भारतात सध्या दहशत कोणाची असेल तर ती स्वयंसेवी संस्थांचीच आहे. म्हणजे अगदी कुत्र्यांना संरक्षण द्या म्हणून कुत्र्यांसारख्या उपद्रवी प्राण्यासाठी स्थापन झालेल्या प्राणीमित्र संघटना असोत, नाही तर अनेक स्वयंसेवी संघटनांशी संबंधित असणारे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असोत. या सगळ्यांनी स्वार्थापलीकडे समाजाचे कोणतेही हित साधलेले नाही. त्यामध्ये आपल्या देशाचेही फार मोठे नुकसान झालेले आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. किंबहुना माहितीचा अधिकार आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून लूटमार करणाºया नव्या टोळ्या या देशात दहशत माजवत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
या देशातील न्यायव्यवस्थेत, कायदा आणि सुव्यवस्थेत लूडबूड करण्याचे कामही प्रसंगी या स्वयंसेवी संस्था करतात. याचे उदारहण म्हणजे काही वर्षांपूर्वी घडलेल्या इशरत जहान प्रकरणाचा उल्लेख करावा लागेल. इशरत जहानच्या चकमकीनंतर भारतातल्या अनेक मानवतावादी संस्था किंवा स्वयंसेवी संस्था कमालीच्या अस्वस्थ झाल्या होत्या. चकमकीची बातमी आल्यापासून त्यांनी ती चकमक खोटी असल्याचा दावा केला आणि संपूर्ण चौकशीची मागणी केली. पण चौकशीपूर्वी ती चकमक खोटी असल्याचा अशा लोकांचा निष्कर्ष तयारच होता. देशद्रोही शक्तींना पाठीशी घालण्याचा एवढा आटापिटा या स्वयंसेवी संस्था का करत होत्या? कारण या संस्थाच दहशतवादी आहेत.
याकुब अफजलपासून इशरतपर्यंत देशाचे शत्रू मानल्या गेलेल्या लोकांविषयी या स्वयंसेवी मंडळींना इतकी आपुलकी कशाला असते? भारतातल्या स्वयंसेवी संस्थांचे परकीय वा देशाच्या शत्रू मानल्या गेलेल्यांशी इतके साटेलोटे कशासाठी असते? अशा संबंधांची इतकी बारीक गुंतागुंत असते की, त्याचे धागेदोरे सापडणेही अशक्य होऊन जाते. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या अबोटाबाद शहरामध्ये अतिशय गोपनीय जागी दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेन याचा अमेरिकन कमांडोंनी खात्मा केला. पाकिस्तानी हद्दीत जाऊन लष्कराचे मुख्यालय असलेल्या कुंपणानजीक ही कारवाई झाली. पण पाक पोलीस, प्रशासन व हेरखात्याला गाफील ठेवून ही नुसती कारवाई झाली नव्हती. ती माहिती पाकला संपूर्ण अंधारात ठेवून अमेरिकन हेरखात्याने मिळवली होती. त्यासाठी पाकिस्तानात ज्या अमेरिकन मदतीवर चालणाºया स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांचा बिनधास्तपणे वापर करण्यात आला होता. ओसामा कुठे लपलाय हे पाक प्रशासनाला माहीत होते. त्यांनीच अतिशय गोपनीय जागी त्याला लपवले होते. पण अमेरिकन मदतीवर चालणाºया विविध मानव कल्याण संस्थांच्या पाकिस्तानी शाखांचा त्यासाठी सीआयए या हेरखात्याने वापर केलेला होता. म्हणजे अबोटाबाद येथे ओसामा लपल्याची माहिती मिळाली म्हणून तिथे घरोघर जाऊन शोध घेणे शक्य नव्हते. त्यासाठी मग तिथे पोलिओने बालकांची जीव धोक्यात असल्याच्या आवया उठवण्यात आल्या. