजार करणाºया महिलेच्या जीवनावर आधारित सुशिला या चित्रपटात, तर रंजनाचा अभिनय अफलातून आहे. शाळेत शिकवणारी कडक शिक्षिका ते दारू पिणारी, सिगारेट ओढणारी आणि गुढघ्यापर्यंत पँट घालून तिकिटांचा काळाबाजार करणारी रंजना हा तिचा प्रवास अभिनयाचे विविध पैलू दाखवणारा होता.

अरे संसार संसार हा चित्रपट म्हणजे तर मराठीतील मदर इंडियाच म्हणावा लागेल. नर्गिसने ज्याप्रमाणे मदर इंडियात काम केले आहे, तशीच सावकाराशी लढणारी आणि जमीनदारीच्या कर्जाच्या विळख्यातून आपला संसार सावरणारी एकाकी झुंज देणारी मराठमोळी शेतकरी महिला दाखवली आहे. सुपरहिट अशा या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.


भुजंग या चित्रपटात भस्म्या रोग झालेला आणि खा-खा सुटलेल्या निळू फुलेची बायको ती झालेली आहे. एका शापित संसाराचा गाडा ओढताना एकापाठोपाठ संकटं तिच्यावर येतात तरी न डगमगता ती तोंड देते. यातील तिचा अभिनय नेहमीप्रमाणेच चांगला होता. तिशीही पूर्ण केलेली नसताना म्हातारीची भूमिका साकारण्याचे काम रंजनाने भूजंग, अरे संसार संसार या चित्रपटात केले होते. चानी चित्रपटात सोनेरी रंगाच्या खारुटीप्रमाणे असलेली चानी ही भूमिका रंजनाने साकारून लहान वयातच आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले होते.

समाजात दिसणारे असे जेवढे पेशे आहेत, जेवढ्या व्यक्तिरेखा आहेत, त्या रंजनाने साकारल्या होत्या. झुंज, सुशिला या चित्रपटांत शिक्षिका साकारली आहे. अनंत मानेंच्या लक्ष्मी, उमा भेंडेच्या भालू चित्रपटात तिने वकिलाची भूमिका केलेली आहे. देवघर या जगदीश खेबुडकर यांनी अवघ्या २८ दिवसांत पूर्ण केलेल्या चित्रपटात रंजना डॉक्टर आहे. बिनकामाचा नवरा, सासूवरचढ जावईमध्ये गावरान गंगू साकारली आहे, तर अनेक चित्रपटांत नऊवारी साडीत येऊन खानदानी मराठी सौंदर्य तिने दाखवले आहे. दुनिया करी सलाममध्ये अशोक सराफ, रवींद्र महाजनी, रमेश भाटकरबरोबर बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या भोंदुगिरीत साधूही ती झालेली आहे. जखमी वाघीणसारख्या चित्रपटात ती दरोडेखोरही आहे. त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तर आणि थरातील महिलांच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. सुधीर ससे यांच्या बहुरूपीमध्ये अबोल अशी विधवा दाखवली आहे. मुंबईचा फौजदार या चित्रपटात मुंबईच्या फौजदाराशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणारी आणि डिटेक्टिव्ह कथांची आवड असलेली भोळसट महिलेची सुंदर भूमिका साकारली आहे.


रंजनाने राजा गोसावीबरोबर असला नवरा नको गं बाई या चित्रपटात काम केले. अशोक सराफबरोबर गोंधळात गोंधळ, बिनकामाचा नवरा, सासूवरचढ जावई, सुळावरची पोळी, चव्हाटा, खिचडी अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. रवींद्र महाजनीबरोबरची तिची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडायची. झुंज, हीच खरी दौलत, लक्ष्मी, लक्ष्मीची पावले, दुनिया करी सलाम, मुंबईचा फौजदार असे अनेक हिट चित्रपट तिचे रवींद्र महाजनीबरोबर आहेत. कुलदीप पवारबरोबर अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप हे चित्रपट तिने केले आहेत, एक डाव भुताचा चित्रपटात दिलीप प्रभावळकरबरोबर काम केले आहे, तर सासुरवाशिणमध्ये कृष्णकांत दळवी तिचा नायक आहे. त्यामुळे समोर कोण नायक आहे, याचा विचार न करता अभिनय करणारी हरहुन्नरी आणि परिपूर्ण अभिनेत्री अशी तिची कारकीर्द होती. खºया अर्थाने प्रेक्षकांचे रंजन, मनोरंजन करणारी ती मनोरंजना होती.

प्रफुल्ल फडके/द स्क्रीन


9152448055\\

कमजोरी अंगवळणी पडली


काळ बदलला म्हणजे नेमके काय बदलते? तर सगळंच बदलतं. अगदी विचारही माणूस वेगळा करायला लागतो. त्यामुळेच काळाबरोबर बदलताना आपली कमजोरीही स्वीकारणे आणि ती भूषणावह किंवा आभूषण म्हणून मिरवणे हा झालेला बदल खरोखरच लक्षणीय म्हणावा लागेल. असेच एक स्वीकारलेले कमजोरीचे आभूषण म्हणजे चष्मा.


एक काळ असा होता की, एखाद्याला चष्मा असणे हे कमजोरीचे वाईट लक्षण समजले जात असे. माणसाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. चष्मा लागला म्हणजे तो अधू झाला असाच समज होता. चष्मा हा म्हातारपणीच लागला पाहिजे. त्यावेळी म्हातारपणही लवकरच येत होतं कदाचित. कारण चष्मा हा चाळिशीत लागावा, त्या अगोदर असणे म्हणजे अपंगत्व समजलं जात होतं. त्यामुळेच पूर्वी चष्म्याला आपल्याकडे चाळीशी म्हणायचे. चष्मा सापडत नसेल, तर घरातील माणसं माझी चाळीशी दिसली का कुठे?, असा प्रश्न विचारत होते. वयाची चाळीशी उलटल्यानंतरच डोळे कमजोर होत असत; पण आता जन्माला आलेल्या बालकांनाही चष्मा असतो. पण त्याचे कोणाला दु:ख वाटत नाही, कारण आता सरसकट सर्वांनाच चष्मा लागत आहे.

एक काळ असा होता की, एखादी मुलगी किंवा मुलगा लग्नाचा असेल, तर त्याला केवळ चष्मा आहे म्हणून नकार यायचा. वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदवताना मुलाला किंवा मुलीला चष्मा आहे किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख केला जायचा. मुलीला चष्मा आहे, म्हणून तिचे लग्न जमत नाही अशी तक्रार असायची. मग अनेक विवाह हे मुलीला दाखवताना चष्मा काढून दाखवली जायची. लग्नानंतर पुन्हा चष्मा वापरला जायचा, मग त्यासाठी निमित्त हे बाळंतपणाचं असायचं. बाळंतपणात चष्मा लागला, असा बहाणा काही लोक करायचे; पण चष्मा हे व्यंगाचे, कमजोरीचे लक्षण मानले जात असायचे. वधू-वर सूचक मंडळात फॉर्म भरून घेतानाही चष्मा आहे/नाही असा रकाना असायचा.


पण गेल्या काही वर्षांत हा विचार पूर्णपणे मागे पडला आहे. आजकाल चष्मा हा असावाच लागतो. तो आता शरीराचाच एक भाग आहे, असे रूढ होताना दिसत आहे. माणसाची शारीरिक कमजोरी त्याच्या अंगवळणी पडताना दिसत आहे. त्यामुळे आता वापरायच्या कपड्यांप्रमाणे चष्म्याच्या जाहिराती सर्रास होताना दिसत आहेत. सोनी मराठीवरील एका लोकप्रिय अशा इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमाचे प्रायोजक हे लेन्सकार्ट आहेत. याची जाहिरातच तुमच्या एका मिसकॉलवर तुमचे डोळे तपासायला आणी तुमच्या योग्य नंबरचा चष्मा देण्यासाठी प्रतिनिधी घरी येईल अशी केली जाते, म्हणजे चष्मा ही तुमच्या कपड्यांप्रमाणे अत्यावश्यक बाब झालेली आहे. माणसात कमजोरी ही असणारच हे गृहीत धरून ती आता अंगवळणी पडली जात आहे. चष्मा असणे याची आता लाज वाटत नाही, तर ती स्टाइल झालेली आहे. हा चष्मा तुमच्या व्यक्तिमत्वात भर घालतो आहे, हा विचार कालानुरूप बदलताना दिसतो आहे. खºया अर्थाने विचार बदलल्याने कमजोरीतील कुरूपता न दिसता आता नवी दृष्टी समाजाला आलेली दिसते.

