Friday, October 16, 2026

भारताच्या भविष्याशी खेळ


असे दिसते की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाश्चात्य देशांना आणि जागतिक संस्थांना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मोदी सरकारला अस्थिर करण्याचे केलेले आवाहन आता फळाला येत आहे. सलग निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यात अपयशी ठरलेले राहुल गांधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून सातत्याने ही खंत व्यक्त करत आहेत की, पाश्चात्य देश भारतात ‘लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी’ मदत करत नाहीत. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शक्तींना केलेल्या या लज्जास्पद आवाहनाकडे त्यावेळी फारसे लक्ष गेले नसले तरी, आता असे दिसते की, पाश्चात्य देश आणि भारतातच कार्यरत असलेल्या शक्तींमधील साटेलोटे अधिक घट्ट होत आहेत.


हा एक विचित्र योगायोग आहे की, ज्यावेळी काँग्रेस पक्षाने देशात अराजकता पसरवून मोदी सरकारला अस्थिर करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली, त्याच वेळी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तांच्या कार्यालयाने भारताला लोकशाही मूल्ये आणि परंपरांवरून फटकारायला सुरुवात केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या स्पष्ट प्रतिसादात, त्यांना आपल्या कामाशी काम ठेवण्याचा योग्य सल्ला दिला. इतकेच नाही तर, भारताने आपले शेजारी देश पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यावरील अत्याचारांबाबत कोणतीही कारवाई न केल्याबद्दल या संस्थेला जबाबदार धरले.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला फटकारण्याची हिंमत या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेत कुठून आली? यासाठी राहुल गांधींसारखे चुकीचे वर्तन करणारे लोक जबाबदार आहेत. राहुल गांधींच्या बेजबाबदार कृतींना सीमा नाही. या संदर्भात, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, इलॉन मस्क यांच्या भारतविरोधी भावनांनाच दुजोरा देत असल्याचे दिसून आले. जेव्हा मस्क भारतात त्यांच्या स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीला परवाना नाकारल्याने नाराज होऊन त्यांच्या ट्विटर या इंटरनेट माध्यमावर आपली निराशा व्यक्त करू लागले.


वास्तविक पाहता, मस्क यांच्या कंपनीला भारतातील नियामक मानकांची पूर्तता अद्याप करायची आहे, परंतु त्यांनी आपली निराशा भारतीय उद्योजक आणि सरकारवर काढायला सुरुवात केली. यामध्ये राहुल त्यांना चिथावणी देत ​​असल्याचे दिसत होते. यापूर्वी, जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हटले होते, तेव्हा राहुल यांनी लगेचच त्यांच्याशी सहमती दर्शवली होती. वस्तुस्थिती अशी आहे की, जागतिक अर्थव्यवस्था अस्थिरता आणि मंदीशी झुंजत असतानाही, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलीकडेच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अंदाज वाढवला आहे.

भारताला धमकी देण्याचा मस्क यांचा हेतू हलक्यात घेता येणार नाही. बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष मस्क यांना त्यांचे लिथियम साठे कवडीमोल भावाने देण्यास आणि परवाना मंजूर करण्यास तयार नसल्यामुळे मस्क यांनी अमेरिकेला बोलिव्हियाच्या निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षांना पदच्युत करण्यासाठी चिथावणी दिली होती. जेव्हा इन्स्टाग्रामवरील एका वापरकर्त्याने मस्क यांच्यावर हा उठाव घडवून आणल्याचा आरोप केला, तेव्हा त्यांनी उद्धटपणे उत्तर दिले, ‘आम्ही ज्याला पाहिजे त्याला उलथवून टाकू, त्यांना जे पाहिजे ते करू द्या.’ मस्क यांनी या उठावाची दिलेली उद्धट कबुली हे दर्शवते की, स्टारलिंक परवाना वादावरून मोदी सरकारबद्दलची त्यांची निराशा आणि राहुल गांधींनी भारतात निर्माण केलेली अस्थिरता या दोन वेगळ्या गोष्टी म्हणून पाहता कामा नयेत.