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मग स्थानिक प्रशासनाला पोलिओ लस टोचण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले. तशी सज्जता स्थानिक प्रशासनाकडे नसल्याने ती जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी उचलली आणि घराघरात पोलिओ मोहीम राबवली गेली. त्यातला एक डॉक्टर अमेरिकन योजनेविषयी जाणून होता व ती मोहीम राबवित होता. त्याचे नाव डॉक्टर शकील आफ्रिदी असे आहे. पोलिओ लस देण्याच्या बहाण्याने ओसामाची माहिती पोहोचवली गेली. त्याच आधारावर मग ओसामाला संपवण्याची मोहीम आखली गेली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ओबामा आणि त्यांचे सहकारी व्हाईट हाऊसमध्ये बसून हे सारे बघत होते. पण काही मैलावर असलेल्या पाक सेनाप्रमुखांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. इतकी नेमकी माहिती स्वयंसेवी संस्थांनी आपल्या देशाची गुपिते फोडून अमेरिकेला पुरवली होती. ओसामा मोहिमेविषयी बोलताना अमेरिकेचे संरक्षणमंत्री लिओन पेनेटा यांनी त्याचा जाहीर उल्लेख केला आणि बिचारा डॉ. शकील आफ्रिदी आपल्या मायभूमीत देशद्रोही ठरला. पोलिओ मोहीम कशी योजण्यात आली आणि स्वयंसेवी संस्थांना हेरगिरीच्या कामाला कसे जुंपण्यात आले, हे यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे पाकमध्ये अमेरिकन पैशांवर समाजसेवा करणाºया बहुतांश संघटनांचा मुखवटा गळून पडला. अमेरिकन अनुदान व देणग्या घेणाºया संस्था व व्यक्ती भले सामान्य माणसांच्या कल्याणाचा आव आणत असतील, पण त्यांना मिळणारे अनुदान व देणग्या अमेरिकन हेरगिरीला उपयुक्त ठरण्यासाठीच असते. आज तो डॉ. आफ्रिदी गजाआड आहे.
स्वयंसेवी किंवा जनहित म्हणून कार्यरत असलेल्या संस्थांनी अशाप्रकारे परदेशी हेरसंस्थेसाठी काम करावे काय? आपल्याच देशातल्या सरकारला गाफील वा अंधारात ठेवून सरकारी योजना वा धोरणांना सुरूंग लावण्याचे हे कृत्य मानवी हिताशी निगडीत आहे काय? भारतातही कित्येक कोटी डॉलर्स विविध जनहित योजनांच्या नावाखाली येत असतात. हे कल्याण साधतांना अशा लोकांनी केलेले उपद्व्याप बघितले, तर त्यामागचा खरा हेतू लपून राहत नाही. यातल्या बहुतांश संस्था सरकार वा सरकारी धोरणाच्या विरोधात उचापती करताना दिसतील. त्यांना अमेरिकन संस्थांनीच कोट्यवधी रकमा का द्याव्यात? त्याचा अमेरिकन हेरखात्याला कोणता फायदा होणार आहे? आज पाकिस्तानची गोष्ट वेगळी आहे, पण भारतातही अमेरिकेच्या मदतीवर चालणाºया अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात आणि जंतरमंतरच्या झुरळांच्या आंदोलनातही हे दिसून आले. त्या काही भारतविरोधी कृत्य करत नाहीत ना हे तपासावे लागेल. लाखो डॉलर भारतीय संस्थांना समाजकल्याणासाठी देण्याइतकी अमेरिका उदार आहे काय? त्यामुळे स्वयंसेवी संस्थांवर लक्ष ठेवणे हितकारक आहे. पाकिस्तानात घुसून अमेरिकेला घातक असलेला ओबामा उडवणारी अमेरिका मात्र या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भारताचा घात करू शकते. त्यामुळे २६/११ सारखे हल्ले अशा लोकांमुळे झाले नाहीत ना हे तपासावे लागेल.
No comments:
Post a Comment