आणखी एक दुर्बलता म्हणजे केस पांढरे होणे. पूर्वी केस पांढरे होणे हे वृद्धपणाचे लक्षण होते. म्हातारपणीच ते पांढरे व्हायचे. त्यामुळेच तर अनुभवाचे बोल आहेत, हे सांगताना आमचे काळ्याचे पांढरे झाले ते उगाच नाही, असे म्हटले जायचे; पण आजकाल आठ-दहा वर्षांच्या मुलांचेही केस पिकलेले दिसतात. पूर्वी चाळिशीच्या अगोदर एखाद्याचे केस पांढरे झालेले दिसले की, लोक नाकं मुरडत असायचे. केस पांढरे आहेत, म्हणून तो म्हातारा व्हायचा. एखाद्याचे केस पांढरे असले, तर लग्न होणे कठीण होते; पण आजकाल त्याचे कोणाला काही वाटत नाही. पूर्वी केस पांढरे झालेला माणूस सलूनमध्ये जाऊन चोरून काळे केस करून यायचा आणि आपले केस रंगवलेले नाहीत, तर ओरिजनल आहेत, असे भासवायचा. केसाला कलप केला असे म्हटले जायचे. पण आजकाल सर्वांचेच केस हे पांढरे असतात, हे गृहित धरले जाते. एखाद्याचे खरोखरच ओरिजनल केस काळे असतील, तर त्याला कोणता रंग मारला असे सहज विचारले जाते. कलर शांपू, स्ट्रेक्स अशा जाहिराती तरुण मुले करताना दिसतात. त्यामुळे ही कमजोरी नाही तर स्टाईल आहे, असे भासवून कमजोरीशी मैत्री केली जाते. हा झालेला बदलही कौतुकास्पद म्हणावा लागेल.


नजर कमजोर असणे, केस पांढरे होणे या कमजोरी पूर्वीच्या काळात पोषण नीट न होण्यामुळे होतात असे बोलले जात होते. आपला आहार चौरस असेल, सगळे पदार्थ जेवणात असतील तर असे विकार होणार नाहीत असे सांगितले जायचे. त्यासाठी पपई, गाजर खावीत असे सांगितले जायचे. केस स्वच्छ राहण्यासाठी, काळेभोर राहण्यासाठी वेगवेगळी तेले वापरली जायची. आवळा, कैरी, लिंबू अशा पदार्थांचे सेवन असायचे. हे पदार्थ आपण आजही खातो. पण तरीही कमजोरी रहात असेल तर आपल्या आहारातील फळे, भाज्या आता निकृष्ठ किंवा सकस नाहीत असे मानावे लागेल.

बिटवीन द लाईन्स


9152448055\\

मनो‘रंजना’


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा आलेख मांडला, तर त्यात सुलोचना, जयश्री गडकर, आशा काळे, उमा भेंडेपासून अलका कुबलपर्यंत सात्विक, सोशिक, धार्मिक, सासूचा किंवा सुनेचा छळ सहन करणाºया, रडणाºया, देवाला आळवणी करणाºया, त्यानिमित्ताने अष्टविनायक, साडेतीन पिठे, दत्तस्थाने अशा यात्रा करून नवस फेडणाºया अभिनेत्रींचा एक ग्राफ दिसतो, तर दुसरीकडे बिनधास्तपणा, बोल्ड, लढाऊ अशा आक्रमक अभिनेत्रींमध्ये पद्मा चव्हाण, उषा चव्हाण, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे यांसारख्या अभिनेत्रींचा दुसरा ग्राफ दिसून येतो; पण या कसल्याही पठडीत न अडकता आपल्या कारकिर्दीचा उंचच उंच आलेख मांडणारी अभिनेत्री म्हणजे रंजना. अर्थात रंजना देशमुख. आज ३ मार्च हा तिचा स्मृतीदिन. आपली दोन दशकांची यशस्वी कारकीर्द संपवून एका अपघाताने तिची एक्झीट झाली; पण कायम स्मरणात राहणारी अभिनेत्री अशीच तिची कारकीर्द होती.


आपल्या अभिनयातून वैविध्य दाखवणे आणि प्रेक्षकांची पुरेपूर करमणूक करणे या विचाराने पछाडलेली दमदार अभिनेत्री म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सोनेरी कोडे होते. अस्सल गावरान मराठमोळ्या नऊवारीतही तितकीच ती चपखल दिसायची, तर बेलबॉटम आणि पाश्चिमात्य वेषभूषेतही ती तितकीच सुंदर दिसत होती. आपल्या समोर कोण हीरो आहे याची तिला कधी चिंता नव्हती की, कसले टेन्शन. आपण आपली भूमिका चोख करायची आणि सहकलाकाराला आपल्याबरोबर अभिनयाच्या उंचीवर न्यायचे हे तिला चांगले जमत होते. अशावेळी समोर अशोक सराफसारखा कलाकार असला, तर अभिनयाची जुगलबंदी बघायलाच नको. गोंधळात गोंधळ, बिनकामाचा नवरा, सासूवरचढ जावई, गल्ली ते दिल्ली अशा अनेक चित्रपटांमधून दोघांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे; पण विनोदीपणाचा शिक्का तिने आपल्यावर पडू दिला नाही, तर वेगवेगळ्या अभिनयाच्या छटा तिने दाखवल्या.

हीच खरी दौलत या चित्रपटात श्रीराम लागू, नीळू फुले, यशवंत दत्त, अशोक सराफ, आशा काळे, रवींद्र महाजनी असे दिग्गज कलाकार समोर असताना, त्यात तिने साकारलेली खलनायिका ही लक्षात राहणारी होती. इचलकरंजीतील कापड उद्योगातील राजकारणात तिने वर्चस्वासाठी केलेल्या उचापती आणि नवरा रवींद्र महाजनीला प्रेमाच्या मुठीत ठेवून सर्वांना जेरीस आणणारी खलनायिका तिने साकारली, तेव्हा हीच ती लोकांना हसवणारी रंजना आहे का, असा प्रश्न पडतो.


सासुरवाशिणमध्ये सासुरवास करणाºया ललिता पवारला वठणीवर आणण्यासाठी आणि रडूबाई आशा काळेला आधार देण्यासाठी रंजनाची आक्रमकता भाव खाऊन जाते. अनंत मानेंसारखे निर्माते-दिग्दर्शक तर तिच्यासाठी चित्रपट बनवू लागले होते. कोल्हापुरातील चित्रपटगृहावर तिकिटांचा काळाबाजार करणाºया महिलेच्या जीवनावर आधारित सुशिला या चित्रपटात, तर रंजनाचा अभिनय अफलातून आहे. शाळेत शिकवणारी कडक शिक्षिका ते दारू पिणारी, सिगारेट ओढणारी आणि गुढघ्यापर्यंत पँट घालून तिकिटांचा काळाबाजार करणारी रंजना हा तिचा प्रवास अभिनयाचे विविध पैलू दाखवणारा होता.

अरे संसार संसार हा चित्रपट म्हणजे तर मराठीतील मदर इंडियाच म्हणावा लागेल. नर्गिसने ज्याप्रमाणे मदर इंडियात काम केले आहे, तशीच सावकाराशी लढणारी आणि जमीनदारीच्या कर्जाच्या विळख्यातून आपला संसार सावरणारी एकाकी झुंज देणारी मराठमोळी शेतकरी महिला दाखवली आहे. सुपरहिट अशा या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत.


भुजंग या चित्रपटात भस्म्या रोग झालेला आणि खा-खा सुटलेल्या निळू फुलेची बायको ती झालेली आहे. एका शापित संसाराचा गाडा ओढताना एकापाठोपाठ संकटं तिच्यावर येतात तरी न डगमगता ती तोंड देते. यातील तिचा अभिनय नेहमीप्रमाणेच चांगला होता. तिशीही पूर्ण केलेली नसताना म्हातारीची भूमिका साकारण्याचे काम रंजनाने भूजंग, अरे संसार संसार या चित्रपटात केले होते. चानी चित्रपटात सोनेरी रंगाच्या खारुटीप्रमाणे असलेली चानी ही भूमिका रंजनाने साकारून लहान वयातच आपल्या अभिनयाचे दर्शन घडवले होते.

समाजात दिसणारे असे जेवढे पेशे आहेत, जेवढ्या व्यक्तिरेखा आहेत, त्या रंजनाने साकारल्या होत्या. झुंज, सुशिला या चित्रपटांत शिक्षिका साकारली आहे. अनंत मानेंच्या लक्ष्मी, उमा भेंडेच्या भालू चित्रपटात तिने वकिलाची भूमिका केलेली आहे. देवघर या जगदीश खेबुडकर यांनी अवघ्या २८ दिवसांत पूर्ण केलेल्या चित्रपटात रंजना डॉक्टर आहे. बिनकामाचा नवरा, सासूवरचढ जावईमध्ये गावरान गंगू साकारली आहे, तर अनेक चित्रपटांत नऊवारी साडीत येऊन खानदानी मराठी सौंदर्य तिने दाखवले आहे. दुनिया करी सलाममध्ये अशोक सराफ, रवींद्र महाजनी, रमेश भाटकरबरोबर बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या भोंदुगिरीत साधूही ती झालेली आहे. जखमी वाघीणसारख्या चित्रपटात ती दरोडेखोरही आहे. त्यामुळे समाजातल्या सगळ्या स्तर आणि थरातील महिलांच्या भूमिका तिने साकारल्या आहेत. सुधीर ससे यांच्या बहुरूपीमध्ये अबोल अशी विधवा दाखवली आहे. मुंबईचा फौजदार या चित्रपटात मुंबईच्या फौजदाराशी लग्न करण्याचे स्वप्न पाहणारी आणि डिटेक्टिव्ह कथांची आवड असलेली भोळसट महिलेची सुंदर भूमिका साकारली आहे.


रंजनाने राजा गोसावीबरोबर असला नवरा नको गं बाई या चित्रपटात काम केले. अशोक सराफबरोबर गोंधळात गोंधळ, बिनकामाचा नवरा, सासूवरचढ जावई, सुळावरची पोळी, चव्हाटा, खिचडी अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे. रवींद्र महाजनीबरोबरची तिची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडायची. झुंज, हीच खरी दौलत, लक्ष्मी, लक्ष्मीची पावले, दुनिया करी सलाम, मुंबईचा फौजदार असे अनेक हिट चित्रपट तिचे रवींद्र महाजनीबरोबर आहेत. कुलदीप पवारबरोबर अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप हे चित्रपट तिने केले आहेत, एक डाव भुताचा चित्रपटात दिलीप प्रभावळकरबरोबर काम केले आहे, तर सासुरवाशिणमध्ये कृष्णकांत दळवी तिचा नायक आहे. त्यामुळे समोर कोण नायक आहे, याचा विचार न करता अभिनय करणारी हरहुन्नरी आणि परिपूर्ण अभिनेत्री अशी तिची कारकीर्द होती. खºया अर्थाने प्रेक्षकांचे रंजन, मनोरंजन करणारी ती मनोरंजना होती.

प्रफुल्ल फडके/द स्क्रीन


9152448055\\

आॅपरेशन गंगा


युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मोदी सरकारने अत्यंत वेगवान प्रयत्न सुरू केलेले आहेत. विशेष म्हणजे त्याचा कुठेही गाजावाजा न करता त्यांनी तातडीने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण कार्य करत राहू आणि आपल्या कामातून बोलत राहू या भूमिकेतून सरकारने पटापट पावले उचलली आणि भारतीयांना सुखरूप परत आणण्याचा घेतलेला निर्णय निश्चित कौतुकास्पद आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांचे आणि मोदी सरकारचे कौतुक करण्याचे मोठे मन विरोधकांकडे असण्याची कोणी अपेक्षा करणार नाही; पण जनता मात्र या कृतीने समाधानी आहे. युक्रेनमध्ये १६ हजारांच्या आसपास भारतीय नागरिक अडकले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या सुटकेसाठी आखण्यात आलेली आॅपरेशन गंगा ही मोहीम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा देणारी आहे. युक्रेनमध्ये युद्ध भडकल्याने या सर्वांना अपार यातनांना सामोरे जावे लागले. तेथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी बहुतांशी विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतात. अनेक विद्यापीठांच्या व्यवस्थापनाने आपापल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवले. पूर्ण देश रणांगण बनला असताना, सैन्याच्या तळघरांशिवाय दुसरी सुरक्षित ठिकाणे जवळपास नाहीत. वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांना तातडीने अन्यत्र नेणे सोपे नव्हते; पण भारत सरकारने अत्यंत कमी वेळात आॅपरेशन गंगा ही मोहीम राबवून भारतीयांना आणायची केलेली व्यवस्था हे फार मोठे काम आहे.


केंद्र सरकारने लवकरात लवकर युक्रेन सोडण्याच्या सूचना भारतीय नागरिकांना दिल्या; मात्र त्याची अंमलबजावणी केवळ त्यांच्यावर अवलंबून नव्हती, हे लक्षात घेतले पाहिजे. मुळात युद्धाचे ढग दाटले असतानाही प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होईल अथवा नाही, याबद्दल अंदाजच बांधले गेले. रशियाच्या हल्ल्यातून युक्रेनचे रहिवासी विभागही सुटले नाहीत. अशावेळी तेथील भारतीयांवर किती अगतिक होण्याची वेळ आली असेल, याची केवळ कल्पनाच करता येईल. पण त्यांना धीर देण्यासाठी भारतातील चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवण्याचे, तेथील भारतीय विद्यार्थ्यांना आधार देण्याचे केलेले काम अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. तो महत्त्वाचा आहे. अर्थात भुजबळांसारख्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी त्यावर टीका करून आपल्या संकुचित प्रवृत्तीचे दर्शन घडवले; पण अनुभवी आणि मोठे नेते कोणी यावर बोलले नाहीत, तर समाधानच व्यक्त केले आहे.

विशेष बाब म्हणजे व्हिसाशिवाय भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशात प्रवेश देण्यास पोलंडने परवानगी दिली. हे पण महत्त्वाचे होते. पोलंडचा कुठे तरी भारतावर, इथल्या सरकारवर विश्वास असल्यामुळेच व्हिसाशिवाय त्यांना तिथे थारा मिळाला. यादरम्यान काही विद्यार्थ्यांना मारहाणीला देखील सामोरे जावे लागले. युक्रेनच्या सैनिकांनी मारहाण केली, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. रशिया आणि युक्रेन या संघर्षात भारताने तटस्थ; अर्थात रशियाला न दुखावणारी भूमिका घेतली. त्यातून नाराज होऊन ही मारहाण झाली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. केवळ युक्रेन युद्धाच्या संदर्भात नव्हे, तर यापुढच्या काळात परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये अधिक तत्परता दिसणे, संवेदनशीलता वाढणे आवश्यक आहे. याबाबत दीर्घकालीन धोरण ठरविण्याची वेळ आली आहे. ते घडले तरच ऐनवेळी होणारी धावपळ, उडणारी घबराट हे थांबवता येईल. अर्थात सरकार योग्यवेळी योग्य ती पावले उचलेल यात शंका नाही.


भारतीय शिक्षणाच्या तुलनेने स्वस्त वैद्यकीय शिक्षण उपलब्ध असल्याने असंख्य भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनला पसंती असते. येथील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठांनी विचार करावा अशी ही बाब! अतिशय धैर्याने हे विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी जातात. या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला होता. युद्धानंतरचे चित्र काय असेल, उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी तेथे परत जाता येईल काय, हे प्रश्न अनुत्तरीत राहणार आहेत, कारण युद्ध जरी चार-दोन दिवसांत संपले, तरी सगळे मूळपदावर येण्यासाठी किती तरी महिने जावे लागतील. तोपर्यंत हे विद्यार्थी काय करणार आहेत?, त्यांचीही सोय आता सरकारला कुठे तरी लावावी लागणार आहे. त्यांचे उर्वरित शिक्षण इथे करता येईल का, याचा अभ्यास करावा लागेल.

पण भारतीय नागरिकांना सीमेपर्यंत पोहोचणे अथवा पोहोचविणे सोपे नाही. याचे कारण युक्रेनमधून बाहेर पडू इच्छिणाºया तेथील नागरिकांची मोठी संख्या. राजधानी क्यिवसह महत्त्वाच्या शहरांवर रशियाकडून बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरू असल्याने एक लाखाहून अधिक नागरिकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे. युक्रेनच्या पश्चिमेकडील देशांमध्ये जाण्यासाठी सीमांवर रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसमोरील आव्हान अनेक पटीने वाढले होते, परंतु अशा परिस्थितीत मोदी सरकारने आखलेली आॅपरेशन गंगा खरोखरच महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. रस्ते मार्गाने भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये आणणे आणि तेथून विमानाने भारतात पाठविणे, याशिवाय पर्याय नाही. तोच मार्ग वापरला जात आहे. आॅपरेशन गंगाच्या माध्यमातून भारताने अन्य देशांतील नागरिकांनाही एक रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे भारताचा मुख्य शत्रू असलेल्या पाकिस्ताननेही या भूमिकेचे कौतुक केले आहे.