मस्क आणि राहुल गांधी यांच्यातील ही जुगलबंदी बरेच काही सांगून जाते. यातून हेही स्पष्ट होते की, देशांतर्गत उद्योजकांवर नियमितपणे गरळ ओकणाºया काँग्रेस पक्षाला, मस्क यांच्यासारख्या परदेशी आणि तापट स्वभावाच्या उद्योगपतीसाठी पायघड्या घालण्यास काहीच संकोच वाटत नाही; ज्यांना सामान्य सौजन्य आणि सभ्यतेची जाणीव नाही आणि जे मुकेश अंबानींना भारताचे ‘खरे बॉस’ म्हणजेच पंतप्रधान म्हणायला अजिबात कचरत नाही. राहुल यांनी कमल हासन यांच्याकडून धडा घ्यायला हवा, ज्यांनी मस्क यांना आरसा दाखवत स्पष्ट केले की, ‘भारत एक लोकशाही देश आहे, वसाहत नाही. जगाचे येथे स्वागत आहे, पण त्यांचे भविष्य केवळ भारतातील जनताच ठरवेल, पाश्चात्य हितसंबंध, त्यांचे दुटप्पी धोरण किंवा कोणतेही देशांतर्गत किंवा परदेशी अब्जाधीश नव्हेत.’

या सगळ्यात, अमेरिकन डीप स्टेटने पोसलेल्या किंवा त्यांच्याद्वारेच तयार झालेल्या झुरळांसारख्या जनता पक्षाकडे (सीजेपी) कोणी दुर्लक्ष कसे करू शकेल? मोदी सरकारच्या काळात भारताची अभूतपूर्व वाढ अमेरिकन डीप स्टेटला असह्य आहे आणि असे दिसते की, बांगलादेश आणि नेपाळमध्ये जसे केले, त्याचप्रमाणे ते आपला प्यादा असलेल्या सीजेपीच्या माध्यमातून भारतातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला उलथवून टाकण्याचा कट रचत आहेत. या परिस्थितीत, एक आंधळा वर्ग मोदी-विरोधी समर्थकही पुढे येतो, जो घोषित करतो की, मोदी सरकारला उलथवून टाकण्याचा एकमेव मार्ग ‘क्रांती’ आहे. त्यांच्या मनात हे अगदी स्पष्ट आहे की, ते लोकशाही मार्गाने मोदींना पराभूत करू शकत नाहीत.


यामुळे प्रचंड रक्तपात होईल हे सांगायला त्याला अजिबात संकोच वाटत नाही, पण दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. एकूणच, देशात एक विषारी युती उदयास येत आहे. एका बाजूला अमेरिकन डीप स्टेट आहे, ज्याने आपले प्यादे थेट भारतात तैनात केले आहेत. दुसºया बाजूला एलॉन मस्क आहेत, जे त्यांच्या मनमानी अटी न मानणाºया देशांमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची धमकीही देतात. तिसºया बाजूला हताश आणि भ्रमनिरास झालेले राहुल गांधी आहेत. सर्वात आधी ते आहेत गांधी, जे पंतप्रधानपदाला आपला जन्मसिद्ध हक्क मानतात. आणि शेवटी येतात ते हताश डावे, जे आता कुठेही सत्तेत नाहीत. या डाव्यांच्या जोडीला आहेत ते सूडबुद्धीचे वकील, जे रक्तपाताच्या माध्यमातून आपले अपेक्षित परिणाम साधण्यासाठी आतुर आहेत. आता देशातील जनतेला हे ठरवायचे आहे की, ते अराजकतावाद्यांना पाठिंबा देणार की राष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मोदींना. देशप्रेमी जनतेने राहुल गांधींचे दुष्ट कारनामे हाणून पाडले पाहिजेत. या देशावर प्रेम असणारी जनता अभिजीत दीपकेसारख्या देशघातक शक्तीला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.

No comments: