विरोधी नेत्यांसोबत मोर्चा काढल्यानंतर राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अनेक त्रुटी आढळल्याने त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. या मुद्द्यांवर विचार झाल्यावर, एसआयआर (मतदार यादी क्रमवार शुद्धीकरण) प्रक्रियेवर दाखल केलेल्या इतर याचिकांसोबत त्यांच्या याचिकेवरही सुनावणी होईल. राहुल गांधींनी आपल्या याचिकेत नमूद केलेल्या मुद्द्यांचा सर्वोच्च न्यायालय विचार करेल हेही निश्चित आहे. यानंतर, राहुल आणि त्यांच्या सहकाºयांनी सुनावणीची वाट पाहायला हवी, पण त्याच वेळी ते आंदोलने आणि निदर्शनांद्वारे आपली ताकद दाखवत आहेत. ते हे सुरूच ठेवण्याबद्दलही बोलत आहेत. ही अत्यंत हास्यास्पद आणि विचित्र भूमिका आहे. यांना साधी याचिकाही नीट दाखल करता येत नाही. त्यात १४ त्रुटी निघतात. विद्वान वकील त्यांच्याकडे आहेत. त्यापैकी अनेकांनी भारतावर हल्ले करणाºयांचेही वकीलपत्र घेतलेले आहे. इतकी भारतविरोधी भूमिका घेणाºया वकिलांची फौज असताना त्यांना साधी याचिका अचूक दाखल करता येत नाही. हे काय देशहित पाहतील? हा पहिला प्रश्न आहे. केवळ परकीय मदतीवर, बाहेरच्या गुंडांकरवी देशात अस्थिरता माजवण्यासाठी हे चालवलेले खूळ जनता पूर्णपणे ओळखून आहे. ईव्हीएमऐवजी आसाममध्ये त्यांच्या मागणीनुसार मतपत्रिकेवर मतदान घेतले तरी जनतेने त्यांना साफ नाकारले आहे. याचा अर्थ व्होटचोरी झालेली नाही तर लबाड आणि चोरांना मतदान करायचे नाही हे मतदारांनी ठरवले आहे. तरीही परकीय ताकदीवर, झुरळांच्या नक्षलवादाचा बागुलबुवा बनवून देशात अंदाधुंदी माजवण्याचा प्रकार करत आहेत, यातून त्यांची चुकीची भूमिका जनतेसमोर येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्यासही तयार नसताना, ‘माझा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे’ असे म्हणण्यामागे राहुल गांधींचा नेमका अर्थ काय आहे? सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या इच्छेनुसार निर्णय द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे का, की त्यांनी आपल्या याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर न्यायालयाचे मत ऐकण्यात त्यांना रस नाही? हा प्रश्न यासाठी निर्माण होतो, कारण ते आपले अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत स्वस्थ न बसण्याबद्दल बोलत आहेत आणि मुख्य निवडणूक आयुक्तांसह मोदी सरकारला हटवणे हे आपले अंतिम ध्येय आहे, हे सूचित करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. पण मोदी सरकारला हटवण्यासाठी न्यायालय किंवा ज्ञानेश कुमार यांना हटवणे हा उपाय नाही. त्यासाठी जनाधार विरोधकांना मिळाला पाहिजे. पण विरोधकांना जनतेने साफ नाकारले आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले शिरोमणी यांची भूमिका जखम शेंडीला मलम मांडीला असा प्रकार आहे.
रस्त्यावर उतरून आणि लोकशाही संपली आहे ही खोटी बातमी पसरवून ते हे करण्याचा प्रयत्न करत आहेत का? लोकशाहीत निवडणुकांद्वारे सत्ता बदलते. राहुल गांधी काही वेगळी पद्धत वापरण्याचा प्रयत्न करत आहेत का? एसआयआरला मतचोरी संबोधून, राहुल गांधी केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्याला विरोध करण्यासाठी लोकशाही मूल्यांपासून विचलित होणाºया पद्धतींचाही अवलंब करत आहेत. पण राहुल गांधी आणि त्यांच्या इंडि आघाडीतील शिरोमणींनी लक्षात घेतले पाहिजे की, मतचोरी झाली हे बोलणे मतदारांचा अपमान आहे. मतदारांनी तुम्हाला साफ नाकारले आहे आणि स्वीकारण्यासाठी तुम्हाला काहीतरी विधायक, देशहिताची भूमिका घेतली तर शक्य आहे नाहीतर २०२९ला पुन्हा सत्तेपासून लांब राहावे लागेल. आपण बोलतो आहे हे चुकीचे बोलतो आहे हे राहुल गांधी आणि त्यांच्या शिरोमणी मित्रांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी झुरळांचा बुरखा घातला आहे. झुरळ त्या अभिजीत दीपके आणि मंडळींकडून वाटेल ते बोलून घेत आहेत. पण झुरळाची ढाल करणे हे राहुल गांधी आणि शिरोमणींच्या अंगलट येणार आहे. यांच्यासाठी गर्दी जमत नाही म्हणून झुरळांची गर्दी निर्माण करणे हे शस्त्र अत्यंत हास्यास्पद आहे. हे करण्यासाठी ते एसआयआरच्या त्रुटी, गुंतागुंत आणि त्यामुळे जनतेला होणारा त्रास यांचा ढाल म्हणून वापर करत आहेत. आता ते खोट्या आरोपांनी आगीत तेल ओतत असल्याने, निवडणूक आयोगाने एकही पात्र मतदार मागे राहणार नाही याची खात्री केली पाहिजे.
यासाठी निवडणुका संपेपर्यंत एसआयआर प्रक्रिया सुरूच राहिली पाहिजे. निवडणूक आयोगाने लोकांना त्यांची अचूक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी पाठवलेल्या पत्रांना नोटीस म्हणण्याने असा समज निर्माण होतो की, त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. संदेश असा असायला हवा की, एसआयआर त्यांना मतदार यादीत त्यांची नावे नोंदवण्याची सुविधा देत आहे. निवडणूक आयोगाने पात्र मतदारांची नोंदणी करण्याइतकेच लक्ष अपात्र लोकांना मतदार यादीतून वगळण्यावर दिले पाहिजे. यामुळे केवळ जनतेचा विश्वास वाढेल आणि ते विरोधी पक्षाच्या कारस्थानांना बळी पडण्यापासून वाचतील. निवडणूक आयोगाने नोटिसा पाठवलेल्या नाहीत तर त्रुटी पूर्ण करून आपले नाव यादीत राहील यासाठी जनतेला केलेले आवाहन आहे हे लक्षात घेतले पाहिजे. परकीय पैशांवर माजलेल्या झुरळांच्या ताकदीवर शहरी नक्षलवादाचा सहारा घेऊन देशात अस्थिरता माजवण्याचा आणि घुसखोरी करून सत्ता काबीज करण्याचा राहुल गांधींचा डाव देशातील जनता कधीही यशस्वी होऊ देणार नाही. हा नेपाळ, बांगलादेश नाही, हा भारत आहे. तो अखंड राहील.
No comments:
Post a Comment