सध्याच्या परिस्थितीचे मिसाईल ‘मिखाईल गोर्बाचेव्ह’


सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध जोरात सुरू आहे. तिसºया महायुद्धासाठी जगाला सामोरे जावे लागणार का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. रशियाकडून अनेक मिसाईल्स (क्षेपणास्त्रे) युक्रेनवर सोडली जात आहेत; पण रशियाने सर्वात पहिल्यांदा सोडलले मिसाईल म्हणजे रशियाचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हेच असावेत. सध्याच्या परिस्थितीला तेच कारणीभूत असू शकतात. रशियाची महासत्ता ही परिस्थिती संपुष्टात आणून नरम राष्ट्र अशी भूमिका निर्माण करणारे गोर्बाचेव्ह यांच्या काळातील परिस्थिती आजच्या युद्धाला कारणीभूत असू शकते.


मिखाईल सेर्गेयेविच गोर्बाचेव्ह यांचा आज जन्मदिवस आहे. २ मार्च, १९३१ ला त्यांचा जन्म झाला. हे एक माजी सोव्हिएत राजकारणी आहेत. ते सोव्हिएत संघाचे सातवे व अखेरचे राष्ट्रप्रमुख होते. मार्च १९८५ ते आॅगस्ट १९९१ दरम्यान गोर्बाचेव्ह सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. १९५५ साली कायद्याचे शिक्षण घेत असताना, गोर्बाचेव्ह यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेतला व लवकरच ते पक्षात कार्यशील बनले. १९७९ साली कार्यकारी समितीचे (पॉलिटब्युरो) सदस्य बनलेले गोर्बाचेव्ह लिओनिद ब्रेझनेव्ह यांच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व सोव्हिएत संघाचे राष्ट्रप्रमुख बनले. झपाट्याने खालावत चाललेल्या सोव्हिएत आर्थिक स्थितीदरम्यान सत्तेवर आलेल्या गोर्बाचेव्ह यांनी परिस्थिती सुधारण्यासाठी ग्लास्नोस्त (पारदर्शकता) व पेरेस्त्रोयका (पुनर्रचना) ही दोन धोरणे जाहीर केली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगनसोबत अनेक बैठका घेऊन शीत युद्ध संपवण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी केलेले प्रयत्न दखलपात्र ठरले. त्यांनी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाचे सोव्हिएत संघावरील संपूर्ण नियंत्रण काढून घेतले, ज्याचा परिणाम सोव्हिएत संघाच्या विघटनामध्ये झाला. यामुळे शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन अमेरिकेने गोर्बाचेव्ह यांना गौरवले गेले असले, तरी आज निर्माण झालेल्या अशांततेचे बीज त्यावेळेच्या निर्णयात होते. रशियाचे विघटन झाल्यामुळे आज युक्रेनवर ही लष्करी कारवाई आणि विध्वंस होत आहे; पण या विघटनाचे जनक म्हणूनच गोर्बाचेव्ह यांच्याकडे पाहावे लागेल. त्यामुळे ते खºया अर्थाने मिखाईल नाही, तर मिसाईल ठरले आहेत.

गोर्बोचेव्ह सोव्हिएतचे राष्ट्राध्यक्ष असताना भारतातला त्यांचा दौरा प्रचंड गाजला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधींच्या समवेत मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे डिनर हे त्या काळात गाजले होते. नव्यानेच संपूर्ण देशभर टीव्हीचे प्रक्षेपण सुरू झालेले असल्याने दूरदर्शनवर जे काही दाखवतील ते प्रेक्षक पाहायचे. त्यामुळे सलमा सुलतानच्या तोंडून गोर्बाचेव्ह यांच्या नावाचा उच्चार तिने ओठांची हालचालही न करता केलेला उच्चार तेव्हा खूप गाजला होता. भांडवलशाहीच्या विरोधात वागणारे लाल बावटे, तेव्हा उजवीकडे झुकलेले पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. संपूर्ण जगावर आणि भारतातील कम्युनिस्ट, डाव्या पक्षांवरही रशियाचा तोपर्यंत प्रचंड प्रभाव होता. इतका की रशियात पाऊस पडला, तर इकडचे भारतातील कम्युनिस्ट लोक छत्री उघडत होते, असे वर्णन केले जायचे. पण ही एकनिष्ठता, विचारांची बांधिलकी गोर्बाचेव्ह यांनी कुठे तरी संपुष्टात आणली. जगभरातील डाव्या पक्षांचे मातेरे तिथून झाले. भारतातील डावे पक्षही यानंतरच क्षीण पडू लागले होते. त्यामुळे आजच्या या परिस्थितीला ते कुठे तरी जबाबदार असावेत, असे वाटते.


भारतातील फाळणीनंतर जसा भारतातील काही नेत्यांच्या विरोधात नाराजी निर्माण झाली तशी नाराजी मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याबाबत झाली, तर त्यात नवल नाही. शांततेचे नोबेल मिळवून रशियाचे वर्चस्व संपुष्टात आणत, रशियाचे १५ देशांमध्ये विघटन करणे आणि अमेरिकेपुढे शरणागती पत्करणे हे काहींच्या दृष्टीने गोर्बाचेव्ह यांचे पाप असू शकते. व्लादिमीर पुतीन यांच्या मनात हीच सल असेल, तर ते या युद्धातून अमेरिकेला आणि जगाला वेठीला धरण्याचा प्रयत्न करतील हे मात्र नक्की.

मिखाईल गोर्बाचेव्ह हे रशियाचे सोव्हिएत रशियाचे ज्याचा उल्लेख यूएसएसआर असा होत असे अशा रशियाचे शेवटचे अध्यक्ष होते. यूएसएसआरचे सातवे अध्यक्ष म्हणून त्यांनी १९९१ पर्यंत कारभार पाहिला. याच काळात आखाती युद्ध भडकले. इराण-इराक युद्ध सुरू झाले. या युद्धात अमेरिका, फ्रान्सने उडी घेतली. आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. त्याचवेळी रशिया हा देश मात्र विघटनाच्या संकटात सापडला. रशियाचे पंधरा तुकडे झाले. रशिया, युक्रेन, उझबेकिस्तान, कझागस्तान, बेलारुस, अझरबैजान, जॉर्जिया, ताझिकीस्तान, मोल्दोव्हा, किर्गिझस्तान, लिथुएनिया, तुर्कमेनिस्तान, आर्मेनिया, लात्व्हीया, एस्टोनिया असे पंधरा तुकडे झाले.


एकेकाळी हाच सोव्हिएत संघ हा एक अभूतपूर्व देश होता. सोव्हिएत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली होती. २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले. सोव्हिएत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता. या देशाने आशिया खंडाचा १/३ भाग आणि युरोप खंडाचा १/२ भाग व्यापला होता. या देशाच्या सीमा पूर्वेला पॅसिफिक महासागरापर्यंत, पश्चिमेला पोलंड आणि बाल्टिक समुद्रापर्यंत, उत्तरेला आर्क्टिक महासागरापर्यंत आणि दक्षिणेला काळा समुद्र, इराण, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या उत्तर सीमांपर्यंत होत्या.

सोव्हिएत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी ओब, येनिसी, लेना व अमूर या ४ मोठ्या नद्या सोव्हिएत संघात होत्या. मस्क्वा नदीवर वसलेल्या मॉस्कोच्या परिसरातील नद्या ५ समुद्रांशी जोडल्या होत्या. पश्चिमेकडील द्विना नदीद्वारे बाल्टिक समुद्र, द्नीपर व डॉन या नद्यांद्वारे काळा समुद्र आणि अझोव समुद्र, वोल्गा नदीने कास्पियन समुद्र तर उत्तरेकडील नद्यांद्वारे श्वेत समुद्र जोडला गेल्याने दळणवळण अतिशय सुलभ झाले होते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोव्हिएत संघाला लाभल्या होत्या. देशाच्या नैऋत्येला कार्पेशियन पर्वतरांगा, पूर्व सैबेरियातील व्हकोर्यान्स्क आणि स्तानवोईच्या पर्वतरांगा, दक्षिणेला कॉकेशस पर्वतरांगा, अफगाणिस्तान, भारत आणि चीन या देशांच्या सीमांना लागूनच पामीर, तिआनशान आणि अलताई पर्वतरांगा तर युरोपीय आणि आशियाई सोव्हिएत संघाचे विभाजन करणाºया उरल पर्वतरांगा अशा समृद्ध पर्वतरांगा सोव्हिएत संघास लाभल्या होत्या.


१५ घटक गणराज्ये, २० स्वायत्त गणराज्ये, ८ स्वायत्त प्रदेश व काही छोटे राष्ट्रीय गट मिळून सोव्हिएत संघ हा देश ओळखला जात होता. त्यातील रशिया राज्य सगळ्यात मोठे होते, सोव्हिएत संघाच्या सुमारे ७४ % भूभाग रशियाने व्यापला होता. सोव्हिएत संघात सुमारे १८० राष्ट्रीय गटांचे व सुमारे १२५ भाषा व बोली भाषा बोलणारे लोक होते. देशाचा मुख्य धर्म आॅर्थोडोक्स ख्रिश्चन हा होता. तीन गटांत मोडणारे स्लाव वंशाचे लोक (१) ग्रेट रशियन्स - रशियात राहणारे, (२) लिटल रशियन्स - युक्रेनमध्ये राहणारे, (३) व्हाइट रशियन्स - बेलोरशियात राहणारे असे प्रमुख लोक राहत. हे सगळं वैभव संपुष्टात आले. त्याला कुठे तरी मिखाईल गोर्बाचेव्ह जबाबदार असल्याची भावना आता उफाळून येत आहे.

प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स


9152448055\\

निर्बंध मुक्त

 जगातील अनेक देशांनी कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलेली आहे. आपल्या देशातही त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंध शिथिल होण्याचे आणि शाळा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचे संकेत नुकतेच दिले होते, तरीही अनेक देशांमध्ये याबाबत साशंकता अजूनही व्यक्त होत आहे. अर्थात ज्या देशांची सरकारने त्याला राजी नाहीत, त्यांनाही तेथील जनतेने उग्र निदर्शने करून नमविल्याचीही उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात गेली दोन वर्षे आपण आपल्या तोंडावर ज्या मुखपट्ट्या घालून फिरतो आहोत, त्यापासून मुक्ती मिळवण्याच्या टप्प्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. अर्थात जरी मास्कमुक्त होण्याचे जाहीर केले, तर आता इथून पुढे आपण कायमच मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करणे हितावह ठरणार आहे. सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. मोठमोठी क्षेपणास्त्रे या युद्धात वापरली जात आहेत. त्याप्रमाणे एखादे जैविक अस्त्रही वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याप्रमाणे चीनने कोरोनाचे अस्त्र सोडले तसे एखादे आले, तर आधीच काळजी म्हणून मास्क न उतरवण्याची सवय लावून घ्यावी लागेल. निर्बंधमुक्त याचा अर्थ मास्कमुक्त असा नाही हे लक्षात घेतले पाहिजे.


आता अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना ही काही महामारी राहिलेली नाही, तर पँडेमिक ऐवजी तो एंडेमिक बनलेला आहे, अशी भूमिका तेथील सरकारांनी घेतली आणि निर्बंध हटवायला सुरुवात केली आहे. डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे अशा युरोपीय देशांनी जानेवारी अखेरीस एकीकडे ओमिक्रॉनची लाट उसळलेली असतानाच आपल्या देशातील सर्व निर्बंध उठविले होते. ब्रिटननेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मागे घेतली आहे. इटली आणि स्पेननेही ब्रिटनच्या पावलावर पाऊल टाकत मास्कसक्ती मागे घेतली आहे. केवळ बंदिस्त जागेमध्येच मास्क वापरले जावेत. बाहेर खुल्या जागेमध्ये मास्क वापरण्याची आता आवश्यकता नाही अशी भूमिका त्या देशांच्या सरकारांनी घेतली आहे.

अर्थात हे आपल्याला शक्य नाही. कारण आपल्यासारखी सार्वजनिक ठिकाणची अतोनात गर्दी युरोपीय देशांमध्ये सहसा पाहायला दिसत नाही. त्यामुळे तेथे मास्कविना सामाजिक अंतर आपोआप राखले जाऊ शकते, तसे आपल्याकडे होणे शक्य नाही. तरीही आपल्या देशातही आसाम, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांनी केवळ तोंडावरचा मास्क सोडल्यास सर्व प्रकारचे निर्बंध हटविलेले आहेत. आता महाराष्ट्र सरकारही त्याबाबत विचार करीत आहे. शाळा तर आॅफलाइन पद्धतीने सर्वत्र सुरू झालेल्या आहेत. एकेक करून कोरोनाचे निर्बंध कमी होत चालले आहेत, परंतु सर्वच्या सर्व निर्बंध हटविणे सध्याच्या परिस्थितीत योग्य व हितकारक ठरेल का, याबाबत तज्ज्ञांनी अभ्यास करून आपली भूमिका मांडावी लागेल.


केवळ जनतेच्या दबावांखातर किंवा आर्थिक दबावांखातर हे निर्बंध हटविणे धोक्याचे ठरू शकते. त्याशिवाय निवडणुका जवळ आल्यामुळे, निवडणुकीच्या वातावरणात या निर्बंधांचा फटका आपल्याला बसेल असा विचार कोणत्याही सरकारने करू नये. वैद्यकीय तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे, खरोखरच कोरोना महामारीपासून, सध्याच्या तिच्या तिस‍ºया लाटेपासून आपण मुक्त झालो आहोत का याचा विचार करून सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे.

ज्या देशामध्ये कोरोनाची सुरुवात झाली. त्या चीनमध्ये तर अजूनही सर्व कडक निर्बंध कायम आहेत. मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या, संसर्गशोध, आत आणि बाहेर मास्क वापरणे हे सगळे निर्बंध चीनने कायम ठेवलेले आहेत.


भारतात मास्क वापरण्याची अजूनही सक्ती आहे, परंतु तिचे पालन मात्र आता पूर्वी इतक्या गांभीर्याने होताना दिसत नाही. जर सक्ती असेल, तर तिची कार्यवाही व्हायला हवी आणि जर नसेल तर निर्बंध अधिकृतरित्या हटविले जायला हवेत. धड सक्तीही नाही आणि धड मुक्तीही नाही अशा धेडगुजरी वातावरणात कोणीही सुखाने श्वास घेऊ शकणार नाही, कारण आपण मास्क वापरला, तरी समोरचा वापरेल याची शाश्‍वती नसते. परंतु एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण मास्क वापरणे आपल्या हिताचे आहे. काळानुरूप अशा सवयी अंगवळणी पडणे आवश्यक आहे. सरकारने मास्कमुक्ती केली याचा अर्थ आता मास्क वापरूच नये असे नाही. म्हणूनच आपल्याला आता निर्बंध मुक्त झालो असलो, तरी मास्कमुक्त होण्याची गरज नाही. ती एक व्यावहारिक सवय मान्य करणे गरजेचे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोरोनाबाबत सावधगिरीचीच भूमिका घेतलेली दिसते. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग कायमचे राहणार नाही. कधीतरी ते संपुष्टात येणारच आहे, परंतु ती वेळ अद्याप आलेली आहे की नाही याबाबत तज्ज्ञांमध्येच मतभेद आणि त्यामुळे संदिग्धता आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाजवळ हातरूमाल असतो, उन्हाळ्यात डोक्याला टोपी, गॉगल असतो. तशाचप्रकारे आता कायमस्वरूपी मास्कची सवय लावून घेतली तरी हरकत नाही. ओमिक्रॉन हा काही कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नव्हे, असेही जागतिक आरोग्य संघटना सांगत असल्याने आणि जगात कुठे कुठे त्याहून वेगळ्या व्हेरिएंटची काही तुरळक उदाहरणे आढळून आल्यामुळे या संभ्रमात भरच पडली आहे. ही महामारी संपुष्टात येण्याची प्रतीक्षा संपूर्ण जग करते आहे. आजवरच्या महामा‍ºयांप्रमाणेच कोरोनाची महामारीही संपुष्टात येणारच आहे, परंतु थोडा संयम गरजेचा आहे. पण निर्बंध मुक्त झालो तरी मास्कमुक्त व्हावे असे नाही.

कसोटीचा काळ


नुकतेच सुरू झालेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध म्हणजे अप्रत्यक्षरित्या तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे. आज लांब असलेल्या अनेक देशांना यात ओढलं जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेला त्यांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सगळ्या जगाला या युद्धात ओढावे लागेल. अशा परिस्थितीत भारतासारख्या संभाव्य महासत्तेचे स्वप्न पाहणाºया देशाची फरफट होणार आहे, हे नक्की.

खरंतर गेल्या काही दशकात जग खूप बदलले आहे. जागतिकीकरणानंतर भौगोलिक अंतराला आता फारसा अर्थ राहिलेला नाही. जगाच्या एका कोपºयात आढळलेला विषाणू किती झपाट्याने जगभर पसरतोे, याचा भयंकर अनुभव आपण गेल्या दोन वर्षांपासून घेतला आहे. तीच खरी एका जैविक युद्धाची सुरुवात होती. हा सगळा वर्चस्ववादाचा विषय आहे.


म्हणजे सर्वच देशांचे एकमेकांशी व्यवहार वाढल्यावर, आर्थिक हितसंबंध निर्माण झाल्यावर आता कोणत्याही देशाला स्वत:चा असा विचार राहिलेला नाही. सर्वांबरोबर प्रवाहात जायचे असे चित्र तयार झाले आहे. त्यामुळे सर्वांबरोबर जाताना महायुद्धातही सैनिकाप्रमाणे सगळ्या देशांना जावे लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र विचार करणे अवघड आहे.

युक्रेनवर रशियाने युद्ध लादल्यानंतर, जगात प्रत्येक देशाला आपण कोणाच्या बाजूने आहोत, हे स्पष्ट करण्याची गरज त्यामुळेच भासत आहे. विशेषत:, युक्रेनमध्ये पंधरा हजारांहून अधिक भारतीय अडकून पडलेले असताना, क्रूड तेलाचे भाव वाढत असताना आणि देशात शेअर बाजारात हल्लकल्लोळ सुरू असताना, या पेचप्रसंगाबाबत आपली नेमकी भूमिका स्पष्ट करणे आपल्यालाही अवघड झाले आहे.


रशिया कोणत्याही क्षणी हल्ला करू शकेल, अशी स्थिती जवळपास गेला महिनाभर आहे. हल्ला झाल्यानंतर लगेचच किंवा हल्ला दृष्टिपथात येताच जलद हालचाली करून भारतीयांना मायदेशी आणण्यासंबंधीची योजना तयार ठेवणे काही अवघड नव्हते. आजच्या काळात, तर ते अजिबातच अशक्य नव्हते; परंतु तसे झाले नाही आणि गेल्या महिनाभरात केवळ चार हजार भारतीय स्वत:हून मायदेशी परतले. युद्धाला तोंड फुटल्यावर, उरलेल्यांपैकी काहींना घेऊन एक भारतीय विमान परतले आणि नंतर रशियाने हवाई हद्दीचीच नाकेबंदी केल्याने एअर इंडियाच्या विमानाला अर्ध्या वाटेवरून माघारी यावे लागले. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांशी लष्करी संबंध असल्यामुळे, कोणालाच दुखवायचे नाही याचा दबाव येऊन, भारताला तटस्थ भूमिका घ्यावी लागत आहे. याचे परिणाम भविष्यात नक्कीच जाणवणार आहेत.

भारताची होणारी ही फरफट अत्यंत विचित्र अशी आहे. लांब असलेले देश, अमेरिका आणि युरोपातील काही देश यात आपला व्यापारी फायदा कसा होईल, आपल्याकडच्या शस्त्रास्त्रांचा व्यापार कसा होईल याकडे लक्ष देत आहेत. आपल्याला मात्र आपले नुकसान कसे होणार नाही याची चिंता असणार आहे.


या युद्धाचा परिणाम म्हणून, जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या भावात एकाच दिवसात प्रती बॅरल आठ ते दहा डॉलरने वाढ झाल्याचा फटका भारतीयांना बसणार, हे उघडच आहे. शंभरी पार करण्याचे कौतुक ओसरून, पेट्रोलने अनेक ठिकाणी आधीच एकशे दहा रुपये प्रति लिटरचा टप्पाही गाठला आहे. त्याची वाटचाल आता १२५ रुपयांच्या दिशेने होते की काय, अशी धडकी सामान्यांच्या मनात भरली आहे. २०१४ ते २०२० या काळात क्रूड तेलाचे भाव प्रती बॅरल पन्नास-पंचावन्न डॉलरपर्यंत खाली आले होते, तेव्हा पेट्रोलच्या दराबाबतही भारत सरकार गप्प राहिले आणि भावातील उताराचा फायदा जनतेला मिळू दिला नाही. आता हे भाव चढे असताना; मात्र पेट्रोलपंपावरील प्रति लिटरच्या किमतीचे आकडे किती वेगात पुढे फिरतील, याची भीती सामान्यांना वाटत आहे.

या इंधनातील दरवाढीचा फटका सर्व व्यवहारांवर होत असतो. त्यामुळे युद्धात आणि युद्धाच्या परिणामात सामान्य माणूस उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. मध्यमवर्गीय भारतीयांना आर्थिक बचतीसाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाकडे वळवण्यासाठी अनेक वर्षे जावी लागली. बचत खात्यावरील व्याज कमी झाल्यावर आणि मुदतठेवही अनाकर्षक वाटू लागल्यावर गेल्या काही वर्षांत हा ओघ शेअरकडे वळू लागला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अवघ्या काही तासांतच सेन्सेक्स २७०० अंकाने कोसळला. गेल्या दोन वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली. कोविडच्या दुसºया लाटेने जगभर थैमान घातलेले असतानाही बाजाराने एवढी खालची पातळी गाठली नव्हती. पाठोपाठ डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला असून, आशियाई चलनांपैकी ते सर्वात कमकुमत चलन ठरले आहे. गुंतवणूकदारांना एका दिवसात साडेतेरा लाख कोटींचा फटका या जागतिक घडामोडींनी बसला. सोन्यानेही ५२ हजारांची पातळी गाठली आहे. त्यामुळे युद्धभूमी दूर असली, तरी तिचे चटके भारतीयांना बसत आहेत. स्वातंत्र्यानंतर भारताची रशियाशी अधिक जवळीक होती. रशियाची शकले झाल्यानंतरच्या काळात अमेरिकेसोबतच्या लष्करी व्यवहारात वाढ होऊनही, अद्याप ५० टक्क्यांच्या आसपास लष्करी सामग्री रशियातून आयात केली जाते. रशिया दुखावला, तर तो चीनच्या बाजूला झुकेल, अशी भीती भारताला सतत असतेच. या पार्श्वभूमीवर, जागतिक राजकारणात यापुढे भारताला रशिया आणि अमेरिका दोघांची बाजू घेणे ही तारेवरची कसरत असणार आहे. या परिस्थितीत, कदाचित देशाच्या परराष्ट्र विषयक धोरणाचा फेरविचार करून, नेमकी काय भूमिका घ्यायची ही चिंता आहे. जागतिक राजकारण, डावपेच, स्वदेशाचे हित यांबरोबर आणि भविष्यातील आर्थिक, तांत्रिक घडामोडींचा अंदाज घ्यावा लागेल. यात सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे. त्यामुळे हा काळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी कसोटीचा काळ ठरणार आहे. त्यावर त्यांनी योग्य निर्णय घेतला आणि देशाची परिस्थिती सुयोग्य राखली, तर त्यांचे भविष्यातील आसन आणखी मजबूत होईल.

अडचणीत सापडल्यावर देशाची आठवण


युक्रेनमध्ये जवळपास वीस हजार भारतीय अडकल्याची माहिती गेल्या चार दिवसांत समोर आली. हे युद्ध पेटले नसते, तर किती भारतीय त्या देशात आहेत हे कोणाला समजलेही नसते, पण एरवी आपल्या देशाला नावे ठेवणारे, देशाकडे पाठ फिरवणारे अडचणीत आल्यानंतर मात्र त्यांना देशाची आठवण येते, हे दिसून आले आहे.

हे हजारो भारतीय कसे अडचणीत आहेत, त्यांचे तिथे कसे हाल होत आहेत यावरून वृत्तवाहिन्या अगदी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने त्यांना भारतात परत आणले पाहिजे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे, म्हणून या वाहिन्या भावनिक लाट निर्माण करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हेच लोक एरवी आपल्या देशाला किती विचारत होते? ते काही देशाच्या हितासाठी तिथे गेलेले नाहीत. स्वत:ची नोकरी, व्यवसाय, शिक्षण अशा निमित्ताने ते गेलेले आहेत. सीमेवरचा सैनिक ज्या देशप्रेमाने सीमेवर जातो तसे हे लोक गेलेले नाहीत. एरवी आपल्या भारताला नावे ठेवणारीच ही प्रजा असते.


जे विद्यार्थी शिकायला म्हणून तिकडे गेलेले आहेत त्यांना भारतात शिक्षण मिळत नव्हते का? जे भारतीय व्यवसायासाठी तिकडे गेले आहेत त्यांना भारतात व्यवसायाची संधी नव्हती का? देशासाठी त्यांचे योगदान काय? वर्षा, दोन वर्षांनी सुट्टीला म्हणून इकडे आल्यावर बाहेरच्या देशांचे गोडवे गाणारे हे लोक संकटात आल्यावर त्यांना भारताची आठवण आली का?

स्कॉलरशिप मिळवणारे, गुणवत्ता यादीत चमकणारे हे विद्यार्थी स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी म्हणून बाहेरच्या देशात जातात. ते स्वत:ला मोठे करण्याचे काम करत असतात. त्यांचे योगदान देशासाठी काहीही नसते. पण आज अडचणीत आल्यावर भारतीय यंत्रणेला नावे ठेवत आहेत. सरकारने आम्हाला सोडवले पाहिजे, सरकारने आमची सोय केली पाहिजे म्हणून बोलत आहेत. यापैकी किती जण देशहितासाठी म्हणून, सरकारने पाठवले म्हणून तिकडे गेलेले होते?


हे आजच घडते आहे असे नाही. असे युद्ध खरेतर पहिल्यांदाचा घडते आहे, पण महामंदीच्या काळात जेव्हा अमेरिकेने अनेकांना कामावरून काढून टाकले, तेव्हाही अनेकांनी असाच कांगावा केलेला होता. कोरोनाच्या काळातही अनेकांनी भारत सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावे म्हणून आग्रही होते, पण तुम्ही देशासाठी काय केले आहे? परदेशात जाऊन नोकरी धंदा करता त्याचा देशाला काय फायदा आहे? पण या अतिविद्वान मुठभर लोकांमुळे राजकारण मात्र जोरात तापवले जाते.

युद्धाची परिस्थिती जवळपास महिनाभर तयार झालेली आहे. या लोकांना भारतात परत आणायचे प्रयत्न सरकारने अगोदरच का केले नाहीत, असा सवाल अनेक जण करत आहेत. आज रशियाने हवाई सीमा बंद केल्यावर अनेक जण म्हणत आहेत की, सरकारने या भारतीयांना आणायची अगोदरच सोय करायला हवी होती. पण यात सरकारची चूक काय आहे? तिथली परिस्थिती चिघळेपर्यंत हे लोक तिथे थांबलेच का? त्यांना तिथल्या परिस्थितीची जाणिव झालेली असणारच. मग वेळीच त्यांनी सरकारला विनंती केली असती, तर दोन महिन्यांपूर्वीच सगळ्यांना आणता आले असते. पण आता अडचणीत सापडल्यावर सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक बाबतीत सरकारला दोष देण्याची लागलेली ही सवय बदलली पाहिजे. विरोधकही त्यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. अर्थात ते केवळ राजकारण करण्यासाठी तसे करत आहेत. एरवी या सरकारवर टीका करायला काही कारण मिळत नाही म्हणून हे निमित्त आहे. पण जर विरोधक सत्तेत असते आणि अचानक युद्ध पेटले असते, तर त्यांनी काय केले असते? जे आपल्या हातात नाही त्यासाठी सरकारला दोष देण्याची गरज नाही.


युक्रेनमधून परत आलेल्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अनेक पक्षांचे लोक गेले होते. त्यांचे स्वागत काय केले. त्यांना कोणी ओवाळून काय घेतले. त्यांची बडदास्त काय ठेवली. असे स्वागत आमची सेवा करणा‍ºया सैनिकांचे आपण करतो का? पोलीस आपल्या मदतीसाठी अहोरात्र असतात. कधी त्यांचे कौतुक असे केले आहे का? पण फक्त स्वहितासाठी परदेशात गेलेले अडचणीत आल्यावर भारतात आले त्यांचे कसले कौतुक करायचे आहे?

मदत करणे ही आपली संस्कृती आहे. आपण शत्रूलाही प्रसंगी मदत करत असतो. हे तर आपलेच आहेत. पण त्यांना हा देश आपला वाटतो आहे का? याचा विचार केला पाहिजे. बाहेरच्या देशात शिकायचे, कमवायचे, पैसे कमवून मोठे व्हायचे आणि कधीतरी इकडे आल्यावर त्या देशाचे गोडवे गायचे आणि भारताला नावे ठेवायची. अशा प्रवृत्तीच्या लोकांचे स्वागत करणे चुकीचेच आहे.


यापैकी किती लोकांनी संकटकाळात देशाला मदत केलेली आहे? किती लोकांनी कोरोना काळात मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधीला हातभार लावला आहे? त्यामुळे वैयक्तिक लाभासाठी परदेशात गेलेल्यांचे जास्त स्तोम माजवू नका. जरा आमचे सैनिक वर्षातून सुट्टीला येतात, तेव्हा त्यांचे स्वागत करा छानपैकी. ते आपल्या देशासाठी तिथे प्राण हातात घेऊन जात असतात. कौतुक त्यांचे करायला पाहिजे. नको त्यांचे स्तोम माजवण्याची गरज नाही. युद्ध झाले नसते तर या लोकांना भारताची आठवणही आली नसती, याचाही विचार केला पाहिजे.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\

28 feb 

डोळस संगीतकार रवींद्र जैन


कलेचा किंवा निर्मितीचा प्रांत हा अदृष्य असतो. दृष्टीपलीकडची सृष्टी ही संगीत या कलेत असते. तिथे या दृष्यमान जगातील वस्तूंना थाराच नाही. तर ती एक नवी सृष्टी असते. म्हणूनच जन्माने अंध असलेल्या रवींद्र जैन यांनी निर्माण केलेली संगीत सृष्टी पाहिल्यावर त्यांच्यातील डोळस कला ही खूप उंचीवर आहे हे समजते. अंध असूनही त्यांनी निर्माण केलेले संगीत हे अजरामर असे आहे.


अलीगडच्या औष्णिक ऊर्जा केंद्रात अभियंता असलेले आयुर्वेदाचार्य पंडित इंद्रमणी जैन आणि किरण जैन, हे रवींद्र जैन यांचे आई-वडील होते. अंध म्हणून जन्माला आलेल्या रवींद्र जैन यांना लहानपणापासून संगीताचा एक वेगळाच ‘कान’ होता. जैन मंदिरांमध्ये ते लहानपणी भजन गात असत. त्यांची संगीतातील रुची पाहून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी पं‌डित जनार्दन शर्मा आणि पंडित नथू राम यांच्याकडे पाठवले. त्याचे त्यांनी सोने केले.

‘आॅल इंडिया रेडिओ’साठी रेकॉर्डिंग करत असताना जैन यांची राधेश्याम झुनझुनवाला यांच्याशी ओळख झाली व त्यांनी जैन यांना मुंबईत आणले. मुंबईत आल्यावर जैन यांनी मोठमोठ्या निर्मात्यांसोबत काम करायला सुरुवात केली. १९७२ मध्ये जैन यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला ‘कांच और हिरा’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली. महंमद रफी यांच्या आवाजात त्यांनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते, मात्र ते गाणे रिलीज झाले नव्हते.


१९७०च्या दशकामध्ये रवींद्र जैन यांनी ‌संगीत दिलेले चित्रपट गाजले. राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले. रवींद्र जैन यांनी हिंदीप्रमाणेच गुजराती, पंजाबी, बंगाली, भोजपुरी, मल्याळी, तेलुगू, राजस्थानी अशा विविध भाषांतील एकूण सुमारे १५० चित्रपटांना संगीत दिले.

प्रत्येक संगीतकाराला सतत नव्या आवाजाचाही शोध असतो. जैन यांना असा एक आवाज सापडला आणि त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी खुमारी अवतरली. येसूदास यांच्यासारख्या दक्षिणी चित्रपटातील लोकप्रिय गायकाला त्यांनी हिंदी चित्रपटाच्या दुनियेत आणले. रवींद्र जैन यांचे भक्ती संगीताचे काही आल्बम आहेत. ‘मॉर्निंग सन’ हा त्यांचा आल्बम विशेष प्रसिद्ध आहे.


स्वत: अंध असले तरी त्यांनी पाहिलेले संगीताचे जग फार मोठे होते. त्यामुळेच ‘अँखियों के झरोके से’ अशा नावाच्या चित्रपटालाही त्यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शनच्या ताराचंद बडजात्यांबरोबर त्यांचे समीकरण चांगले जमले आणि त्यांनी सुरेल संगीतप्रधान चित्रपट दिले. रवींद्र जैन यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये एक विवाह ऐसा भी था, कांच और हीरा, गीत गाता चल, चितचोर, चोर मचाये शोर, तपस्या, दुल्हन वही जो पिया मन भाये, दो जासूस, नदियाँ के पार, पती, पत्‍नी और वो, फकिरा, बारोमास, राम तेरी गंगा मैली, विवाह, सौदागर, हीना हे चित्रपट महत्त्वाचे आहेत. राज कपूर यांच्यासारख्या ग्रेट शोमनने रवींद्र जैन यांच्यातील हिरा हेरला आणि त्याची चांगली पारख केली. त्यांच्याकडून राम तेरी गंगा मैली या चित्रपटाला संगीत देण्याची संधी दिली. ती गाणी आजही रसिकांच्या मनात लोकप्रिय आहेत.

दूरदर्शनचा प्रभाव वाढल्यावर त्यांनी अनेक मालिकांना उत्तम संगीत दिले. यामध्ये रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने त्यांचा आवाज आणि संगीत घराघरात पोहोचवले. पौराणिक आणि पोषाखी मालिकेसाठी कथा पोहोचवण्यासाठी त्यांच्या संगीताचा चांगला उपयोग झाला. यामध्ये अलीफ लैला, इतिहास की प्रेरम कहानियाँ, जय गंगा मय्या, राजा हरिश्चंद्र, रामायण, लवकुश, श्रीकृष्ण, साई बाबा या मालिका विशेष गाजल्या. रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांमधून त्यांनी भक्तीरस ओथंबून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. भक्तिरसात प्रेक्षक अक्षरश: चिंब होतील अशी तल्लीन होणारी श्रवणीय गीते या मालिकांसाठी त्यांनी दिली. सर्वसाधारण मालिकांना फक्त शिर्षकगीत असते. पण रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकेत असंख्य गीते होती. गायनातून कथा भाग पोहोचवणे हा फार मोठा भाग यात होता. त्यामुळे या मालिका अत्यंत प्रभावी झाल्या होत्या.


१९८५ मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी जैन यांना सर्वोत्कृष्ट संगीतकारासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याशिवाय २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्कार देऊन जैन यांचा गौरव केला होता. महाराष्ट्र सरकारनेही जैन यांचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमीर खुस्रो पुरस्कारानेही जैन यांना गौरवले होते. २०१५ सालचा पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता. आपल्यात कला असेल, गुणवत्ता असेल, तर अपंगत्वावर मात करता येते हा डोळसपणा त्यांनी जगाला दाखवून दिला होता. त्यामुळे ते खºया अर्थाने डोळस संगीतकार होते.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055

27 feb

सामान्य माणूस वैतागला

 राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास खात्यांचे मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय कुरघोडीच्या राजकारणाला आता घमासान युद्धाचे स्वरूप आले आहे. एकीकडे संपूर्ण जग तिसºया महायुद्धाच्या चिंतेत असताना राज्यात चाललेले हे चिखलफेकीचे, कुरघोड्यांचे राजकारण अत्यंत हिनदीन प्रवृत्तीचे आहे. त्यामुळे ज्यांच्यावर टीका केली जात आहे, त्यापेक्षा टीका करणारे नेते जनतेच्या मनातून उतरत आहेत. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध भारत-पाकिस्तानसारखे असल्याचा भ्रम निर्माण केला जात आहे आणि त्यातून टीका केली जात आहे. हे अत्यंत लाजिरवाणे असे आहे.


खरेतर आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर या कुरघोड्या सुरू झाल्या, पण आता या कुरघोड्यांनी पुढचा आणि अधिक गंभीर टप्पा गाठला आहे. हा अत्यंत घातक असा टप्पा आहे. त्यामुळे राजकारणी माणसांबाबत सामान्यांच्या मनात किळस निर्माण होत आहे. जे गप्प आहेत ते त्या मानाने सुखी आहेत. एखाद्या तपास यंत्रणेने त्यांच्या तपासाचा भाग म्हणून कोणाला बोलावले, कोणावर कारवाई केली, तर त्याचे किती राजकारण करायचे? त्याचा किती कांगावा करायचा याचे भान असले पाहिजे. असा कांगावा केल्याने त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होणार नसते. काहीतरी पुरावे असल्याशिवाय एवढ्या मोठ्या यंत्रणा उगीच कोणालाही ताब्यात घेतील का? धूर आहे तिथे आग आहेच. ती शोधण्याचे काम होत असते. तो धूर लपवणे जसे सोपे नसते, तसेच आपले कर्म लपवणे सोपे नाही हे राजकारण्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

यामध्ये मूळ मुद्दा आहे तो सध्या देशात केंद्रीय यंत्रणांना वाटेल तसा हस्तक्षेप करण्याची जी मुभा मिळते आहे त्याचा. देशाच्या राज्यघटनेतच केंद्र व राज्य यांच्यात समतोल राखण्याची पत्थ्ये काटेकोरपणे नमूद केली आहेत, पण अगदी स्वातंत्र्यापासूनच केंद्राच्या विशेषाधिकाराच्या आधारावर राज्यांमधील सत्ता अस्थिर करण्याचे खेळ सुरू झाले होते. काँग्रेसची राजवट दीर्घकाळ या देशात राहिल्याने त्यांनी सुरू केलेला हा खेळ सहजासहजी थांबणे शक्य नाही. त्यामुळे राज्या-राज्यांमधील प्रादेशिक अस्मिता जागृत होऊन, त्यातून प्रादेशिक पक्षांची सरकारे बनू लागली आणि केंद्रीय सत्तेवर राजकीय दबाव ठेवू लागली. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात केंद्राचा राज्यांवर असलेला हा वरचष्मा कमी होऊ लागला होता. सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताचे सरकार आले; तेव्हा पुन्हा एकदा केंद्रीय वर्चस्वाचा जुना खेळ सुरू झाला. अर्थात, यासाठी मोदी सरकारला कोणत्याही नव्या कायद्यांची गरज पडली नाही. हा दबदबा उभा करण्याची पार्श्वभूमी काँग्रेसचे बुद्धिमान नेते व माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीच तयार केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) राज्यांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या त्यांच्या कायद्याला गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही विरोध केला होता. पुढे ‘पीएमएलए’ कायद्यातील कठोर तरतुदींचा राजकीय गैरवापर होऊ शकतो, ही भीती मुलायमसिंह यादव, शरद यादव आदींनी व्यक्त केली होती. तो विरोध तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सरकारला पाठिंबा देणाºया अन्य खासदारांनी हाणून पाडला. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांनी जे भूत तयार केले, जो भस्मासूर निर्माण केला तोच आता त्यांच्याच डोक्यावर बसताना दिसतो आहे. केवळ गुजरातमधील मोदी सरकारला नामोहरम करण्यासाठी निर्माण केलेला कायदा आता त्यांच्याच अंगलट येत आहे. त्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारला काहीही करावे लागत नाहीये.


मलिक यांनी आर्यन खानप्रकरणी केंद्राच्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’वर जोरदार हल्ला चढवला. चित्रफिती, कागदपत्रांच्या आधारे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांना देशभरातील प्रसारमाध्यमांतून मोठी प्रसिद्धीही मिळाली. त्याचदरम्यान मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असाही एक आरोप व प्रत्यारोपांचा सामना रंगला. या लढाईत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांच्या आधारावरच ईडीने मलिक यांच्यावर कारवाई केली आहे, पण त्यानंतर जो चिखलफेकीचा टीकेचा, आंदोलनाचा गदारोळ सुरू झाला आहे. त्यामुळे राजकारणाबाबत सामान्यांच्या मनात तिडीक निर्माण झालेली आहे. जनतेचे सगळे प्रश्न सुटले आहेत आणि टाईमपास म्हणून नेत्यांना हे उद्योग करावे लागत आहेत, असा आभास निर्माण होत आहे. जनतेच्या प्रश्नांवर कोणी बोलतच नाही. सामान्यांना होणाºया त्रासाबाबत कोणी बोलायचे नाही. फक्त आमच्या नेत्यांवर कोणी टीका करायची नाही. त्याचावर कोणी बोलायचे नाही. बोलला तर त्याला शिवराळ भाषेत उत्तर दिले जाईल, चिखलफेक केली जाईल. असल्या राजकारणाला सामान्य माणूस वैतागला आहे. त्यापेक्षा ते रशिया आणि युक्रेनचे थेट युद्ध परवडले.

आता राज्यातील विरोधकांवरही अशीच जुनी-पुराणी प्रकरणे उकरून काढून मारून मुटकून गुन्हे दाखल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील काही नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळायचा आणि त्याच वेळी, राज्यातील तपास यंत्रणांनी इथल्या विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाई सुरू करायची, असेच होत राहिले, तर राज्य सरकारला कारभार करण्यासाठी कधी वेळ उरणार आहे? आणि यात सामान्य माणसाचे नेमके काय भले होणार आहे? एकंदरीतच, सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्नांपेक्षा, रोजच्या तमाशाचा प्रेक्षकवर्ग वाढविण्याच्या दिशेने राज्यातले राजकारण चालले आहे. त्यामुळे एकमेकांवर गुन्हे नोंदवण्याच्या प्रक्रियेला आता वेग येईल. चारित्र्यहनन, गुन्हे नोंदवणे आणि काही करून आपल्या विरोधकांना तुरुंगात डांबणे या प्रकारचे राजकारण हे अत्यंत किळसवाणे आहे. ते थांबवले पाहिजे.

27 feb